नागवडेची बाजार भावाची घोषणा म्हणजे मृगजळ - केशवराव मगर.

By : Polticalface Team ,Wed Dec 01 2021 19:42:45 GMT+0530 (India Standard Time)

नागवडेची बाजार भावाची घोषणा म्हणजे मृगजळ - केशवराव मगर. श्रीगोंदा प्रतिनिधी: नागवडे कारखान्याने दोन हजार सहाशे रुपये भाव घोषित केल्याबद्दल चेअरमनचे अभिनंदन परंतु मागील वर्षी 2 हजार 661 रुपये घोषित करून शासनाचा आदेश नसताना 217 रु. प्रती टनप्रमाणे 15 कोटी 25 लाख रुपयांना सभासदांना कमी भाव दिला मग आता सभासदांची दिशाभूल करून बाजारभावाची घोषणा मृगजळ तर ठरणार नाही ना असा सवाल सहकार महर्षी नागडे कारखान्याचे माजी व्हाईस चेअरमन केशव मगर यांनी उपस्थित केला आहे. आज आपण पाहिलं तर कारखान्याची सरासरी गाळप क्षमता 5000 मेट्रिक टन असताना आपला कारखाना सरासरी 5000 मेट्रिक टनाप्रमाणेच चालतो परंतु असे अनेक कारखाने आहेत ज्यांची 3500 मेट्रिक टनाची क्षमता असताना 4500 मेट्रिक टनाने गाळप करतात.आपली क्षमता जास्त आहे म्हणून किमान सहा हजार मेट्रिक टनाचे रोज गाळप होण्याची आवश्यकता असताना चेअरमनचे कारखान्याकडे दुर्लक्ष असल्याकारणाने ते होत नाही कारण चेअरमनचे स्वतःच्या खाजगी कारखान्यात जास्त लक्ष आहे असे जाणवते.कारखाना सुरू झाल्यानंतर सव्वीस दिवसांनी सहवीज निर्मिती चालू झाली आपली सह वीज निर्मिती 26 मेगावॅट आहे कारखान्याला दहा मेगावॅट वीज लागते व उर्वरित वीज वितरण ला विक्री होऊ शकते परंतु आपला कारखाना फक्त पन्नास टक्केच वीज निर्मिती करतो मग आपण सांगितल्याप्रमाणे सहवीज निर्मितीतून सात कोटीचा नफा कसा होणार? याचे उत्तर चेअरमन यांनी द्यावे तसेच आपण या वर्षी इथेनॉल उत्पादन चालू करणार अशी घोषणा केली,परंतु आपल्याला साधी डिसलरी सुद्धा वारंवार घोषणा करून चालू करता आली नाही हे वास्तव आहे. मागील वर्षीच्या एफआरपी प्रमाणे उर्वरित 217 रुपये टनाप्रमाणे सर्व शेतकरी सभासदांच्या खात्यावर आधी वर्ग केले तरच सभासद आपल्या 2600 रुपयाच्या घोषणेला खरे धरतील अन्यथा ही मागील सारखीच पोकळ घोषणा ठरेल असा घणाघात मगर यांनी केला आहे.तसेच आपला कारखाना 86032 ऊसाचे गाळप करत असताना सुद्धा आपली सरासरी रिकव्हरी 9.60 इतकी कमी का येते असाही सवाल मगर यांनी उपस्थित केला आहे.त्याचबरोबर कार्यक्षेत्रा बाहेरील आपण पंचवीस ते तीस टक्के ऊस सभासदांच्यावर अन्याय करून बाहेरून आणण्याचे काम करताय ते बंद करून सभासदांना प्राधान्य द्यावे व सरासरी वाढवून कारखान्याचा तोटा कमी करण्याचा प्रयत्न करावा असा सल्ला मगर यांनी दिला आहे.तसेच येत्या पंधरा दिवसात मागील एफआरपी नुसार 217 रुपये प्रमाणे पेमेंट द्यावे अन्यथा शेतकरी उपोषण करतील असे मगर म्हणाले. चौकट- नैतिकता स्वीकारून राजेंद्र नागवडे यांनी चेअरमन पदाचा राजीनामा द्यावा - तीन महिन्यापूर्वी राजेंद्र नागवडे यांनी अशी घोषणा केली होती की जर कराडला माझा कारखाना किंवा कारखान्याशी माझा किंवा माझ्या कुटुंबाचा काही संबंध असल्यास मी चेअरमन पदाचा राजीनामा देईन चार-पाच दिवसापूर्वी त्यांच्या घरासमोर आंदोलन करून हे सिद्ध झाले की त्यांचा खाजगी कारखान्याशी संबंध आहे ही नैतिकता स्वीकारून राजेंद्र नागवडे यांनी त्वरित चेअरमन पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी मगर यांनी केली आहे.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

