क्रांतीस्तंभ भीमा कोरेगाव ते पंढरपूर धम्म पदयात्रा भिक्खू संघाचे, कासुर्डी, यवत, भांडगाव, पाटस, येथे प्रवचन, सामाजिक क्रांती अभियानामध्ये सामील होण्याचे आवाहन- पूज्यनीय भिक्खू ज्ञानज्योती
By : Polticalface Team ,19-06-2023
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड,
दौंड ता,१८ जून २०२३, भीमा कोरेगाव ते पंढरपूर,१५ जून २०२३ पासून ही धम्मपद यात्रा प्रवास करत दौंड तालुक्यातील मौजे कासुर्डी येथिल समाज मंदिरात भिक्खू संघाने भेट दिली, तसेच मौजे यवत येथील भीम नगर तालुका दौंड जिल्हा पुणे,या ठिकाणी दि १७ रोजी मुक्कामी पूज्यनीय भिक्खू ज्ञानज्योती महास्थवीर सह भिक्खू संघातील उपासक उपासिका सायंकाळी ६:३० वा जे सुमारास आगमन झाले, यवत येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन भीम नगर येथील पंचशील तरुण मित्र मंडळाच्या वतीने पूज्यनीय भिक्खू ज्ञानज्योती व भिक्खू संघाचे, पुष्प अर्पण करून स्वागत करण्यात आले, भिक्खू ज्ञानज्योती यांच्या हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धावृत्ती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आले, या प्रसंगी
सामुदायिक त्रिशरण पंचशील धम्म वंदना पठण करण्यात आले, भिक्खू ज्ञानज्योती सह भिक्खू दिव्यनाग, भिक भिख्खू विनयपाल, भिक्खू नागज्योती, भिक्खू अनुत्तर, सोमनाथ भोसले, प्रामुख्याने धम्म पदयात्रेत सहभागी झाले होते, या प्रसंगी भिक्खू ज्ञानज्योती त्यांनी उपस्थित धम्म बांधवांना प्रवचनाच्या माध्यमातून प्रबोधन करण्यात आले, त्यावेळी बोलताना ते म्हणाले, या धम्म पद यात्रेचा मूळ उद्देश, समाज जनजागृती तसेच महाराष्ट्रातील प्राचीन बौद्ध संस्कृतीचा खरा इतिहास म्हणजे, पंढरपूरचे विठ्ठल मंदिर हे बुद्ध विहारच होय, एवढेच नव्हे तर सर्व प्राचीन मंदिरे ही बुद्ध विहारच आहेत असे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटले असल्याचे त्यांनी प्रवचनाच्या माध्यमातून उपस्थित उपासक उपासिकांना खऱ्या इतिहासाची पाने उलगडून सांगितले, ब्राह्मणेत्तर समाजाच्या स्वाभिमानाचा वारसा म्हणजे पंढरपूरचा पंढरीनाथ होय,३२ लक्षणे आणि ८० अनुव्यंजनांनी वेढलेली काया नाथाचाही लोकनाथ, भगवान बुद्ध म्हणजेच पंढरीनाथ होय.
काल ओघामध्ये ब्राह्मण संस्कृती आरुढ होऊन श्रमण संस्कृतीचे पतन झाले, आणि या देशातील बौद्ध संस्कृती लुप्त झाली असल्याने संपूर्ण समाज ब्राह्मण वादाचा गुलाम झाला असल्याचे दिसून येते असल्याचे त्यांनी सांगितले, प्राचीन काळातील भोलेनाथ आणि सर्वच नाथपंथी समुदयाचे लोक भिक्खू च होते, महाराष्ट्राची सुपी वारकरी व संतांची परंपरा होती, काल ओघात सारेच विस्मरण झाले आहेत, हा जातीपातीत विभागलेला सर्वच ब्राह्मणेनंतर समाज पूर्वी नागवंशीय समाज होता, संपूर्ण महाराष्ट्र धर्मवाणांचे आधिन व धर्मवंतांची खाण होती, भगवान बुद्धांच्या धर्म संस्कृतीचे रक्षण करणारी महाराष्ट्राची भूमी होती, हे २५ डिसेंबर १९५४ रोजी पुणे देहु रोड या ठिकाणी बुद्ध विहाराचे उद्घाटन प्रसंगी, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितले होते, संपूर्ण जम्बु दीपातील दोन हजार लेण्यांपैकी एकट्या महाराष्ट्रात दिड हजार पेक्षा जास्त लेण्या आहेत, (रायटिंग अँड स्पीचेस खंड १८ हु वॉच विठ्ठल, या लेखामध्ये नमूद आहे ) ही याची साक्ष होय, पंढरपूरचे मंदिर हे बुद्ध विहार होय, पंढरीनाथ व विठ्ठल दुसरा तिसरा कोणी नसून भगवान बुद्ध आहेत, एवढेच नव्हे तर सर्व प्राचीन मंदिरे ही बुद्ध विहारेच आहेत, असा हा प्राचीन काळातील खऱा इतिहास डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी उघडकीस आणला असल्याचे, भिक्खू ज्ञानज्योती यांनी प्रवचनाच्या माध्यमातून सांगितले, तसेच सर्व ब्राह्मणेनंतर समाज हा भगवान बुद्धांच्या सद धम्माचा वारसदार होता याचे स्मरण समाजाला करून देण्यासाठी व खऱ्या इतिहासाची जाणीव करून देण्यासाठी च हा प्रवास धम्म पदयात्रा असुन, भीमा कोरेगाव ते पंढरपूर सुरू करण्यात आली असल्याचे भिक्खू ज्ञानज्योती त्यांनी सांगितले, तसेच या सामाजिक क्रांती अभियानामध्ये सर्व बहुजन समाजाने सामील व्हावे असे आव्हान भिक्खू ज्ञानज्योती त्यांनी केले आहे, प्रवचनाच्या अंतिम वेळी यवत बुद्ध विहार, व डॉ बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन भिमनगर, तसेच पंचशील तरुण मित्र मंडळाच्या वतीने, पूज्यनीय भिक्खू संघाला भोजनदान करण्यात आले, या प्रसंगी भिम नगर येथील पंचशील तरुण मित्र मंडळाचे अध्यक्ष साजन गायकवाड, चंद्रकांत गायकवाड, रवी गायकवाड, सुरज गायकवाड, हर्षद गायकवाड, धीरज गायकवाड, सतीश गायकवाड, गणेश गायकवाड, बांपू जगताप, विष्णू बोडके दत्तात्रय डाडर, अनिल गायकवाड, तसेच कासुर्डी बुद्ध विहार येथील जितेंद्र सोनवणे अविनाश (बंडा) चव्हाण, धम्म उपासक उपासिका भांडगाव बुद्ध विहार येथील दिलीप गायकवाड नाना गायकवाड, सह उपासक उपासिका, पाटस बुद्ध विहार येथील भाऊ पानसरे, सुधीर पानसरे, तसेच
धम्म उपासक उपासिका प्रामुख्याने उपस्थित होते.
वाचक क्रमांक :
अनिल गायकवाड
दौण्ड प्रतिनिधी
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई
श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष
गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.
अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.
‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये
"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं
मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.
यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न
यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त
वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड
चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.