पञकाराच्या मदतीने व श्रीगोंदा पोलिसांच्या तत्परतेने हिंगोलीचा मुलगा त्याच्या आई वडिलांना सुखरुप मिळाला.
By : Polticalface Team ,Wed Dec 01 2021 13:43:50 GMT+0530 (India Standard Time)
श्रीगोंदा तालुक्यातील टाकळी कडेवळीत येथे दि 28 रोजी येक तरुण रात्री दहा वाजता गावाजवळ फिरत आसल्याची माहिती पोलिस पाटील किशोरचंद वाळुंज यांना मिळाली पोलिस पाटलांनी लगेच पत्रकार ज्ञानेश्वर येवले यांना माहिती दिली पोलिस पाटील व पञकार येवले यांनी गावातील विजयसींह नवले, आशोक वाळुंज, गणेश सोनवणे आनंदा सोनवणे या तरुणांची मदत घेत त्या तरुणाची चौकशी केली परंतु तो तरुण काहीच बोलत नव्हता शेवटी येवले पञकारांनी पोलिसांना माहिती दिली पोलिसांनी तत्परता दाखवत पोलीस टाकळीमध्ये आले व त्या तरुणाला श्रीगोंदा पोलिस स्टेशनला घेऊन गेले. तिथे त्या तरुणाची चौकशी केली त्या वेळी त्या तरुणाने त्याचे नाव तुकाराम उमराव जाधव रा वसमत, हिंगोली असल्याचे कागदावर लिहुन दिले त्याच्या गावातील काही मोबाईल नंबरही पोलीसांना दिले. पोलिसांनी दिलेले मो.नं वर फोन केला असता तो तरुण आमच्याच गावचा आहे आसे सांगितले त्याच्या घरच्यांशी संपर्क साधुन आज त्या तुकाराम जाधव ला त्याच्या घरच्यांना देण्यात आले पोलिस पाटिल पञकार व पोलिसांचे त्या तरुणांच्या घरच्यांनी आभार मानले .
वाचक क्रमांक :