लसीकरणासाठी जिल्हाशल्यचिकीत्सक रस्तावर ! आष्टीत चेकपोस्ट लावून केली तपासणी व 140 जणांचे लसीकरण
By : Polticalface Team ,Sun Nov 28 2021 19:58:44 GMT+0530 (India Standard Time)
आष्टी(प्रतिनिधी)-लसणीकरण जास्तीत जास्त करण्यासाठी स्वत:जिल्हाधिकारी,शल्यचिकीत्सकच रस्तावर उतरून लसीकरण करत आहेत.आष्टी येथे बीडचे जिल्हाशल्यचिकीत्सक डाॅ.सुरेश साबळे यांनी चेकपोस्टवर थांबून सुमारे 150 जणांचे लसीकरण केले आहे.
आष्टी येथे ग्रामिण रूग्णालयाच्यावतीने आज रविवार दि.28 रोजी सकाळ पासूनच नगर बीड रोडवर शहरात चेकपोस्ट लावून लसणीकरणाची मोहीम सुरू होती.दुपारपर्यंत फक्त आठ जणांचे लसीकरण झाले होते.यावेळी दुपारी अडीच च्या दरम्यान स्वत;शल्यचिकीत्सक आष्टी येथे येथून लसीकरणास उतरल्याने सुमारे 150 जणांचे लसीकरण करण्यात आले.यावेळी वैद्यकीय अधिक्षक डाॅ.राहूल टेकाडे,वैद्यकीय अधिकारी डाॅ.रामदास मोराळे,डाॅ.बालाजी गुट्टे यांच्यासह आदि अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
वाचक क्रमांक :