यवत पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे पाटस येथील सिद्धिविनायक पेट्रोल पंपावरील कामगाराला पिस्तूल चा धाक दाखवून दोन चोरट्यांनी ४ हजार रुपये पळवले.
By : Polticalface Team ,01-10-2023
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड.
दौंड ता ०२ ऑक्टोबर २०२३ यवत पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे पाटस येथील सिद्धिविनायक पेट्रोल पंपावरील कामगाराला पिस्तूल चा धाक दाखवून व मारहाण करून दोन चोरट्यांनी ४ हजार रुपये पळवले असल्याची धक्कादायक घटना दि.३०/०९/२०२३ रोजी रात्री ११:२० वा.जे.सुमारास घडली.असल्याने फिर्यादी श्रीधर अशोक भागवत वय वर्ष २९ रा पाटस (गार फाटा) तालुका दौंड जिल्हा पुणे यांच्या तक्रारीवरून यवत पोलीस स्टेशन येथे.आरोपी १) अनिकेत दादासो ढोपे.२२ वर्ष रा.शेळगाव ता इंदापूर जिल्हा पुणे. २) धनंजय लक्ष्मीनारायण हगारे २० वर्ष रा, अंथूरणे ता.इंदापुर. जिल्हा पुणे.या चोरट्यांविरुद्ध गु.र.नं. १२७६/२०२३ भा द वी कलम ३९४.३४. शस्त्र अधि कलम ४ (२५), फौज सु का कलम ७ अंन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर घटना मौजे पाटस ता.दौंड जि.पुणे गावचे हददीत सिध्दीविनायक पेट्रोल पंपावर घडली असून सदर गुन्ह्यातील दोन्ही आरोपीस यवत पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी सांगितले.
हकीगत ता. ३०/९/२०२३ रोजी रात्रौ ११:२० वाजे सुमारास मौजे पाटस ता. दौंड जि.पुणे गावचे हददीत सिध्दीविनायक पेट्रोल पंपावर फिर्यादी नेहमीप्रमाणे काम करीत असताना दोन अनोळखी इसम नाव पत्ता माहीत नाही हे त्यांचेकडील एक टी.व्ही.एस कंपनीची आपाची आर.टी.आर.४ आर मोटार सायकल नंबर नसलेली या वरुन येवुन त्यांचे गाडीत पेट्रोल भरुन त्यापैकी एका इसमाने त्यांचे कडील बॅगेतील पिस्तुल काढुन तो फिर्यादीच्या उजवे कानाजवळ लावुन पिस्तुलचा धाक दाखवुन तुझेकडे असलेले सर्व पैसे काढ नाहीतर तुला गोळया घालीन अशी धमकी देवुन फिर्यादीच्या शर्टच्या खिशात जबरदस्तीने हात घालुन खिशातील ४ हजार रुपये रोख रक्कम जबरीने काढुन त्याचे सोबत असलेल्या दुस-या इसमाने त्याचे हातातील धारदार लोखंडी कोयत्याच्या चपटया बाजुने फिर्यादीच्या पाठीवर डावे बाजुस अपखुशीने मारहाण करुन दुखापत केली आहे. असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे
यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली दाखल अंमलदार पोलीस सहाय्यक उपनिरीक्षक शेख. व
एस ऐ.नागरगोजे. पोलीस उपनिरीक्षक पुढील तपास करीत आहे.
वाचक क्रमांक :