प्रा. अजिंक्य भोर्डे यांच्या संशोधनास भारत सरकारचे पेटंट
By : Polticalface Team ,Sun Nov 28 2021 19:59:53 GMT+0530 (India Standard Time)
पाथर्डी प्रतिनिधी:
श्री तिलोक जैन प्रसारक मंडळाचे श्री आनंद महाविद्यालय पाथर्डी येथे कार्यरत असलेले प्रा. अजिंक्य भोर्डे यांना "स्मार्ट वेस्ट टू डिटेक्ट फ्ल्युड इन लंग्स" या संशोधनास नुकतेच भारत सरकारचे पेटंट जाहीर झाले आहे.
या त्यांच्या यशाबद्दल महाविद्यालयाच्या वतीने संस्थेचे सचिव सतिश गुगळे व विश्वस्त राजुशेठ मुथा यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
तसेच प्रा. डॉ. विकास गाडे यांच्या शैक्षणिक आणि सामाजिक उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ प्रणित प्रोटान, नवी दिल्ली अंतर्गत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे प्रोटान विंगच्या वतीने देण्यात येणारा "राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले विद्यापीठ स्तरीय सत्यशोधक गुणवंत प्राध्यापक पुरस्कार" मिळाल्याबद्दल महाविद्यालयाच्या वतीने संस्थेचे खजिनदार सुरेश कुचेरीया यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शेषराव पवार यांनी आपल्या भाषणात महाविद्यालयातील प्राध्यापकांनी मिळवलेल्या यशाबद्दल आनंद व्यक्त केला व अभिनंदन केले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष सतीश गुगळे यांनी प्रा. अजिंक्य भोर्डे व प्रा. डॉ. विकास गाडे यांचे अभिनंदन केले व त्यांनी मिळविलेल्या यशाबद्दल आनंद व्यक्त केला.
या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शेषराव पवार, संस्थेचे सचिव सतिश गुगळे, खजिनदार सुरेश कूचेरिया, विश्वस्त राजुशेठ मुथा, महविद्यालातील सर्व शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. जयश्री खेडकर यांनी केले. प्रास्ताविक प्रा. अनिता पावसे यांनी केले तर प्रा. सूर्यकांत काळोखे यांनी सर्वांचे आभार मानले.
वाचक क्रमांक :