पुरोगामी जनार्दन तुपे आणि गोविंद सरोदे यांनी शिक्षण क्षेत्रात केला मागासवर्गीय समाजावर अन्याय--विवेक कुचेकर
By : Polticalface Team ,Sun Nov 28 2021 20:03:20 GMT+0530 (India Standard Time)
बीड (प्रतिनिधी)
स्वतःला पुरोगामी म्हणून घेणारा आणि मागासवर्गीय समाजाच्या मतावर आमदारकी मिळवलेल्या माजी आमदार भाई जनार्दन तुपे यांना मागासवर्गीयांचा एवढा तिरस्कार का ? असा संतप्त सवाल लोकराजा छञपती शाहू महाराज विचार मंचचे संस्थापक अध्यक्ष तथा वंचित बहुजन आघाडीचे बालाघाट नेते विवेक (बाबा)कुचेकर यानी उपस्थित केला आहे
डाव्या विचारसरणी असलेल्या शेतकरी कामगार पक्षातर्फे बहुजनांच्या मतावर आमदारकी मिळवून समाजसेवेच्या नावाखाली शिक्षण संस्था काढून भाई उद्धवराव पाटील यांच्यासारख्या निस्वार्थी पुरोगामी नेत्यांच्या नावाने चालवलेल्या शिक्षण संस्थेत मागासवर्गीय पदावर ओपनचा शिक्षक नेमून मागासवर्गीय शिक्षकांना डावलण्याचा आणि मागासवर्गीय शिक्षकांना त्रास देण्याचा प्रकार सध्या जनार्धन तुपे आणि गोविंद सरोदे यांनी केल्याचे उघड झाले असून मुस्लिम सह मागासवर्गीय शिक्षक संघटना पुरोगामी म्हणवणाऱ्या माझी आमदार जनार्दन तुपे आणि गोविंद सरोदे यांना विचारत असून तोंडावर त्यांना नावे ठेवतांना दिसत आहेत.
जनार्दन तुपे यांनी जीवन शिक्षण प्रसारक मंडळाच्या नावाने शिक्षण संस्था उघडण्यात आली. त्या शिक्षण संस्थेत त्याकाळातील शेतकरी कामगार पक्षासाठी उभी हयात घालून तन, मन,धन लावून पक्ष मोठा करण्यामध्ये भाई रफीक शेख यांचा सिंहाचा वाटा होता. म्हणून त्यांना या शिक्षण संस्थेत अध्यक्ष पद देऊन जीवन शिक्षणसंस्थेचे रोपटे लावले आणि दोन शाळा सुरू केल्या गेल्या. भाई शेख रफिक यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटूंबाला फसवण्याचे महापाप जनार्दन तुपे आणि गोविंद सरोदे यांनी केले. तसेच या दोन संस्थेच्या शाळेमध्ये एक ओपन आणि दुसरा अनुसूचित जाती प्रवर्गातील मुख्याध्यापक पद भरणे आवश्यक असतांना अनुसूचित जातीच्या जागेवर ब्राम्हण शिक्षक भरून मागासवर्गीय शिक्षकांना सुध्दा डावलण्यात आले.
शाळेचे नावही पुरोगामी वाटावे म्हणून जय किसान आणि भाई उद्धाराव पाटील असे ठेवण्यात आले परंतु जनार्दन तुपे आणि गोविंद सरोदे यांनी मागासवर्गीय शिक्षकांना डोनेशन च्या नावाखाली त्रास देण्यास सुरुवात केली. ब्राम्हण मुख्याध्यापक च्या माध्यमातून संस्थेसाठी डोनेशन मागायला सुरुवात केली. डोनेशन दे नाहीतर राजीनामा दे म्हणून गेली पाच वर्षे मागासवर्गीय शिक्षकांना त्रास देणे चालू आहे. मागासवर्गीय शिक्षकांच्या जागी ओपन चे शिक्षक भरून एस टी जमातीतील जागेवरवरतीही ओपन प्रवर्गाचा शिक्षक भरून पुन्हा मागासवर्गीय शिक्षकांना डावलण्यात आले अश्या पद्धतीने पुरोगामी विचारांचा बुरखा घालून मिरवणाऱ्या जनार्दन तुपे व प्रा. गोविंद सरोदे यांना अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती बद्दल किती रोष आणि तिरस्कार आहे यावरून पहावयास मिळत आहे.
आधीच शतकानुशतके उपेक्षित वंचीत समाजाला अधिकारापासून वंचित ठेवून पुरोगामी म्हणवून घेणारे समाजामध्ये उजळ माथ्याने कसे मिरवतात. आणि शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रात स्वतःची कशी पोळी भाजून घेतात यावरून बाहेरून कीर्तन आतून तमाशा करण्याचे काम काही नीच वृत्तीची माणसे करतांना दिसतात, हे निश्चितच निंदणीय आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अनु.जाती अनु.जमाती यांना आरक्षणाच्या माध्यमातून अधिकार मिळावेत म्हणून संविधानात तरतूद करून ठेवलेली असतानाच अश्या स्वार्थी आणि पुरोगामी म्हणवणाऱ्या व्यक्ती कश्या शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्राला बदनाम करतात आणि शिक्षण विभाग कसे डोळे झाकून कायदा राबवतात
सामाजिक न्याय मंत्री धंनजय मुंडे यांच्या जिल्ह्यात असा मागासवर्गीय शिक्षकावर होणारा अन्याय उघड्या डोळ्याने शिक्षण विभाग पाहत असेल तर न्याय कोणाकडे मागावा अशी चर्चा शिक्षण क्षेत्रात व मागासवर्गीय कर्मचाऱ्यांमध्ये होत आहे.
मध्यंतरी शरद पवार यांनी महाराष्ट्रातील बर्याच मागासवर्गीय साहित्यिक, पत्रकार ,कवी आणि सामाजीक कार्यकर्त्या बरोबर चर्चा करून समाजाच्या आशा, अपेक्षा काय आहेत .. या ऐकून घेऊन मागासवर्गीय समाजाला पोषक असे राजकारण करण्याचा शब्द दिला होता. पुरोगामी चळवळीतील कार्यकर्ते राष्ट्रवादी पक्षात आले पाहीजे , हि त्यामागील त्यांची भूमिका होती. एकिकडे चर्चा आणि दुसरीकडे आपल्याच पक्षातील न्यायमंत्री मागासवर्गीयांना न्याय देण्याचे काम करत नसतील तर याची किंमत भविष्यात राष्ट्रवादी पक्षाला मोजावी लागेल असा इशारा लोकराजा छञपती शाहू महाराज विचार मंचचे संस्थापक अध्यक्ष तथा वंचित बहुजन आघाडीचे बालाघाट नेते विवेक (बाबा )कुचेकर यांनी दिला आहे .
वाचक क्रमांक :