यवत स्टेशन जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत. महात्मा गांधी व लाल बहाददूर शास्त्री यांची जयंती. विद्यार्थी मुला मुलींच्या विविध स्पर्धा आयोजित करुन साजरी
By : Polticalface Team ,03-10-2023
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड.
दौंड ता.०३ ऑक्टोबर २०२३. दौंड तालुक्यातील मौजे यवत ता दौंड जिल्हा पुणे येथील यवत स्टेशन जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत. दिनांक २ आॕक्टोबर २०२३.रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहाददूर शास्त्री यांची जयंती शाळेतील विद्यार्थी मुला मुलींच्या विविध स्पर्धा आयोजित करुन साजरी करण्यात आली. या कार्यक्रमांच्या निमित्ताने मागील १५ दिवसांपासून विद्यार्थ्यांकडून विविध स्पर्धा सरावांची तयारी करण्यात आली होती. त्यामध्ये चित्रकला स्पर्धा. रांगोळी स्पर्धा. तसेच वक्तृत्व स्पर्धांचे आयोजित करण्यात आल्या होते.
१ आॕक्टोबर रोजी सकाळी १० ते ११ या वेळेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील सर्व शिक्षक विद्यार्थी तसेच पालकांनी श्रमदानातून शाळेच्या परिसरातील प्राणांगणात स्वच्छता मोहिम अभियान राबविण्यात आले होते. २ आॕक्टोबर रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहाददूर शास्त्री यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून पुजन करण्यात आले. या वेळी शाळेतील विद्यार्थी मुला मुलींनी. राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्त भाषणे केली. तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षक श्री.अनिल हुंबे गुरुजी यांनी मनोगत व्यक्त केले. महात्मा गांधी व लाल बहाददूर शास्त्री यांनी देश स्वातंत्र्याच्या चळवळीत महत्वपूर्ण केलेल्या कार्याची माहिती विद्यार्थ्यांना करून दिली.
यवत स्टेशन जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.जयश्री रायकर यांनी विध्यार्थ्यांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले. या वेळी उपस्थित विध्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला. या प्रसंगी यवत स्टेशन जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षकांनी जयंतीनिमित्त विद्यार्थी मुला मुलींच्या स्पर्धा कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन केले असल्याने उपस्थित पालकांनी समाधान व्यक्त केले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने केंद्रप्रमुख श्री.प्रणयकुमार पवार, यवत गावचे विद्यमान सरपंच श्री समिर दोरगे, उपसरपंच सुभाष यादव. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सौ.दिपाली थोरात. प्रामुख्याने उपस्थित होते.
या वेळी यवत स्टेशन जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षक श्री रामहरी लावंड, श्री.अनिल हुंबे , सौ.संगिता टिळेकर, सौ.संगिता वाळके, तसेच परिसरातील ग्रामस्थ पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वाचक क्रमांक :