सुरक्षितेच्या दृष्टिकोनातून ट्रॅक्टर चालक-मालक यांची श्रीगोंदा कारखान्यावर मीटिंग.
By : Polticalface Team ,Thu Nov 25 2021 19:20:59 GMT+0530 (India Standard Time)
दिनांक 25/11/2021 रोजी श्रीगोंदा साखर कारखाना येथे ऊस वाहतूक सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून ट्रॅक्टर चालक - मालक यांची मिटिंग श्रीगोंदा कारखान्यावर मीटिंग घेण्यात आली. मिटिंगमध्ये चालक- मालक यांना रिफ्लेक्टर लावणे, टेप/वाद्य लावू नये, वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे,अपघात होणार नाही याची दक्षता घ्यावी इत्यादी सुचना देण्यात आल्या.
ऊस वाहतूक करणारे वाहने ट्रॅक्टर, ट्रक वाहनांना या वेळी रिफ्लेक्टर लावण्याची मोहिम राबविण्यात आली. मिटिंगकरीता कारखान्याचे चेअरमन राजेंद्रदादा नागवडे व सर्व संचालक मंडळ तसेच ट्रॅक्टर चालक-मालक उपस्थित होते.
वाचक क्रमांक :