राजेंद्र नागवडे यांच्या आश्वासनानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन मागे.....

By : Polticalface Team ,Sun Nov 28 2021 09:16:05 GMT+0530 (India Standard Time)

राजेंद्र नागवडे यांच्या आश्वासनानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन मागे..... श्रीगोंदा : कराड येथील श्रीकांत अॕग्रोटेक इंडस्ट्रिज लिमिटेड सुरली येथे गुळाचा कारखान्याचा भागीदारीत होता.मात्र तेथील कारभार व्यवस्थित नसल्याने त्या कारखान्याचा राजीनामा दिला राजीनामा देण्याची आगोदर कारखाना भागीदारीत असल्याने त्याचा पूर्ण हिशोब करून दिला असल्याचे नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी वांगदरी येथील नागवडे यांच्या निवासस्थानी आंदोलन करण्याकरिता मोठ्या संख्येने आलेल्या शेतकऱ्यांना आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सातारा जिल्हाध्यक्ष देवानंद पाटील, वाळवा तालुका युवकचे तालुकाध्यक्ष रविकिरण माने यांना फोन वरून सांगत येत्या आठ दिवसांत सर्व भागीदार यांना एकत्र करून शेतकऱ्यांची तसेच वाहतुकदारांची देणी देण्याकरिता शेतकऱ्यांसह बैठक घेण्याचे आश्वासन दिल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि सातारा येथील शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले. कराड तालुक्यातील श्रीकांत अॕग्रोटेक इंडस्ट्रिज लिमिटेड सुरली येथे गुळाचा कारखान्याला दिलेल्या उसाचे पैसे तसेच कामगारांचे पगार आणि वाहतूक दारांचे पैसे दिले नसल्याचे सांगत नागवडे कारखान्याचे चेअरमन राजेंद्र नागवडे यांच्या निवासस्थानी आंदोलनं करण्याकरिता मोठ्या संख्येने आलेल्या शेतकऱ्यांची आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सातारा जिल्हाध्यक्ष देवानंद पाटील, वाळवा तालुका युवकचे तालुकाध्यक्ष रविकिरण माने यांची राजेंद्र नागवडे यांचे बंधू दिपक शेठ नागवडे आणि चिरंजीव पृथ्वीराज नागवडे यांनी चर्चा करत त्यांचे समाधान केले. सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांची पत्नी जिल्हा बँक संचालक अनुराधा नागवडे यांच्या भागीदारीतील कराड तालुक्यातील श्रीकांत अॕग्रोटेक इंडस्ट्रिज लिमिटेड सुरली येथे गुळाचा कारखाना होता मात्र हा कारखाना भागीदारीत असल्याने तेथील सहकाऱ्यांचा कारभार अनियमित तसेच चुकीचा असल्याचे लक्षात आल्या नंतर अनुराधा नागवडे यांनी ३० एप्रिल २०२१ रोजी गुळाच्या कारखान्यातील आपल्या संचालक पदाचा राजीनामा दिला.राजीनामा देण्याचे आगोदर नागवडे यांनी कारखाना भागीदारीत असल्याने त्याचा पूर्ण हिशोब करून दिला होता. मात्र उर्वरित संचालक यांनी त्या नंतर मनमानी कारभार करून शेतकऱ्यांचे, कामगारांचे तसेच वाहतूक दारांचे पैसे दिले नसल्याने शेतकऱ्यांनी वेळोवेळी त्या संचालकाकडे मागणी केली असता त्यांनी पैसे दिले नसल्याचे सांगत राजेन्द्र नागवडे यांनी आपला या शेतकऱ्यांचे पैसे थकविण्यात कोणताही संबंध नाही असे सांगितले. चौकट : निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन विरोधकांचे नागवडे यांना बदनाम करण्याचे षडयंत्र : पृथ्वीराज नागवडे.... माझे आजोबा स्व.बापू यांनी आपले आयुष्य शेतकऱ्यासाठी झिजविले आहे. शेतकऱ्यांसाठी सहकारी कारखाना उभा करून शेतकऱ्यांचा कधीही एकही रुपया थकविला नाही त्याच प्रमाणे वडील राजेंद्र नागवडे हे देखील कारखान्याचा कारभार करत असताना शेतकरी हिताचा विचार डोळ्यासमोर ठेवत कारभार करत आहेत मात्र सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे साखर कारखान्याची निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन तालुक्यातील विरोधकांनी सातारा सांगली येथील संघटनेला व शेतकऱ्यांना रसद पुरवत आमच्या दारासमोर आंदोलनं करत आम्हाला बदनाम करण्याचे षडयंत्र रचले होते मात्र जनता हुशार आहे असे युवक नेते पृथ्वीराज नागवडे यांनी सांगितले.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

