उरुळी कांचन येथे समता सैनिक दलाचे प्रशिक्षण परेड शिबीर संपन्न. हीच समाजातील संघटित व शिस्तबद्ध कार्य करणारी आदर्श जीवनशैली- जिल्हा अध्यक्ष अरुण सोनवणे.

By : Polticalface Team ,01-10-2023

उरुळी कांचन येथे समता सैनिक दलाचे प्रशिक्षण परेड शिबीर संपन्न. हीच समाजातील संघटित व शिस्तबद्ध कार्य करणारी आदर्श जीवनशैली- जिल्हा अध्यक्ष अरुण सोनवणे. दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड. दौंड ता ०२ ऑक्टोबर २०२३.भारतीय बौद्ध महासभा. समता सैनिक दलाच्या महा रेजिमेंटची स्थापना दि.०१ ऑक्टोबर १९४१ साली विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली होती. या दिनाचे औचित्य साधून. भारतीय बौद्ध महासभा पुणे जिल्हा पूर्व तसेच हवेली तालुका शाखेच्या वतीने समता सैनिक दलातील युवा तरुणांना शिबीर व परेड प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन. उरुळी कांचन तालुका हवेली जिल्हा पुणे.येथील साईनगर तुपे वस्ती येथे रविवार दि ०१ ऑक्टोबर २०२३ रोजी करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मा सुनील अवचार.पूर्व हवेली तालुका अध्यक्ष यांनी स्विकारले होते. तर ध्वजारोहण मा अनिल सोनवणे पूर्व पुणे जिल्हा संरक्षण उपाध्यक्ष यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी पुणे जिल्हा पूर्व अध्यक्ष मा अरुण सोनवणे यांनी मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले समता सैनिक दल हीच समाजातील संघटित व शिस्तबद्ध कार्य करणारी एकमेव आदर्श जीवनसैली आहे. ग्रामीण भागातील युवा तरुणांनी समता सैनिक दल ग्राम शाखा उभारण्यात याव्यात अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे. या कार्यक्रमात समता सैनिक दलातील एकुण ८५ सैनिकांनी परेड शिबीर प्रशिक्षणासाठी सहभागी झाले होते.
या शिबिराचे प्रशिक्षक असिस्टंट लेफ्टन जनरल पी एस ढोबळे सर व सीनियर डिव्हिजन ऑफिसर सुभाष कांबळे सर यांनी युवा तरुण शैनिकांना परेड साठी महत्वपूर्ण मार्गदर्शन करून महत्वाची कामगिरी बजावली.सकाळी १० वा जे दरम्यान शिबिराला सुरुवात करण्यात आली होती. या प्रसंगी परीसरातील मान्यवर उपासक उपासिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली होती. तसेच समता सैनिक दलाच्या शिबीर व परेड कार्याकडे उपस्थित मान्यवरांचे लक्ष वेधले होते. उरुळी कांचन साईनगर तुपे वस्ती ग्राम शाखा अध्यक्ष कैलास शिंदे यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार व्यक्त केले. तसेच कोषाध्यक्ष सखाराम ओव्हाळ. भीमराव घायवान. दत्तात्रय शेंडगे. सोमनाथ शेलार. विशाल गायकवाड. महेश गायकवाड. निलिमा कांबळे पूर्व हवेली उपाध्यक्ष बाळासाहेब कांबळे या स्थानिक मान्यवरांनी परेड प्रशिक्षण शिबिराचा कार्यक्रम भर पावसात यशस्वी केला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय गायकवाड गुरुजी यांनी केले
या प्रसंगी पुणे जिल्हा पूर्वचे सरचिटणीस मेजर राजरत्न थोरात, जिल्हा कोशाध्यक्ष संतोष आरवडे गुरुजी, संस्कार उपाध्यक्ष चंद्रकांत गायकवाड गुरुजी, प्रचार उपाध्यक्ष वामन वाघमारे गुरुजी, जिल्हा कार्यालयीन सचिव अशोक शिंदे गुरुजी,जिल्हा सचिव किशोर कांबळे गुरुजी. अध्यक्ष सुनील अवचार व त्यांचे सर्व कार्यकारिणी पदाधिकारी तसेच सीनियर डिव्हिजन ऑफिसर किशोर कांबळे, नागसेन ओव्हाळ कंपनी कमांडर रवींद्र कदम, ग्राम शाखा उरळी कांचन सरचिटणीस परमेश्वर कदम. दत्ता गायकवाड, सुनील सावळे, संजय गायकवाड. आदी स्थानिक बौद्ध उपासक उपासिका मांन्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


अनिल गायकवाड
दौण्ड प्रतिनिधी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.