काळया बाजारात जाणारा रेशनचा तांदूळ पकडला.. चालक गेला पळून...
By : Polticalface Team ,Thu Nov 18 2021 19:53:01 GMT+0530 (India Standard Time)
श्रीगोंदा तालुक्यातील पारगाव सुद्रीक या ठिकाणी बाजारात विक्री साठी घेऊन जाणारा रेशनच्या तांदळाचा आयशर टेम्पो क्र.एम.एच १२ एच.डी २७२७ पहाटे ताब्यात घेतला असून अंधाराचा फायदा घेऊन टेम्पोचा चालक पसार झाला असून पुढील कारवाई साठी पोलिसांनी तहसीलदार मिलिंद कुलथे यांचा अभिप्राय मागण्यासाठी पत्रव्यवहार केला असल्याची माहिती पोलिस निरीक्षक रामराव ढिकले यांनी सांगितले.
या बाबत सविस्तर वृत्त असे की श्रीगोंदा तालुक्यातील पारगाव सुद्रीक या ठिकाणी रेशनचा तांदूळ विक्रीसाठी जात असल्याची माहिती पोलिसांना मिळताच पोलिस निरीक्षक रामराव ढिकले यांच्या मार्गदर्शनाखाली पारगाव सुद्रिक येथे रात्री उशिरा रस्त्याने संशयास्पद पद्धतीने जाणारा आयशर टेंपो क्र.एम.एच १२ एच.डी २७२७ थांबवत पाहणी केली असता टेम्पो मध्ये सुमारे ८० ते ८५ पांढऱ्या गोण्यामध्ये तांदूळ भरलेला दिसला. मात्र त्याच वेळी अंधाराचा फायदा घेत टेंपो चालकाने तेथून धूम ठोकली. चालक फरार झाल्याने पोलिसांनी तो टेम्पो पुढील कारवाईसाठी पोलीस ठाण्यात आणला. असून पुढील कार्यवाहीसाठी तहसीलदार मिलिंद कुलथे यांचा अभिप्राय मागण्यासाठी पत्रव्यवहार केला असल्याची माहिती पोलिस निरीक्षक रामराव ढिकले यांनी दिली. याबाबत तहसीलदार मिलिंद कुलथे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी पोलिसांचे पत्र आल्याचे सांगत गुन्हा दाखल होणार असल्याचे सांगत पुरवठा विभागाची अहमदनगर येथे मीटिंग असल्याचे सांगितले. पुरवठा विभागाचे अधिकारी व कर्मचारी आल्या नंतर पाहणी करून पोलीसांना पुढील कारवाई साठी अहवाल देणार असल्याचे सांगत तालुक्यात जर कोणाच्या रेशनबाबत काही तक्रारी असल्यास नागरिकांनी तहसीलदार कार्यालयाशी संपर्क साधावा असेही तहसीलदार यांनी सांगितले .
अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी
शफीक हवालदार
श्रीगोंदा प्रतिनिधी
अमोल झेंडे
वाचक क्रमांक :