सहजपुर येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी, नेते भगवानराव वैराट यांच्या हस्ते झोपडपट्टी सुरक्षा संघटना शाखेचे जल्लोषात उद्घाटन
By : Polticalface Team ,08-08-2023
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड,
दौंड ता ०७ ऑगस्ट २०२३ दौंड तालुक्यातील मौजे सहजपुर येथिल अण्णाभाऊ साठे नगर ता,दौंड जिल्हा पुणे या ठिकाणी दि,०७ ऑगस्ट रोजी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०३ व्या जयंतीचे आयोजन करण्यात आले होते, महाराष्ट्र राज्य झोपडपट्टी सुरक्षा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा भगवानराव वैराट यांच्या हस्ते
अण्णाभाऊ साठे नगर, फलकाचे नामकरण आणि झोपडपट्टी सुरक्षा संघटना शाखेचे उद्घाटन करण्यात आले, या वेळी मान्यवरांच्या हस्ते
रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेंना पुष्पहार अर्पण करण्यात आले,
या प्रसंगी अण्णाभाऊ साठे नगर येथील समाज बांधवांच्या वतीने नेते
भगवानराव वैराट व पदाधिकारी यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला, झोपडपट्टी सुरक्षा संघटनेचे राज्य संघटक आबासाहेब चव्हाण, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष मोहम्मद शेख, पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस दत्ता कांबळे, पुणे जिल्हाध्यक्ष दत्तात्रेय डाडर, हडपसर शाखा अध्यक्ष रमेश शिंदे, शाहु भालेराव, माजी जिल्हा परिषद सदस्य मोहनराव म्हेत्रे दौंड कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक जीवनराव म्हेत्रे उपस्थित होते,
साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त सर्व बहुजन समाज एकवटला आहे, पूर्वी नैसर्गिक कारणावरून सन १९८० मध्ये खामगातुन दोन गावांचे विभाजन (स्थलांतर) झाले एक म्हणजे नांदूर व दुसरे सहजपुर,त्यामुळे गावात गायराण जमिन नाही,अण्णाभाऊ साठे नगर मध्ये शंभर ते दीडशे नागरिकांची लोक वस्ती स्थलांतर झाली असुन समाजाचे संघटन झाले नाही, भगवानराव वैराट साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली झोपडपट्टी सुरक्षा संघटनेचे आज उद्घाटन झाले आहे त्यामुळे अण्णाभाऊ साठे नगर येथील प्रलंबित असलेले प्रश्न तत्काळ मार्गी लागल्या शिवाय राहणार नाहीत असे माजी जिल्हा परिषद सदस्य मोहनराव म्हेत्रे यांनी बोलताना सांगितले, या वेळी रमेश शिंदे, शाहु भालेराव जिल्हा अध्यक्ष दत्तात्रय डाडर, यांनी अण्णाभाऊ साठे नगर,येथिल स्थानिक पातळीवर प्रलंबित असलेल्या जागे संदर्भात समाज बांधवांना मार्गदर्शन केले,
झोपडपट्टी सुरक्षा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बोलताना म्हणाले गावामध्ये सामाजिक ऐक्य आहे, चारी बाजूला बसलेली माणसं विविध विचारसरणीची जरी असले तरी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या निमित्तानं आपण एकत्र जमलोय अण्णाभाऊंच्या लेखणीतून ग्रामीण मराठी साहित्याला खरी प्रतिष्ठा जर कोणी मिळवून दिली असेल तर ती अण्णाभाऊ साठ्यांनी मिळवुन दिली असल्याची प्रतिक्रिया वैराट यांनी व्यक्त केली, ते बोलताना पुढे म्हणाले अण्णाभाऊंच्या साहित्य वास्तव्यातून लिहिलेल्या कथा कादंबऱ्या पहिल्या नंतर लक्षात येते अण्णाभाऊ हे विषमतावादी प्रवृत्तीच्या विरोधात होते, संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यासाठी अण्णांनी डफावर थाप टाकली नसती तर मुंबई आपल्या