कराड येथील राजेंद्र नागवडे यांच्या संबंधित असणाऱ्या कारखान्याचे ऊस बील थकविल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटना करणार वांगदरी येथे अर्धनग्न व मुंडन आंदोलन

By : Polticalface Team ,Fri Nov 26 2021 13:35:43 GMT+0530 (India Standard Time)

कराड येथील राजेंद्र नागवडे  यांच्या संबंधित असणाऱ्या  कारखान्याचे ऊस बील थकविल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटना करणार वांगदरी येथे अर्धनग्न व मुंडन आंदोलन श्रीगोंदा : सहकार महर्षी शिवाजीराव नारायणराव नागवडे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र शिवाजीराव नागवडे व त्याच्या पत्नी अ.नगर जिल्हा परिषदेच्या सदस्या अनुराधा राजेंद्र नागवडे यांच्या संबंधित असलेल्या सांगली सातारा जिल्ह्यातील श्रीकांत अॕग्रोटेक इंडट्रिज लि. सुरली ता.कराड येथे गुळाचा कारखाना असून या कारखान्यासाठी याभागातील शेतकऱ्यांकडून घेतलेल्या उसाच्या बिलाची दोन कोटी पंन्नास लाख रूपयाचे थकीत ऊस बीले दिले नसल्यामुळे नागवडे यांच्या वांगदरी येथील निवासस्थानासमोर दि.२७ नोहेंबर रोजी ऊस बीले मिळत नाही तो पर्यंत अर्धनग्न पध्दतीने ठिय्या व मुंडन आंदोलन करणार असल्याची माहिती सातारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष देवानंद पाटील यांनी दिली असुन या बाबतचे निवेदन श्रीगोंदा पोलिस स्टेशनला देण्यात आले आहे. या बाबत सविस्तर माहिती अशी कि सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे व पत्नी अनुराधा नागवडे यांच्या संबंधित असलेला श्रीकांत अॕग्रोटेक इंडस्ट्रिज लिमिटेड सुरली, कराड येथे गुळाचा कारखाना चालु करण्यात आला होता या कारखान्याने पलुस, कडेगाव, वाळवा, कराड, खटाव या परिसरातील ५५० शेतकऱ्याचे मार्च २०२० पर्यतचे ऊस बीले तसेच कामगार पगार, वाहतूक तोडणीदारांचे सुमारे २ कोटी ५० लाख रुपये दिलेले नाहीत या बिलांची वेळोवेळी मागणी केली असताना त्यांनी ऊडवाउडवीची उत्तरे देत या शेतकऱ्यांनी संपर्क केला तर त्याला प्रतीसाद दिला जात नसल्याने सांगली, सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या ऊसाची बीले जोपर्यंत दिली जात नाही तोपर्यंत श्रीगोदा तालुक्यातील वांगदरी येथील नागवडे यांच्या निवासस्थानासमोर सातारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने दि.२७ नोहेंबर पासून शेतकऱ्यांच्या सोबत अर्धनग्न पध्दतीने ठिय्या आंदोलन व मुंडन आंदोलन करणार असल्याची माहिती सातारा जिल्हाध्यक्ष देवानंद पाटील, वाळवा तालुका युवकचे तालुकाध्यक्ष रविकिरण माने, उपाध्यक्ष भास्करराव मोरे यांनी श्रीगोंदा येथे दिली. या बाबत श्रीगोंदा पोलिस ठाण्यात निवेदन देण्यात आले. चौकटः सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे साखर कारखान्याची निवडणूक तोंडावर आलेली असताना कराड येथील कारखान्याने शेतकऱ्यांच्या ऊसाची बीले थकविले असल्याने या बाबत तेथील शेतकऱ्यांचे नागवडे यांच्या निवासस्थानावर आंदोलन होणार असल्याने येणाऱ्या निवडणुकीत नागवडे यांच्या विरोधकांना आयते कोलीत मिळणार असल्याची चर्चा श्रीगोंदा तालुक्यात आहे.त्यामुळे नागवडे यांना ही निवडणूक डोकेदुखीची ठरणार की काय ? याची श्रीगोंदा तालुक्यात खमंग चर्चा.... फोटो : श्रीगोंदा येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने निवेदन देताना जिल्हाध्यक्ष देवानंद पाटील,रविकिरण माने,भास्कर मोरे आदी( छायाः योगेश चंदन )
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.