मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर
By : Polticalface Team ,Sun Nov 28 2021 08:58:30 GMT+0530 (India Standard Time)
पाथर्डी प्रतिनिधी:
भारत निवडणूक आयोगाने दि. १ जानेवारी २०२२ या अहर्ता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम २२२ पाथर्डी- शेवगाव विधानसभा मतदार संघाचे मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी देवदत्त केकाण यांनी प्रसिद्ध पत्रकाद्वारे घोषित केला आहे.
नजीकच्या काळात होणाऱ्या विविध निवडणुकांमध्ये मतदानापासून कोणीही मतदार वंचित राहू नये, याकरिता राज्य निवडणूक आयोगा तर्फे नवमतदार नोंदणीसाठी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर केलेला असून जास्तीत जास्त मतदारांनी नाव नोंदणी करण्याचे आवाहन मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी देवदत्त केकाण यांनी केले आहे. प्रसिद्धीपत्रकात केकाण यांनी म्हटले आहे की, ०१/०१/२०२२ वयाची अठरा वर्षे पूर्ण करणारा कोणताही नागरिक मतदार यादीत नाव समाविष्ट करू शकतो. नाव नोंदणीसाठी संपूर्ण मतदारसंघात मतदार केंद्रनिहाय केंद्रस्तरीय अधिकारी नेमलेले आहेत. ०५/०१/२०२२ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार असल्याने आगामी निवडणुकांमध्ये मतदानाचा हक्क बजावण्यासाठी १८ वर्षे पूर्ण झालेल्या पात्र नागरिकांनी आवश्यक त्या पुराव्यासह मतदार यादीत आपली नावे नोंदवावीत. तसेच विविध राजकीय पक्ष, पदाधिकारी, पत्रकार, सामाजिक संस्था यांनी मतदार जागृती करावी, असे आवाहन मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी देवदत्त केकाण यांनी केले आहे. आगामी बहुतेक मुदत संपलेल्या स्थानिक संस्था च्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये २०२२ मध्ये होत असून यासाठी ०५/०१/२०२२ रोजी अंतिम यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.
दि. २७ व २८ या दिवशी विशेष मतदार नोंदणी शिबिराचे आयोजन प्रत्येक मतदान केंद्र स्तरावर करण्यात आलेले आहे. यासाठी उपविभागीय अधिकारी देवदत्त केकाण यांनी २५ नोव्हेंबर रोजी पाथर्डी तालुक्यातील बीएलओ यांची बैठक घेऊन मार्गदर्शन केले. ०१/०१/२०२२ या अहर्ता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम, दि. २७ व २८ नोव्हेंबर २०२१ या कालावधीत मतदार नोंदणीसाठी विशेष शिबिराचे आयोजन आणि सुपर चेकिंग ऑफ फॉर्मस या बाबत घ्यायची दक्षता याविषयी केकाण यांनी मार्गदर्शन केले. या विशेष शिबिरामध्ये नाव नोंदणी सह यादीत पूर्वीपासून नावे असलेल्या मतदारांना आपल्या नावातील दुरुस्त्या करता येणे शक्य आहे. सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसीलदार शाम वाडकर तसेच नायब तहसीलदार संजय माळी हे स्वतंत्रपणे निवडणूक शाखेत मदत कक्ष उभारून मतदाराच्या शंकाचे निरक्षण करत आहेत. दि.०१/०१/२०२२ रोजी वयाची १८ वर्षे पूर्ण करणारा कोणताही व्यक्ती स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आगामी निवडणुकांमध्ये मतदानापासून वंचित राहणार नाही, यासाठी भारत निवडणूक आयोग यांचेकडून संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमाच्या निमित्ताने ०१ ते ३० नोव्हेंबर २०२१ या कालावधीत राबविण्यात येत आहे. यामध्ये अधिकाधिक पात्र नागरिकांनी मतदार यादीत नावे नोंदवावीत. तसेच आपल्या भागातील अथवा कुटुंबातील मयत व्यक्ती, दुबार समान नावे मतदार यादीतून वगळण्यासाठी आपल्या भागातील बीएलओ अथवा निवडणूक शाखेत विहित नमुन्याचा अर्ज दाखल करावा, असे आवाहन मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी देवदत्त केकाण यांनी केले आहे.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई
श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष
गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.
अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.
‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये
"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं
मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.
यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न
यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त
वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड
चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.