मणिपूर येथील महिलांवर झालेले अन्याय अत्याचाराविरुद्ध, दलित मुस्लिम ख्रिश्चन बौद्ध बहुजन समाजाच्या वतीने, दौंड तहसील कार्यालयावर धडक निषेध मोर्चा,
By : Polticalface Team ,25-07-2023
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड,
दौंड ता २५ जुलै २०२३ रोजी दलित मुस्लिम ख्रिश्चन बौद्ध व बहुजन, फुले शाहू आंबेडकरी संघटना, मनिपुर येथील महिलांनवर झालेल्या अन्याय अत्याचाराविरुद्ध तसेच राज्य व केंद्र सरकारला इशारा देण्यासाठी एकत्रित येऊन दौंड शहराच्या रस्त्यावर उतरल्या आहेत, दि २५ जुलै २०२३ रोजी दौंड शहर ता दौंड जिल्हा पुणे येथील तहसील कार्यालयावर दलित मुस्लिम ख्रिश्चन बौद्ध व बहुजन समाज एकत्रित येऊन मोठ्या संख्येने धडक मोर्चा काढण्यात आला.
मणिपूर येथील दोन महिलांवर अन्याय अत्याचार करून त्यांची हजारो लोकांच्या समोर नग्न दिंड काढणाऱ्या समाजकंटकांवर कठोर कारवाई करण्यात यावी, तसेच राज्यात व देशात दलित मुस्लिम ख्रिश्चन बौद्ध व बहुजन समाजावर होणारे अन्याय अत्याचारा विरोधात फुले शाहू आंबेडकरी संघटनेच्या वतीने दौंड शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकातील पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून दौंड पोलीस स्टेशन ते दौंड तहसील कार्यालय पर्यंत दलित मुस्लिम ख्रिश्चन बौद्ध व बहुजन समाजावर अनेक ठिकाणी वारंवार अन्याय अत्याचार हल्ले करून मारण्यात येत आहे, अनेक ठिकाणच्या ख्रिश्चन बांधवांच्या चर्चेस धार्मिक स्थळांवर झुंडशाही पद्धतीने जमाव जमून तोडफोड व आग लावण्यात आल्या आहेत, मणिपूर मध्ये गेल्या दोन महिन्यापासून ३०० पेक्षा जास्त चर्चेस जाळण्यात आले असून अनेक लोकांच्या हत्या करण्यात आल्या आहेत, या संदर्भात केंद्र सरकार व राज्य सरकारने बघ्याची भूमिका घेतली की काय ? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे, केंद्र सरकारने व राज्य सरकारने दलित मुस्लिम ख्रिश्चन बौद्ध व बहुजन समाजावर होणाऱ्या अन्याय अत्याचाराविरुद्ध तत्काळ दखल घेण्या ऐवजी धर्मांतराच्या नावाखाली खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत.
लवजिहादच्या नावाखाली मुस्लिम समाजावर अन्याय अत्याचार केला जात आहे, देशात व राज्यात लोकशाही धोक्यात आली असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे, डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीला विरोध केला जात असुन दलितांची हत्या केली जात आहे, देशात व राज्यात राज्यघटनेची पायमल्ली करून कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचे षडयंत्र दिवसेंदिवस वाढत चालली आहेत, लोकशाही रुजवण्याच्या ऐवजी हुकूमशाही पद्धतीने मनुस्मृती लादण्याचा प्रयत्न केला जात आहे, नांदेड येथील अक्षय भालेराव याची जातिय दोष भावनेतुन हत्या करणाऱ्या मारेकरांना फाशीची शिक्षा करण्याची मागणी करत त्याच्या कुटुंबाला राज्य शासनाने व केंद्र शासनाने आर्थिक मदत घोषित करण्यात यावी, स्वतंत्र दिवस हा काळा दिवस घोषित करणाऱ्या मनोहर भिडेवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, दलित मुस्लिम ख्रिश्चन बौद्ध व बहुजन समाजातील नागरिकांची घरे अतिक्रमणाच्या नावाखाली पाडण्यात येत आहेत ह्या बहुजन समाजावरील होणाऱ्या अन्याय अत्याचाराविरुद्ध दौंड शहरातील बहुजन नागरिक रस्त्यावर
उतरून निषेध व्यक्त करुन मूक मोर्चा काढण्यात आला, या विषया संदर्भात गंभीर दखल घेऊन दौंडचे नायब तहसीलदार भोंग साहेब यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले आहे, केंद्र सरकार व राज्य सरकारने कायदा व सुव्यवस्था अबाधित राहील या अनुषंगाने कठोर पर्याय उपलब्ध करून गुन्हेगारांची मस्ती उतरवण्याचे महान कार्य करून बहुजन समाजाला न्याय देण्याचे काम केले पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली, निषेध मुक मोर्चा आयोजक डी एम के फाउंडेशन दौंड तालुका, यांच्या वतीने पी आर पी जिल्हा उपध्यक्ष अमित सोनवणे, आर पी आय चे पुणे जिल्हा संघटक भारत जे सरोदे, फुले शाहू आंबेडकरी चळवळीचे नेते नागशेन जी धेंडे, एम आय एम चे दौंड शहराध्यक्ष मतीन शेख, ख्रिश्चन समाज संयोजक रतन जाधव, या मान्यवरांच्या मार्गदर्शनाखाली दलित मुस्लिम ख्रिश्चन बौद्ध व बहुजन समाजातील युवा तरुणांनी मोठ्या संख्येने निषेध मुक मोर्चामध्ये सहभाग नोंदवला होता, या वेळी आर पी आय मा, अध्यक्ष पांडुरंग गायकवाड, संत मदर तेरेसा सामाजिक संस्थेचे अध्यक्ष मोजेस कॉल, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सेवाभावी संस्था अध्यक्ष विनायक मोरे, वंचित बहुजन आघाडी दौंड तालुका अध्यक्ष अश्विन वाघमारे सामाजिक कार्य विभाग दीपक सोनवणे, एम आय एम दौंड शहर सचिव हमीद शेख, अकबर करीम शेख, अन्वर सय्यद, आमीन शेख, भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका अध्यक्ष साहेबराव पोळ, दलित मुस्लिम बौद्ध व बहुजन समाजातील युवा पदाधिकारी कार्यकर्ते महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वाचक क्रमांक :
अनिल गायकवाड
दौण्ड प्रतिनिधी
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई
श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष
गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.
अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.
‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये
"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं
मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.
यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न
यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त
वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड
चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.