दौंड पोलीस स्टेशन समोर भीम जन आक्रोश मोर्चा डॉ.भावनाताई गायकवाड अन्याय अत्याचार प्रकरणी पोलीस कर्मचाऱ्यांना कर्तव्याचा विसर पडला आहे काय? भीमसैनिकांचा सवाल
By : Polticalface Team ,21-08-2023
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड,
दौंड ता २१ ऑगस्ट २०२३ महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सहकारी पद्मश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांची नात डॉ.भावना ताई गायकवाड (धुमाळ) यांच्यावर झालेल्या अन्याय अत्याचारा विरुद्ध दौंड शहरातील भिम जन समुदाय ऐकवला दि.२१/०८/२०२३ रोजी भीम जन आक्रोश मोर्चामध्ये सहभागी झाले होते, दौंड येथील डॉ सदानंद धुमाळ व त्यांच्या कुटुंबीयांकडून स्वतःच्या पत्नीस व मुलीस जातिवाचक शिवीगाळ करून मारहाण केल्या प्रकरणी डॉ.सदानंद धुमाळ याचे विरुद्ध दौंड पोलीस स्टेशन येथे दि.१४/०८/२०२३ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता, सदर गुन्ह्यातील आरोपी डॉ.सदानंद धुमाळ हा दौंड पोलीस स्टेशन येथे हजर असताना देखील पोलिसांनी त्यास अटक न करता सोडून दिले असल्याने दौंड शहरात एकाच खळबळ उडाली होती, पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी आपल्या कर्तव्यात कसूर केला असल्याचाही आरोप करण्यात आला आरोपी डॉ.सदानंद धुमाळ यास पलायन करण्याची संधी उपलब्ध करून देणे, हे योग्य आहे का? हि बाब अतिशय गंभीर असल्याने दौंड पोलिसांना आपल्या कर्तव्याचा विसर पडला आहे काय ? असा सवाल समस्त भिमसैनिकांनी आक्रोश मोर्चाच्या माध्यमातून उपस्थित केला आहे, तसेच डॉ भावनाताई गायकवाड यांच्या वर झालेल्या जातिवाचक व मारहाण घटने प्रकरणी दौंड पोलीस प्रशासनाने हलक्यात घेऊ नये, अशी प्रतिक्रिया भिमसैनिकांनी व्यक्त केली, या वेळी आंबेडकरी चळवळीतील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पोलीस प्रशासनाच्या कर्तव्याबाबत निषेध नोंदवला असुन पोलीस प्रशासनाने घटनेची तीव्रता ओळखून सदर आरोपी डॉ सदानंद धुमाळ याला तत्काळ अटक करण्यात यावी,अन्यथा सदर घटनेची दखल राज्यातील भिमसैनिक घेतल्या शिवाय राहणार नाहीत अशी प्रतिक्रिया दौंड शहर व तालुक्यातील भिम सैनिकांनी व्यक्त करत इशारा दिला आहे.
दौंड पोलीस स्टेशन येथे मागासवर्गीय महिला डॉ भावना ताई गायकवाड (धुमाळ) यांची तक्रार घेण्यास तब्बल ११ तास (विलंब), तात्कळत ठेवल्या प्रकरणी संबंधित पोलीस अधिकारी यांच्या विरुद्ध कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली असून डॉ सदानंद धुमाळ याला सहकार्य करणारी त्याची प्रियसी व तिच्या सहकाऱ्यांवर (ॲट्रॉसिटी) अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात यावा, तसेच आरोपी डॉ सदानंद धुमाळ याला तत्काळ अटक करण्यात यावी अशी मागणी निवेदनात नमूद करण्यात आली आहे.
डॉ.भावना ताई गायकवाड (धुमाळ) या मागासवर्गीय महिलेवर झालेल्या अन्याय अत्याचारा विरुद्ध दौंड शहरातील समस्त भिमसैनिक
पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने भीम जन आक्रोश मोर्चामध्ये सहभागी झाले होते, दौंड शहरातील राजगृह बुद्ध विहार, आंबेडकर चौक ते संविधान स्तंभ चौक, दौंड पोलीस स्टेशन समोर भीम जनसमुदाय एकत्रित जमला होता, रवींद्र कांबळे, भारत सरोदे, नागसेन धेंडे, सतीश थोरात, नरेश डाळिंबे, सागर उबाळे, अमित सोनवणे, अश्विन वाघमारे, नागेश साळवे, राजू जाधव, सचिन खरात, संजीव आढाव,आदी भीमसैनिकांच्या निवेदनावर स्वाक्षरी आहेत, तसेच दौंड शहर व तालुक्यातील भीमसैनिक व महिला वर्ग मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
वाचक क्रमांक :
अनिल गायकवाड
दौण्ड प्रतिनिधी
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई
श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष
गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.
अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.
‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये
"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं
मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.
यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न
यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त
वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड
चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.