By : Polticalface Team ,Fri Nov 12 2021 21:34:01 GMT+0530 (India Standard Time)
श्रीगोंदा तालुक्यातील शेडगाव येथे संध्याकाळी 8 ते 9 च्या दरम्यान बिबट्याचे दर्शन झाले. संदीप रसाळ यांच्या द्राक्षाच्या बागेजवळ असणाऱ्या उसाच्या बांधावर बसलेला आढळा. या मुळे शेडगाव मध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शेडगाव येथील ग्रामस्थांनी वन विभाग येथील घालमे साहेब यांना संपर्क केला असता त्यांनी घाबरून न जाण्याचे आव्हान केले आहे. कोणत्याही प्रकारची त्या ठिकाणी गर्दी करू नये व फटाके फोडू नये असे सांगितले. रात्रीचा वेळ व उसाचे प्रमाण जास्त असल्यामुळे सकाळी आपण पिंजरा लावू असे सांगितले.
अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी
शफीक शेख
श्रीगोंदा प्रतिनिधी
अमोल झेंडे
वाचक क्रमांक :