माझा वाढदिवस केक कापून साजरा नको, याच दिवशी पुस्तक बँक ची स्थापना करू मुलाची वडिलांकडे साद
By : Polticalface Team ,31-07-2023
श्रीगोंदा तालुक्यातील पेडगाव गावी एक अनोख्या पद्धतीने वाढदिवस साजरा करण्यात आला, तालुक्यातील पेडगाव मधील दीपक मच्छिन्द्र म्हस्के यांचा मुलगा संविधान दीपक म्हस्के याचा वाढदिवस 29 जुलै रोजी असल्या कारणाने त्याच्या वाढदिवसाच्या निमित्त नोव्हेल फौंडेशन व भारतीय संविधान संघर्ष समिती यांच्या माध्यमातून पुस्तक बॅंकची स्थापना करून एक सामाजिक संदेश देण्यात आला, या कार्यक्रमात अनेक मान्यवरांनी आपल्याकडील जुनी पुस्तके जमा केली जेणेकरून ती दुसऱ्या कुणाला वाचता येईल यात प्रामुख्याने शुभम चौकटे यांनी एक पुस्तकाचा संच , नितीन घोडके सर यांनी सविधान पुस्तिका व रेवनं घोडके यांनी पुस्तके जमा केली.
नोव्हेल फौंडेशन ही सामाजिक संस्था 2010 साला पासून समाजातील शिक्षणापासून वंचित मुलांमध्ये शिक्षणाचा प्रसार करण्याचे कार्य करते, व त्यांना शिक्षण घेण्यास साहाय्य करते, पुस्तक बँक मध्ये ज्यांना शक्य होइल त्यांनी आपल्याकडील जुनी पुस्तके बुक बँक मध्ये जमा करून या शिक्षणाच्या सामाजिक कार्यात आपले योगदान द्यावे असे आवाहन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष् दीपक म्हस्के यांनी केले.
या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात जनसमुदाय उपलब्ध होता,या कार्यक्रमाचे रूपरेषा याप्रमाणे झाली अध्यक्षस्थान मा. रेवन आप्पा घोडके (जेष्ठ मार्गदर्शक भारतीय बौद्ध महासभा ) यांनी स्विकारल्यानंतर सर्व मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. त्यानंतर मा. प्रशांत चव्हाण सर (केंद्रीय शिक्षक भारतीय बौद्ध महासभा ) यांचे प्रबोधनात्मक व्याख्यान झाले यात त्यांनी सर्व जनसमुदायाला मोलाचे मार्गदर्शन केले, त्यांनी संविधान निर्मिती व त्यासाठी बाबासाहेबांना करावा लागलेला संघर्ष तसेच आजचे सामाजिक वातावरण कसे बिघडत चालले आहे यावर प्रामुख्याने प्रकाश टाकला, त्यानंतर नितीन सर घोडके (संस्थापक अखिल भारतीय राष्ट्रसेवा संघ )यांचे आज भारतात बिघडत चाललेले सामाजिक वातावरण व ते रोखण्यासाठी काय केले पाहिजे यावर मोलाचे मार्गदर्शन केले व भारताचे सविधान देऊन पुस्तक बँक मध्ये पहिले खाते उघडले , त्यानंतर बाळासाहेब धेंडे यांनी संविधान ला वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन समाजात चाललेल्या अंधश्रद्धा रूढीवर भाष्य केले, प्रकाश आबा घोडके(मा. उपसरपंच पेडगाव ग्रामपंचायत ) यांनी शुभेच्छा दिल्या,पुढे प्रमुख पाहुणे राजू ओव्हळ (तालुका अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा ) यांनी कार्यक्रमाला उशीर झाल्या कारणाने संविधान ला वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन थोडक्यात मनोगत व्यक्त केले, शेवटी अध्यक्षीय भाषणात रेवन आप्पा घोडके यांनी या अनोख्या उपक्रमाचे कौतुक करून संविधान ला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या व बँकेत एक पुस्तकं जमा केले व त्यानंतर अन्नदानाचा कार्यक्रम झाला.
या कार्यक्रमाला रेवन आप्पा घोडके (मार्गदर्शक भारतीय बौध्द महासभा ) प्रशांत चव्हाण (केंद्रीय शिक्षक -भारतीय बौध्द महासभा ), राजू ओव्हळ (तालुका अध्यक्ष भारतीय बौध्द महासभा ), नितीन घोडके (संस्थापक, अखिल भारतीय राष्ट्र सेवा ), महेंद्र म्हस्के (संचालक, पेडगाव सोसायटी ), सौ. सूर्यमाला शिंदे (मा. ग्रामपंचायत सदस्य ), प्रकाश घोडके (मा. उपसरपंच पेडगाव ).सुमनताई घोडके (माझी ग्रामपंचायत सदस्य ), सविताताई घोडके (माझी सरपंच ), प्रकाश म्हस्के (पत्रकार ), शफिक हवालदार (पत्रकार ), हौसराव म्हस्के, भीमराव म्हस्के, राहुल घोडके, राजू भोसले, वैभव वनशिव, राजू शिंदे, संतोष शिंदे, प्रसाद साळवे, किरण शिंदे, सतीश साळवे, सचिन साळवे,विनोद म्हस्के,सनी म्हस्के, अजय म्हस्के, अनिकेत म्हस्के, संतोष साळवे, लखन शिंदे, बबन म्हस्के, सरतापे पाहुणे, ओम म्हस्के, अमोल घोडके नवनाथ घोडके , भाऊ घोडके , भाऊ घोडके, पपू ओव्हळ, युवराज घोडके, अमोल घोडके, बंडू शिंदे, शरद म्हस्के, अंबादास दिवटे , स्वप्नील साळवे, विनायक घोडके, संदीप ओव्हळ, यश ओव्हळ,सचिन धेंडे , दयाराम शिंदे, बलभीम घोडके, नितीन काकडे, सुनिल घोडके, सचिन घोडके,प्रविण घोडके, ओम घोडके, जीवन घोडके सह तथागत नगर पेडगाव मधील युवक कारकर्ते व मोठ्या संख्येने महिला वर्ग उपस्थित होता.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई
श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष
गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.
अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.
‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये
"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं
मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.
यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न
यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त
वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड
चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.