कडा येथील रस्ता रोको आंदोलनात मोठया संख्येने सहभागी व्हावे - डॉ.अजय दादा धोंडे
By : Polticalface Team ,Fri Nov 26 2021 21:44:11 GMT+0530 (India Standard Time)
आष्टी (प्रतिनिधी)
अतिवृष्टीचे अनुदान तात्काळ बँक खात्यावर वर्गकरून, विज बिल आठ हजार रुपये ऐवजी पाच हजार रुपये, शेतकऱ्यांचे तोडलेले वीज कनेक्शन तात्काळ जोडण्यात यावे या व आदी मागणीसाठी कडा येथे महावितरण कार्यालयासमोर शनिवार दि.२७ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता भव्य रस्ता रोको आंदोलन होणार आहे, तरी या रस्ता रोको आंदोलनात मोठया संख्येने सहभागी होण्याचे आवाहन भाजपा युवा मोर्चाचे बीड जिल्हा सरचिटणीस डॉ.अजय दादा धोंडे यांनी केले
आष्टी, पाटोदा, शिरूर (का) तालुक्यातील तसेच बीड जिल्ह्यातील शेतकरी वर्ग सध्या मोठ्या अडचणीमध्ये सापडला आहे. पाणी उपलब्ध असूनही तालुक्यातील महावितरण कंपनीने जवळपास सर्वच शेतकऱ्यांचे विद्युत कनेक्शन बंद केल्याने रब्बीच्या पिकांना पाणी देता येणे शक्य नाही यामुळे आधी अतिवृष्टी, कोरोना महामारी व यानंतर महावितरणने सुरू केलेल्या सक्तीच्या वीजबिल वसुलीमुळे शेतकरी वर्ग मोठ्या अडचणीत सापडला आहे. पश्चिम महाराष्ट्रात वीज कनेक्शनसाठी पाच हजार रुपये बिल घेऊन जोडणी सुरू करून देण्यात आली मात्र आष्टी, पाटोदा, शिरूर तसेच बीड जिल्ह्यात महावितरणकडून अन्यायकारकरित्या आठ हजार रुपये भरण्याची सक्ती शेतकऱ्यांना केली जात आहे आणि दुष्काळ, अतिवृष्टीचा सामना करावा लागल्याने शेतकरी वर्ग आर्थिक संकटात सापडलेला आहे. शेतकऱ्यांना वीज बिल भरण्यासाठी तीन हजार व दोन हजार रुपयांचे दोन टप्पे पाडून देऊन वीज बिल भरणा करून घेण्यात यावा व तात्काळ वीज जोडणी करून द्यावी तसेच अतिवृष्टीचे रखडलेले अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात यावे अशा अनेक शेतकरी हिताच्या मागण्याचे निवेदन आष्टी तहसिदार यांना देण्यात आले. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष ॲड.हनुमंतराव थोरवे, माजी सभापती बापुराव गर्जे, माजी नगरसेवक दादासाहेब गर्जे, बाळासाहेब शिंदे, माजी पं.सं.सदस्य बाबासाहेब गर्जे, एन.टी.गर्जे, दत्ताभाऊ बोडखे , भाजपा जिल्हा सचिव शंकरराव देशमुख, सरपंच सावता ससाणे, सरपंच चंद्रशेखर साके, रघुनाथ शिंदे, ॲड.खेडकर, सरपंच तात्यासाहेब कदम, आज्जुभाई शेख, अस्ताक शेख, आण्णासाहेब लांबडे, सदाशिव दिंडे पाटील, दादासाहेब जगताप, रेहान बेग, जाकेर कुरेशी, आस्लम आतार, विनोद निकाळजे, इम्रान खान, शाहनवाज पठाण, वसिम शेख, नितीन निकाळजे, निंबाळकर, अरुण सायकड, अजिनाथ बेल्हेकर, किरण धोंडे, आदी कार्यकर्ते, पदाधिकारी सरपंच, उपसरपंच मोठ्या उपस्थित होते.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
यवत येथील मतदान केंद्रावर दिवसभर मतदारांच्या रांगा. ईव्हीएम मशिन मात्र संत गतीने. उशीरा पर्यंत नागरिकांनी बजावला मतदानाचा हक्क.
शरद पवारांच्या सभेला आणलेल्या खुर्च्या. देवेंद्र फडणवीस यांच्या सभेत वापरल्या. तालुक्यात होतेय चर्चा
श्रीगोंदयाच्या आमदारकीवर नागवडेंचाच सर्वाधिक नैतिक अधिकार.
श्री काळभैरवनाथ जन्मोत्सव सोहळा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह सोहळा उत्साहात सुरू. यवत नगरीत भक्तीमय वातावरण.
श्रीगोंद्यात वंचित च्या सभेला रेकॉर्डब्रेक गर्दी, 3 साखर सम्राट विरोधात सामान्य शेतकऱ्यांचे मोठे आवाहन, सभेचा विरोधकांनी घेतला धसका
श्रीगोंद्यात धनगर समाज नागवडे सोबत- कोल्हटकर
वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार आण्णासाहेब शेलार यांच्या प्रचारार्थ आज 1वा.ॲड प्रकाश आंबेडकर यांची जाहीर सभा.गर्दीचा नवीन विक्रम होणार
विक्रम पाचपुते यांनी लोकांची फसवणूक करत गुन्हेगारीत विक्रम करत विकास कामात मोठ्या प्रमाणात टक्केवारी प्रमाणात वसुली केली तर नागवडे यांच्या 15 खोक्यांनी माझ्या तिकीटाचा सौदा केला - राहुल जगताप
महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ. अनुराधा नागवडे यांना बहुमताने विजय करा निधी कमी पडून देणार नाही उद्धव ठाकरे
सौ अनुराधाताईंना नागवडेंना प्रचंड मताने निवडून द्या विकासाची हमी आम्ही घेतो- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे
मतदान जनजागृती कार्यक्रम २०२४ अंतर्गत दौंड नगर परिषदेतर्फे सायकल रॅलीचे यशस्वी आयोजन: मुख्याधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विजय कावळे.
महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ अनुराधाताई नागवडे यांच्या उद्याच्या गर्दीचा उच्चांक होण्याची शक्यता
श्रीगोंद्यात मतदान अधिकारी मतदान कर्मचाऱ्यांचे द्वितीय प्रशिक्षण संपन्न
अनुराधाताई नागवडे यांच्या प्रचारार्थ 14 नोव्हेंबर रोजी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व काँग्रेसचे नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात श्रीगोंद्यात
दौंड - पुणे दैनंदिन प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांची आमदार राहुल कुल यांनी घेतली भेट, कुल यांना दौंडकर प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.
गौरी शुगर ऊसाला देणार जिल्ह्यात एक नंबरचा बाजार भाव चेअरमन बाबुराव बोत्रे पाटील
महायुतीने केलेल्या कामाचे श्रेय थोरात यांनी घेऊ नये- वैशाली नागवडे.
दौंड तालुक्याच्या विकासासाठी आम्ही राहुल कुल यांच्या बरोबर राहणार- आनंद थोरात.
सैनिक समाज पार्टीचे उमेदवार मा.विनोद साहेबराव साळवे यांनी घेतले शेख मोहम्मद महाराज यांचें दर्शन
अपक्ष उमेदवार माजी आमदार राहुल जगताप यांच्या गावभेट दौऱ्याला मिळतोय चांगला प्रतिसाद