आचार्य पदवीधारक डॉ. अमोल विरकर यांचा राज्यस्तरीय कृषिभूषण पुरस्काराने पुणे येथे होणार गौरव
By : Polticalface Team ,Tue Nov 23 2021 19:30:43 GMT+0530 (India Standard Time)
आष्टी प्रतिनिधी:
पुणे येथील तेजभूषण फाउंडेशनच्या राज्यस्तरीय पुरस्काराची घोषणा नुकतीच झाली. यात मराठवाडा विभागातून नांदूर (विठ्ठलाचे) .ता.आष्टी येथील रहिवाशी व महात्मा फुले कृषी विद्यापीठ येथून आचार्य पदवी धारक डॉ.अमोल महादेव विरकर यांना राज्यस्तरीय कृषिभूषण पुरस्कार घोषित करण्यात आला. त्यांना या अगोदर सर्वोत्कृष्ट उद्यानउद्या आवार्ड- 2020हा पुरस्कार मिळाला होता तसेच तिन वेळेस नेट सेट उत्तीर्ण आहेत. त्यांनी कृषी क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल त्यांना हा सन्मान दिला जाणार आहे. पुणे येथील तेजभूषण फाउंडेशनच्या 26 डिसेंबर रोजी पुण्यात होणाऱ्या राज्यस्तरीय संमेलनात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी,महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते डॉ.अमोल विरकर यांना कृषीभुषण या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे
वाचक क्रमांक :