रेशन तांदूळ काळ्या बाजारात विक्री साठी घेऊन जाणाऱ्या टेम्पो मालक व चालक यांच्यावर गुन्हा दाखल.
By : Polticalface Team ,Fri Nov 19 2021 22:53:29 GMT+0530 (India Standard Time)
श्रीगोंदा तालुक्यातील पारगाव सुद्रीक या ठिकाणी श्रीगोंदा पोलिसांनी काळया बाजारात विक्रीसाठी जाणारा 1 लाख 76 हजार 367 रुपयांचा 119 गोण्यातील 5 हजार 878 किलो रेशनचा तांदूळ तसेच 7लाख रुपये किमतीचा आयशर टेम्पो क्र.एम.एच १२ एच.डी २७२७ असा एकूण 8 लाख 76 हजार 367 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी श्रीगोंदा पोलिस ठाण्यात पोलिस कॉन्स्टेबल आमोल आजबे यांच्या फिर्यादीवरून टेम्पो मालक महावीर वसंतलाल गांधी , रा . पारगाव सुद्रिक, आणि चालक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून कारवाई वेळी अंधाराचा फायदा घेत टेम्पो चालक फरार झाला असून पोलिस त्याचा शोध घेत असून पुढील तपास पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांच्या मार्गदर्शनाखाली दिलीप तेजनकर हे करत आहेत.
याबाबत सविस्तर असे की पोलिस निरीक्षक रामराव ढिकले यांना महावीर वसंतलाल गांधी , रा . पारगाव , ता . श्रीगोंदा यांच्या मालकीचा आयशर टेम्पो क्र.एम.एच १२ एच.डी २७२७ यात रेशनचा तांदूळ काळया बाजारात विक्री करिता पारगाव श्रीगोंदा रस्त्याने जाणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली त्या नुसार त्यांनी रात्र गस्तीवर असलेले पोलिस उप निरीक्षक सुनिल सुर्यवंशी यांना महिती देत खात्री करून टेम्पोवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या त्यानुसार पारगाव सुद्रीक येथे रस्त्याने जाणाऱ्या एम . एच . 12. एच . डी . 2727 या टेम्पोला हाताने थांबण्याचा इशारा केला असता त्यावरील चालकाने त्याचे ताब्यातील टेम्पो हा " काही अंतरावर चालवीत नेऊन पारगाव ते वडाळी रोडचे कडेला असलेले काळे यांचे गोडावुनचे शेजारी उभा करून तेथुन रात्रीचे अंधाराचा फायदा घेऊन फरार झाला. पो उप नि. सुर्यवंशी यांनी टेम्पोची पहाणी केली असता त्यात पांढ - या रंगाचे गोण्यांमध्ये तांदुळ भरला असल्याचे आढळुन आले. टेम्पोमधील तांदुळ हा रेशनीचा असल्याचा संशय आल्याने तसेच टेम्पो चालक पळून गेल्याने पोलिस कॉन्स्टेबल प्रताप देवकाते ,पोलिस कॉन्स्टेबल दादासाहेब टाके यांच्या मदतीने मुद्देमालासह टेम्पो पोलिस ठाण्यात आणला.श्रीगोंदा तहसिल कार्यालयातील पुरवठा अधिकारी सुनिल पाचारणे यांनी पंचनामा करत 1 लाख 76 हजार 367 रुपयांचा 119 गोण्यातील 5 हजार 878 किलो रेशनचा तांदूळ तसेच 7लाख रुपये किमतीचा आयशर टेम्पो क्र.एम.एच १२ एच.डी २७२७ असा एकूण 8 लाख 76 हजार 367 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी श्रीगोंदा पोलिस ठाण्यात पोलिस कॉन्स्टेबल आमोल आजबे यांच्या फिर्यादीवरून महाराष्ट्र शासनाने मोफत वितरणासाठी दिलेल्या तांदळाच्या गोण्याची अदलाबदल करून सदर तांदुळ हे अवैध रित्या विक्री करण्याचे उद्देशाने जवळ बाळगुन वाहतुक केल्या प्रकरणी टेम्पो मालक महावीर वसंतलाल गांधी , रा . पारगाव सुद्रिक, आणि चालक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून कारवाई वेळी अंधाराचा फायदा घेत टेम्पो चालक फरार झाला असून पोलिस त्याचा शोध घेत असून पुढील तपास पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांच्या मार्गदर्शनाखाली दिलीप तेजनकर हे करत आहेत.
अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी
शफीक हवालदार
श्रीगोंदा प्रतिनिधी
अमोल झेंडे
वाचक क्रमांक :