हाती लागली नसती, अण्णाभाऊ लढले कामगारांच्या व झोपडपट्टीतील रहिवासी यांच्या प्रश्नासाठी अण्णांची क्रांती ही देशासाठी होती, म्हणून अण्णांचे जे जे कोणी साहित्य वाचेल त्या साहित्यातून निघणारा विचार हा समाजाच्या हिताचा असणार आहे त्यामुळे खऱ्या अर्थाने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न मिळावा अशी प्रतिक्रिया झोपडपट्टी सुरक्षा दलाचे संस्थापक अध्यक्ष भगवानराव वैराट यांनी या जयंतीच्या निमित्ताने महाराष्ट्र शासनाला केली आहे,
सहजपुर अण्णाभाऊ साठे नगर येथील झोपडपट्टी सुरक्षा संघटनेचे शाखा (अध्यक्ष) पदी भूषण राजेंद्र नेटके, (उपाध्यक्ष) सुनील सखाराम शेंडगे, (खजिनदार) नामदेव काळूराम नेटके, (सचिव) चांगदेव बाळू कांबळे, (कार्याध्यक्ष) सचिन कचरू नेटके, (सरचिटणीस) मंगेश दादा कांबळे व संजय सखाराम शेंडगे, (सल्लागार) ओम विष्णू नेटके व विशाल सुनील शेंडगे, (सहसचिव) सोमनाथ गोविंद नेटके,(संघटक) विठ्ठल लक्ष्मण नेटके, (सहसंघटक) समीर दादा शेंडगे,
झोपडपट्टी सुरक्षा संघटनेची शाखा कार्यकारणी नेते भगवानराव वैराट यांच्या आदेशानुसार जिल्हाध्यक्ष दत्तात्रय डाडर व पदाधिकारीसह अण्णाभाऊ साठे नगर येथील जागे संदर्भात काही दिवसातच पुणे जिल्हा अधिकारी यांची भेट घेणार असल्याचे भगवानराव वैराट यांनी शाखेतील कार्यकर्त्यांना सांगितले,
या प्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य मोहनराव म्हेत्रे, दौंड कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक जीवनराव म्हेत्रे, सहजपुर ग्रामपंचायतीचे उपसरपंच रोहित मोहन म्हेत्रे, ग्रामपंचायत सदस्य प्रदीप वसंत गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य विशाल सुरेश म्हेत्रे, ग्रामपंचायत सदस्य अर्जुन लक्ष्मण म्हेत्रे, युवा नेते, दीपक भगवान राऊत, तेजस रंगनाथ म्हेत्रे, कामगार संघटना अध्यक्ष दिगंबर मोहिते, सामाजिक कार्यकर्ते उमेश म्हेत्रे, ज्ञानदेव म्हेत्रे, अभिनव गायकवाड, रोहिदास पाटोळे, जब्बर भाई शेख, संभाजी ब्रिगेडचे रसूलभाई मुलानी, कामगार संघटना अध्यक्ष महादेव राऊत, रमेश गायकवाड संदीप पिंगळे, संजय कुदळे संतोष शेंडगे परमेश्वर खंडागळे राजेंद्र जगताप बापू कुदळे, अर्जुन म्हेत्रे, राजू डावरे लक्ष्मण चौधरी, पोपट पाटोळे, गणेश गायकवाड, विष्णुपंत बोडके, महिला वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होते नंदा सुनील शेंडगे, वंदना कुंडलिक आडागळे, कोमल सचिन नेटके, लक्ष्मी भूषण नेटके, शितल सोमनाथ नेटके, महिला वर्ग युवा तरुण पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते
वाचक क्रमांक :
अनिल गायकवाड
दौण्ड प्रतिनिधी
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई
श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष
गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.
अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.
‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये
"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं
मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.
यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न
यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त
वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड
चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.