By : Polticalface Team ,Thu Nov 18 2021 19:27:09 GMT+0530 (India Standard Time)
श्रीगोंदा तालुक्यातील भावडी येथील दलित वस्ती मध्ये रमाई घरकुल योजनेचा लाभ घेण्यासाठी जागेची नोंद गेली 8-9 महिन्यापासून रीतसर अर्ज देऊन सुद्धा गावातील गावठाण जागेमध्ये नोंदी लावण्यास ग्रामसेवक टाळाटाळ करीत असून, शासन निर्णय 1995 अन्वये अतिक्रमण झालेल्या जागेच्या नोंदी कायम करण्यात याव्यात असा जी-आर असून देखील आज पर्यंत येथील जागेचा नोंदी लावण्यात आल्या नाहीत. शासन नियमाप्रमाणे नोंदी लावण्यात याव्यात जेणेकरून रमाई घरकुल योजनेचा लाभ घेता येईल, काही वंचित घटकातील लाभार्थी यांची स्वतःची मालकी हक्काची जागा असून त्यावर कच्ची घरे आहेत. त्यांनी वाढीव जागेसाठी अर्ज केला आहे, तरी त्यांच्या अर्जाचा विचार करून त्यांना वाढीव जागा देण्यात येऊन त्यांना घरकुल मंजूर करण्यात यावे. यासाठी भावडी गावचे ग्रामपंचायत सदस्य शिंदे दत्तात्रय किसन यांनी तहसील कार्यालय श्रीगोंदा येथे अमरण उपोषण केले. या उपोषणाची दखल बीडीओ साहेब यांनी घेऊन लेखी आश्वासन दिल्यानंतर हे उपोषण मागे घेण्यात आले. उपोषण सोडते वेळेस जिल्हा परिषद सदस्य अनिल ठवाल, संभाजी ब्रिगेड चे जिल्हा अध्यक्ष टिळकजी बोस, लहुजी सेना तालुका अध्यक्ष नवनाथ शिंदे उपस्थित होते.
अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी
शफीक हवालदार
श्रीगोंदा प्रतिनिधी
अमोल झेंडे
वाचक क्रमांक :