जुन्या पिढीतील सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक रतनराव बडवे गुरुजी यांचे दुःखद निधन
By : Polticalface Team ,24-08-2023
लिंपणगाव (प्रतिनिधी)- श्रीगोंदा तालुक्यातील लिंपणगाव येथील जुन्या पिढीतील सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक रतनराव तुळशीराम बडवे वय 81 यांचे नुकतेच अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. जुन्या पिढीत प्रार्थमिक शिक्षक म्हणून काम करत असताना एक हाडाचा शिक्षक म्हणून त्यांनी शिक्षण क्षेत्रात आपली कामगिरी बजावली. शिक्षण क्षेत्रात काम करत असताना जुन्या पिढीमध्ये विद्यार्थ्यांना अगदी तळमळीने संस्कार व शिक्षण देण्याचा त्यांनी पुरेपूर प्रयत्न केला. दिवंगत बडवे गुरुजी यांचा 1942 रोजी जन्म झाला. घरची परिस्थिती अत्यंत बिकट असताना त्यांनी त्याकाळी प्रतिकूल परिस्थितीत जुनी अकरावी मॅट्रिक पर्यंत शिक्षण घेऊन त्यांनी पुढे डीएड केले. त्यानंतर त्यांना 1963 रोजी प्राथमिक शिक्षक म्हणून अजनुज येथे नोकरीची संधी मिळाली. प्राथमिक शिक्षक म्हणून काम पाहत असताना अत्यंत शिस्तप्रिय शिक्षक म्हणून त्यांची त्याकाळी तालुक्यात ओळख निर्माण झाली.
सेवा कालावधीमध्ये दिवंगत बडवे गुरुजी यांनी अजनूज, आनंदवाडी, श्रीगोंदा कारखाना, कोळगाव, काष्टी, देऊळगाव गलांडे, लोणी व्यंकनाथ आदी गावांमध्ये प्राथमिक शिक्षक म्हणून त्यांना काम करण्याची संधी मिळाली. २००० साली काष्टी या तालुक्याच्या उपराजधानी समजलेल्या गावांमध्ये अखेर ते सेवानिवृत्त झाले. वरील ज्या ज्या गावांमध्ये प्राथमिक शिक्षक म्हणून त्यांना काम करण्याची संधी मिळाली त्याकाळी त्यांनी विद्यार्थ्यांवर उत्तम असे संस्कार करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी दिलेला संस्कारामुळे अनेक विद्यार्थी उच्च पदस्थ अधिकारी, डॉक्टर, इंजिनिअर तर काही विद्यार्थी परदेशामध्ये उच्च पदावर काम करत आहेत. त्यांची धर्मपत्नी देखील सेवानिवृत्त शिक्षिका आहेत तर थोरला मुलगा खंडेश्वर बडवे यांनी डॉक्टर ही पदवी घेतली. दुसरा मुलगा शशिकांत हे देखील तालुक्यातील एका नामवंत साखर कारखान्यात चीफ इंजिनियर म्हणून काम पाहत आहेत. त्यांच्या पक्षात पत्नी, दोन मुले, सुना, नातवंडे, एक भाऊ, आणि एक बहीण अशी त्यांची कौटुंबिक स्थिती आहे.
काल बुधवारी 23 ऑगस्ट रोजी दुपारी साडेतीन वाजता दिवंगत बडवे गुरुजी यांनी आपल्या निवासस्थानी अखेरचा श्वास घेतला, आणि त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाची बातमी गाव व तालुक्यात पसरताच सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्यावर बुधवारी सायंकाळी सात वाजता लिंपणगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी तालुक्यातील अनेक नेते व मान्यवर मंडळी तसेच लिंपणगाव पंचक्रोशीतील मोठा जनसमुदाय उपस्थित होता.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.
करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त
राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश
जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!
वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!
दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला
अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन
आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी
सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे
अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला
श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?
छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड
निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का
यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी
अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.
आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते
नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान
अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी
प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत
पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी