दौंड तालुका क्रीडा संकुल समितीची बैठक आमदार राहुल कुल यांच्या उपस्थितीत संपन्न. क्रीडा संकुल व नाट्यगृहासाठी १० एकर जमीन महसूल विभागाकडे हस्तांतरित.

By : Polticalface Team ,15-09-2023

दौंड तालुका क्रीडा संकुल समितीची बैठक आमदार राहुल कुल यांच्या उपस्थितीत संपन्न. क्रीडा संकुल व नाट्यगृहासाठी १० एकर जमीन महसूल विभागाकडे हस्तांतरित. दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड. दौंड ता १५ सप्टेंबर २०२३. दौंड तालुका क्रीडा संकुल समितीची बैठक दौंड तालुक्याचे आमदार राहुल कुल यांच्या अध्यक्षतेखाली दौंड येथे पार पडली. महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री मा देवेंद्रजी फडणवीस यांच्या कार्यकाळात दौंड तालुका कृषी विभागाकडील बीजगुणन केंद्राची जमीन. दौंड क्रीडा संकुल व नाट्यगृहासाठी मागणीचा प्रस्ताव पाठविण्यात आला होता. त्या अनुषंगाने आमदार राहुल कुल यांनी पाठपुरावा केल्याने महाराष्ट्र राज्य शासनाने दखल घेऊन दौंड क्रीडा संकुल व नाट्यगृहासाठी कृषी विभागाकडील बीजगुणन केंद्राची १० एकर जमीन दौंड तहसील कार्यालय महसूल विभागाकडे हस्तांतरित करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच या क्रीडा संकुलासाठी सुमारे ९.५० कोटी रुपयांची तरतूद करुन निधी मंजुर करण्यात आला आहे. त्या पैकी संरक्षक भिंत बांधकाम करण्यासाठी सुमारे १ कोटी ५० लक्ष रुपये निधी उपलब्ध करून संरक्षण भिंतीचे बांधकाम प्रगतीपथावर असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
पुढील येणाऱ्या काळात उपलब्ध झालेल्या जागेमध्ये क्रीडा संकुल साठी समतलीकरण निश्चित करण्यात आले आहे त्यामध्ये, ४०० मीटरचा रनिंग ट्रॅक, कबड्डी, खो -खो, व्हॉलीबॉल, लॉन टेनिस.व बास्केटबॉल या खेळांसाठी मैदान व सुविधा उपलब्ध करण्यासाठी सुमारे २ कोटी रुपयांच्या कामांचे अंदाजपत्रक तयार करण्या बाबत या बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली. या वेळी सदर अंदाजपत्रक तत्काळ तयार करून कामाला सुरुवात करण्यात यावी. मैदानाचा आराखडा करताना पावसाच्या पाण्याचा योग्य निचरा होईल याची काळजी घ्यावी, खेळाडूंना अपेक्षित व आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध व्हाव्यात अशी व्यवस्था करण्याच्या सूचना या बैठकीत संबंधितांना देण्यात आल्या आहेत.
या प्रसंगी दौंड तालुका क्रीडा संकुल समितीचे कार्याध्यक्ष व दौंड तहसीलदार मा.अरुण शेलार, जिल्हा क्रीडा अधिकारी मा.महादेव कसगावडे, तालुका क्रीडा अधिकारी मा.महेश चावले, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहय्यक अभियंता (श्रेणी-१) मा.मयूर सोनवणे, गटविकास अधिकारी मा अजिंक्य येळे, महावितरणचे उपभियंता मा. चव्हाण, गटशिक्षणाधिकारी मा. संजय महाजन.या बैठकीत प्रामुख्याने उपस्थित होते.

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


अनिल गायकवाड
दौण्ड प्रतिनिधी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.