मढेवडगाव येथील रस्ता रोको आंदोलन प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर स्थगित.
By : Polticalface Team ,Sat Nov 20 2021 14:56:03 GMT+0530 (India Standard Time)
श्रीगोंदा प्रतिनिधी दि.२०: मढेवडगावला आधीच गावठाण जागा अपुरी असून संपूर्ण गावाच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असलेल्या पाणंद रस्ता व बाजारतळाच्या जागेवरील अतिक्रमणे काढण्यासाठी भूमी अभिलेख कार्यालयाने पारदर्शक मोजणी करून तहसीलदार यांनी अतिक्रमणे काढली नाही तर समस्त मढेवडगाव येत्या १ जानेवारीला संगमनेर येथे महसूल मंत्र्यांच्या दारात धरणे आंदोलन करण्याचा इशारा मढेवडगाव येथे राष्ट्रीय महामार्ग नगर-दौंड रस्त्यावर शनिवार दि.२९ रोजी रास्ता रोको आंदोलनात बोलताना ग्रामस्थांनी दिला आहे. काष्टी येथील बाजार दिवस असल्याने वाहनांच्या रांगा लागल्या परंतु प्रशासनाने लवकर लेखी आश्वासन दिल्याने आंदोलन अल्पकाळ चालले.
यावेळी रयत क्रांती संघटनेचे तालुकाध्यक्ष भाऊसाहेब मांडे म्हणाले की शासनाने राजस्व अभियान अंतर्गत पाणंद रस्ते, शीव रस्ते व शेती करण्यासाठी वहिवाटीचे रस्ते मोकळे करण्यासाठी विविध योजना आणल्या प्रत्यक्षात मात्र महसूल विभाग व भूमी अभिलेख विभागाच्या निष्क्रियतेमूळे या योजना कागदोपत्रीच दिसत आहेत. ग्रामपंचायत स्थानिक स्वराज्य संस्था असूनही त्यांच्या मागणीला प्रशासन केराची टोपली दाखवत आहे. यावेळी यावेळी अंबादास मांडे, साहेबराव उंडे, संदीप मांडे यांची भाषणे झाली. यापूर्वीही या प्रश्नासाठी अनेक आंदोलने झालेली आहेत. मढेवडगाव ता. श्रीगोंदा येथील गट. नं. ४४५ व ४४६ मधून जाणारा पूर्वापार वहीवाटीचा पाणंद रस्ता व आठवडे बाजाराच्या जागेत गावातील एका बड्या राजकीय नेत्याने व त्याच्याच कुटुंबातील ग्रामपंचायत सदस्याने अतिक्रमण केले असल्याने ग्रामपंचायतचे सरपंच, उपसरपंच, सदस्य व ग्रामस्थांचे मनमाड-बेळगाव राष्ट्रीय महामार्गावर मढेवडगाव येथे शनिवार दि.२० रोजी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. सकाळी ९: वाजता आंदोलनाला सुरुवात झाली. तहसीलदार यांच्यावतीने नायब निवासी तहसीलदार पंकज नेवसे व भूमिअभिलेख उपअधीक्षक संदीप गोसावी यांनी अतिक्रमण हटविण्याचे लेखी आश्वासन दिल्यामुळे आंदोलन स्थगित करण्यात आले. परंतु आश्वासनाची अंमलबजावणी लवकरात लवकर झाली नाही तर दि.१ जानेवारी रोजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या निवासस्थानी आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी यावेळी नायब तहसिलदार नेवसे यांना बोलताना दिला.
यावेळी सरपंच महानंदा मांडे, रयत क्रांती संघटनेचे तालुका अध्यक्ष भाऊसाहेब मांडे, अंबादास मांडे, गेना मांडे, साहेबराव उंडे, संदीप मांडे, राजेंद्र उंडे, राजेंद्र शिंदे, प्रशांत शिंदे, ग्रामपंचायत सदस्य गणेश मांडे, अमोल गाढवे, लक्ष्मण मांडे, बापू बर्डे, काळूराम ससाणे, भगवान धावडे, वामन मांडे, प्रविण वाबळे, बापू गाडे, संजय गाडे, त्रिंबक मांडे, उत्तम मांडे व मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
चौकट: गेल्या दीड वर्षांपासून अतिक्रमणे हटविण्यासाठी कायदेशीर मार्गाने अनेक आंदोलने केली मात्र श्रीगोंदा येथील भूमी अभिलेख कार्यालयातील मोजणी कर्मचाऱ्यांच्या गलथान कारभारामूळे मढेवडगावसह अनेक गावांचे प्रश्न रखडले आहेत. हे कार्यालय बेकायदेशीर आर्थिक उलाढाल, राजकीय नेते व एजंटच्या इशाऱ्यावर काम करते असा अनेक नागरिकांचा आरोप आहे. रास्ता रोको आंदोलन सुरू झाल्यावर तात्काळ नायब तहसिलदार पंकज नेवसे, भूमी अभिलेख उपअधीक्षक संदीप गोसावी, मंडळअधिकारी जनार्दन सदाफुले, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित माळी यांनी अतिक्रमणे काढण्याचे लेखी आश्वासन दिल्यामुळे आंदोलन अल्पकाळ चालले.
# आंदोलन प्रसंगी काही विद्यार्थिनींचे नगर येथे डीएड परीक्षा असल्याने त्यांना वाट मोकळी करून देण्यात आल्याने या विद्यार्थिनींनी आंदोलनकर्त्यांचे आभार मानले.
अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी
शफिक हवलदार
श्रीगोंदा प्रतिनिधी
अमोल झेंडे
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई
श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष
गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.
अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.
‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये
"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं
मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.
यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न
यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त
वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड
चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.