यवत येथील मतदान केंद्रावर दिवसभर मतदारांच्या रांगा. ईव्हीएम मशिन मात्र संत गतीने. उशीरा पर्यंत नागरिकांनी बजावला मतदानाचा हक्क.

शरद पवारांच्या सभेला आणलेल्या खुर्च्या. देवेंद्र फडणवीस यांच्या सभेत वापरल्या. तालुक्यात होतेय चर्चा

श्रीगोंदयाच्या आमदारकीवर नागवडेंचाच सर्वाधिक नैतिक अधिकार.

श्री काळभैरवनाथ जन्मोत्सव सोहळा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह सोहळा उत्साहात सुरू. यवत नगरीत भक्तीमय वातावरण.

श्रीगोंद्यात वंचित च्या सभेला रेकॉर्डब्रेक गर्दी, 3 साखर सम्राट विरोधात सामान्य शेतकऱ्यांचे मोठे आवाहन, सभेचा विरोधकांनी घेतला धसका

श्रीगोंद्यात धनगर समाज नागवडे सोबत- कोल्हटकर

वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार आण्णासाहेब शेलार यांच्या प्रचारार्थ आज 1वा.ॲड प्रकाश आंबेडकर यांची जाहीर सभा.गर्दीचा नवीन विक्रम होणार

विक्रम पाचपुते यांनी लोकांची फसवणूक करत गुन्हेगारीत विक्रम करत विकास कामात मोठ्या प्रमाणात टक्केवारी प्रमाणात वसुली केली तर नागवडे यांच्या 15 खोक्यांनी माझ्या तिकीटाचा सौदा केला - राहुल जगताप

महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ. अनुराधा नागवडे यांना बहुमताने विजय करा निधी कमी पडून देणार नाही उद्धव ठाकरे

सौ अनुराधाताईंना नागवडेंना प्रचंड मताने निवडून द्या विकासाची हमी आम्ही घेतो- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे

मतदान जनजागृती कार्यक्रम २०२४ अंतर्गत दौंड नगर परिषदेतर्फे सायकल रॅलीचे यशस्वी आयोजन: मुख्याधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विजय कावळे.

महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ अनुराधाताई नागवडे यांच्या उद्याच्या गर्दीचा उच्चांक होण्याची शक्यता

श्रीगोंद्यात मतदान अधिकारी मतदान कर्मचाऱ्यांचे द्वितीय प्रशिक्षण संपन्न

अनुराधाताई नागवडे यांच्या प्रचारार्थ 14 नोव्हेंबर रोजी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व काँग्रेसचे नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात श्रीगोंद्यात

दौंड - पुणे दैनंदिन प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांची आमदार राहुल कुल यांनी घेतली भेट, कुल यांना दौंडकर प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.

गौरी शुगर ऊसाला देणार जिल्ह्यात एक नंबरचा बाजार भाव चेअरमन बाबुराव बोत्रे पाटील

महायुतीने केलेल्या कामाचे श्रेय थोरात यांनी घेऊ नये- वैशाली नागवडे.

दौंड तालुक्याच्या विकासासाठी आम्ही राहुल कुल यांच्या बरोबर राहणार- आनंद थोरात.

सैनिक समाज पार्टीचे उमेदवार मा.विनोद साहेबराव साळवे यांनी घेतले शेख मोहम्मद महाराज यांचें दर्शन

अपक्ष उमेदवार माजी आमदार राहुल जगताप यांच्या गावभेट दौऱ्याला मिळतोय चांगला प्रतिसाद