By : Polticalface Team ,Tue Nov 23 2021 19:27:54 GMT+0530 (India Standard Time)
श्रीगोंदा तालुक्यातील अवैध गौणखनिज उत्खनन व वाहतूक प्रकरणी आकारण्यात आलेल्या दंड रुक्मिणीचा भरणा ज्या कसुरदार व्यक्तीने केलेला नाही. त्यांची सदरची रक्कम महसूल थकबाकी म्हणून घोषित करून ती वसूल करण्या कामी कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. त्यानुसार अवैध गौणखनिज उत्खनन वाहतूक करताना पकडलेल्या वाहनांना आकारण्यात आलेल्या दंडाच्या रकमेचा ज्या व्यक्तीने भरणा केलेला नाही. त्या सदर वाहनांचा जाहीर निलाव करण्याची प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. तसेच अवैध गौणखनिज उत्खनन व साठा प्रकरणी ज्या कसुरदार व्यक्ती यांनी रक्कम भरणा केलेला नाही,अशा व्यक्तीची महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 मधील तरतुदीनुसार स्थावर व जंगम मालमत्तेचा निलाव करून विक्री द्वारे गौणखनिज थकबाकीची रक्कम भरण्याबाबत कार्यवाही करण्यात येणार आहे. तथापि कसुरदार व्यक्ती यांनी तत्काळ सदर थकबाकी रक्कमेचा भरणा करावा असे आव्हान या द्वारे करण्यात आले आहे.
वाचक क्रमांक :