यवत येथील मतदान केंद्रावर दिवसभर मतदारांच्या रांगा. ईव्हीएम मशिन मात्र संत गतीने. उशीरा पर्यंत नागरिकांनी बजावला मतदानाचा हक्क.

शरद पवारांच्या सभेला आणलेल्या खुर्च्या. देवेंद्र फडणवीस यांच्या सभेत वापरल्या. तालुक्यात होतेय चर्चा

श्रीगोंदयाच्या आमदारकीवर नागवडेंचाच सर्वाधिक नैतिक अधिकार.

श्री काळभैरवनाथ जन्मोत्सव सोहळा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह सोहळा उत्साहात सुरू. यवत नगरीत भक्तीमय वातावरण.

श्रीगोंद्यात वंचित च्या सभेला रेकॉर्डब्रेक गर्दी, 3 साखर सम्राट विरोधात सामान्य शेतकऱ्यांचे मोठे आवाहन, सभेचा विरोधकांनी घेतला धसका

श्रीगोंद्यात धनगर समाज नागवडे सोबत- कोल्हटकर

वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार आण्णासाहेब शेलार यांच्या प्रचारार्थ आज 1वा.ॲड प्रकाश आंबेडकर यांची जाहीर सभा.गर्दीचा नवीन विक्रम होणार

विक्रम पाचपुते यांनी लोकांची फसवणूक करत गुन्हेगारीत विक्रम करत विकास कामात मोठ्या प्रमाणात टक्केवारी प्रमाणात वसुली केली तर नागवडे यांच्या 15 खोक्यांनी माझ्या तिकीटाचा सौदा केला - राहुल जगताप

महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ. अनुराधा नागवडे यांना बहुमताने विजय करा निधी कमी पडून देणार नाही उद्धव ठाकरे

सौ अनुराधाताईंना नागवडेंना प्रचंड मताने निवडून द्या विकासाची हमी आम्ही घेतो- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे

मतदान जनजागृती कार्यक्रम २०२४ अंतर्गत दौंड नगर परिषदेतर्फे सायकल रॅलीचे यशस्वी आयोजन: मुख्याधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विजय कावळे.

महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ अनुराधाताई नागवडे यांच्या उद्याच्या गर्दीचा उच्चांक होण्याची शक्यता

श्रीगोंद्यात मतदान अधिकारी मतदान कर्मचाऱ्यांचे द्वितीय प्रशिक्षण संपन्न

अनुराधाताई नागवडे यांच्या प्रचारार्थ 14 नोव्हेंबर रोजी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व काँग्रेसचे नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात श्रीगोंद्यात

दौंड - पुणे दैनंदिन प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांची आमदार राहुल कुल यांनी घेतली भेट, कुल यांना दौंडकर प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.

गौरी शुगर ऊसाला देणार जिल्ह्यात एक नंबरचा बाजार भाव चेअरमन बाबुराव बोत्रे पाटील

महायुतीने केलेल्या कामाचे श्रेय थोरात यांनी घेऊ नये- वैशाली नागवडे.

दौंड तालुक्याच्या विकासासाठी आम्ही राहुल कुल यांच्या बरोबर राहणार- आनंद थोरात.

सैनिक समाज पार्टीचे उमेदवार मा.विनोद साहेबराव साळवे यांनी घेतले शेख मोहम्मद महाराज यांचें दर्शन

अपक्ष उमेदवार माजी आमदार राहुल जगताप यांच्या गावभेट दौऱ्याला मिळतोय चांगला प्रतिसाद