नगरचा सुदर्शन कोतकर नवा उत्तर महाराष्ट्र केसरी

By : Polticalface Team ,Tue Nov 23 2021 13:39:02 GMT+0530 (India Standard Time)

नगरचा सुदर्शन कोतकर नवा उत्तर महाराष्ट्र केसरी पाथर्डी प्रतिनिधीः पाथर्डीत तालुक्यात रंगलेल्या उत्तर महाराष्ट्र कुस्ती चषक स्पर्धेत अहमदनगरच्या केडगाव मधील सुदर्शन कोतकर याने अंतिम विजेतेपद पटकाविले. अंतिम कुस्तीची लढत सुदर्शन कोतकर (नगर) विरुध्द बाळू बोडखे (नाशिक) यांच्यात लाल मातीच्या आखाड्यात झाली. या कुस्ती स्पर्धेत कोतकर याने घुटना डावावर बोडखे याला चितपट केले. शेवट पर्यंत कुस्ती रंगली होती. यामध्ये कोतकर याने बोडखेवर आपला कब्जा मिळवत घुटना डावावर आसमान दाखवले. यावेळी प्रेक्षकांनी जल्लोष करण्यास सुरुवात केली. प्रतिस्पर्धी मल्लाने कुस्ती झाली नसल्याचे स्पष्ट केले. या कुस्तीचे व्हिडिओ चित्रीकरण पाहून पंचांनी कोतकर विजयी झाल्याचे घोषित केले. तर या उत्तर महाराष्ट्र कुस्ती कुस्ती स्पर्धेत इतर गटातही अहमदनगरच्या मल्लांनी वर्चस्व दाखवले.   महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या मान्यतेने अहमदनगर जिल्हा तालीम संघ, संघर्ष योद्धा बबनराव ढाकणे व श्री केदारेश्‍वर सहकारी साखर कारखाना यांच्या संयुक्त विद्यमाने एम.एम. निर्‍हाळी उच्चमाध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणात कुस्त्यांचा थरार रंगला होता. सकाळ ते संध्याकाळ पर्यंत सहा गटात कुस्त्या रंगल्या होत्या. सर्व कुस्त्या मॅटवर घेण्यात आल्या. शेवटची उत्तर महाराष्ट्र कुस्ती चषक स्पर्धेची कुस्ती लाल मातीत बेमुदत निकाली लावण्यात आली होती. यामधील विजयी मल्लास स्पर्धेचे आयोजक अ‍ॅड. प्रतापकाका ढाकणे यांच्या हस्ते चांदीची गदा व ५१ हजार रुपये रोख बक्षिस देण्यात आले. तर उपविजयी मल्ल बाळू बोडखे याला ३१ हजार रुपये व चषक तर तृतीय विजेता अनिल ब्राम्हणे याला २१ हजार रोख व चषक देण्यात आले. यावेळी जिल्हा तालीम संघाचे अध्यक्ष पै. वैभव लांडगे, खजिनदार पै. नाना डोंगरे, पाथर्डी तालुका तालीम संघाचे सचिव पै. राजेंद्र शिरसाठ, शहराध्यक्ष नामदेव लंगोटे, मोहन हिरणवाले, ऋषीकेश ढाकणे, अ‍ॅड. सिध्देश ढाकणे, माजी सभापती काशीनाथ लवांडे, पाथर्डी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष शिवशंकर राजळे, रफिक शेख, सिताराम बोरुडे, नगरसेवक बंडू बोरुडे, डॉ. दिपक देशमुख, लक्ष्मणराव डोंमकावळे, हाजी हुमायुम अत्तार, प्रा. गाडे, गहिनीनाथ शिरसाठ, डॉ. राजेंद्र खेडकर, सतीश मुनोत, कपील अग्रवाल, सुनिल भिंगारे, महादेव आव्हाड, नाशिक जिल्हा तालिम संघाचे अध्यक्ष गोरखनाथ बळकवडे, डॉ. शिवाजी खेडकर, संग्राम शेळके, योगेश रासने, नगरसेवक सुभाष लोंढे, हर्षवर्धन कोतकर, शिवाजी चौधरी, हिरामन वाघ, युवराज पटारे, शांताराम बागुल, गहिनीनाथ शिरसाठ, देवा पवार, बाळासाहेब घुले, विक्रम बारवकर, शिवाजी बडे, रफिक शेख, दिगंबर गाडे, दिगंबर ढवण आदी उपस्थित होते. या स्पर्धेत ४८ किलो वजन गटात प्रथम- संकेत सतरकर (नगर), द्वितीय- अंकुश भडांगे नाशिक, तृतीय- वैभव तुपे (नाशिक), ५८ किलो वजन गटात प्रथम- पवन ढोन्नर (नाशिक), द्वितीय- शुभम मोरे (नाशिक), तृतीय- महेश शेळके (नगर), ६५ किलो वजन गटात प्रथम- सुजय तनपुरे, द्वितीय- भाऊसाहेब सदगीर, तृतीय- अशोक पालवे, ७४ किलो वजन गटात प्रथम- महेश फुलमाली (नगर), द्वितीय- संदीप लटके (नगर), तृतीय- आकाश घोडके (नगर), ८४ किलो वजन गटात प्रथम- ऋषीकेश लांडे (नगर), द्वितीय- विजय पवार (श्रीगोंदा), तृतीय- विकास गोरे (नगर) यांनी बक्षिसे पटकाविले. कुस्ती स्पर्धा यशस्वी होण्यासाठी एकलव्य परिवाराचे सर्व सहकारी परिश्रम घेत आहे. कुस्ती स्पर्धेचे समालोचन शंकर अण्णा पूजारी यांनी केले. स्पर्धेचे पंच म्हणून गणेश जाधव, संजय डफळ, शुभम जाधव, राहुल कापसे, चेतक बळकवडे, राम यादव, गणपत चुंबळे, सन्नी चौधरी, हरीमाना शिंदे यांनी काम पाहिले. स्पर्धा यशस्वी होण्यासाठी एकलव्य परिवाराच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.  
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.