खंबेश्वर शिक्षण संस्था खामगाव मध्ये शिक्षक प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न. नवीन शिक्षण धोरणाच्या अंमलबजावणीत शिक्षकांची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण आहे: डॉ.अ ल देशमुख.

By : Polticalface Team ,03-10-2023

खंबेश्वर शिक्षण संस्था खामगाव मध्ये शिक्षक प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न. नवीन शिक्षण धोरणाच्या अंमलबजावणीत शिक्षकांची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण आहे: डॉ.अ ल देशमुख.
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड. दौंड ता.०३ ऑक्टोबर २०२३. राज्यातील नवीन शिक्षण धोरणात अनेक चांगल्या संकल्पना मांडलेल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचा बहुआयामी विकास करणे व त्याचे भवितव्य उज्ज्वल घडणे शक्य आहे. परंतु त्यासाठी शिक्षकांची मनोभूमिका बदलणे अत्यंत आवश्यक आहे. शिक्षकांची भूमिका या धोरणाच्या अनुषंगाने अंमलबजावणीत अत्यंत महत्त्वाची असणार आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ शिक्षण तज्ञ डॉ. अ ल देशमुख यांनी केले. खामगाव, ता. दौंड, जि.पुणे येथे खंबेश्वर शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल शाळेमधील शिक्षकांची नवीन शैक्षणिक धोरण व शिक्षकांची भूमिका या विषयी बोलताना त्यांनी आपले मत व्यक्त केले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष श्री माणिकराव नागवडे, कार्याध्यक्ष डॉ.श्रीपाद ढेकणे, सचिव विकास जगताप, मुख्याध्यापक श्री नेवसे व अन्य पदाधिकारी, शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. खामगाव येथील एक दिवसीय शिक्षक कार्यशाळेचे उद्घाटन पुणे महानगरपालिकेचे मा.सभागृह नेते श्रीनाथ भिमाले व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सिनेटचे सदस्य श्री प्रसेनजीत फडणवीस यांच्या उपस्थितीत झाले. या वेळी, समाज परिवर्तनाच्या कार्यात शिक्षकांचा सक्रिय सहभाग परिवर्तनाची गती वाढवणारा ठरतो, असे प्रतिपादन श्री भिमाले यांनी केले. तर शिक्षण संस्थांच्या प्रयत्नातूनच विद्यार्थ्यांच्या विकासाच्या नवनवीन योजना पुढे आल्या शिवाय राहणार नाहीत. विद्यार्थ्यांचा बहुआयामी विकास होण्यास नक्कीच मदत होईल. त्यामुळे अशा कार्यशाळा आयोजित करणाऱ्या संस्था चालक नक्कीच अभिनंदनास पात्र आहेत, असे प्रतिपादन श्री प्रसेनजीत फडणवीस यांनी व्यक्त केले. शिक्षक प्रशिक्षणाच्या विविध सत्रांमध्ये उपस्थित मान्यवरांनी व वक्त्यांनी या वेळी मार्गदर्शन केले.

शिक्षकी पेशा सोडून DICCI च्या व्यावसायिक वातावरणात आपला ठसा उमटवणाऱ्या सौ. सीमा कांबळे यांनी, नवीन शिक्षण धोरणातील पंचकोष विकास या संकल्पनेची स्पष्टता केली तर उद्योजकतेसाठी विद्यार्थ्यांची जडणघडण शालेय शिक्षणातूनच झाली पाहिजे,अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. नवकल्पना करणाऱ्या विद्यार्थ्यांचा शोध, त्यांचे प्रशिक्षण व त्यांना व्यवसायातून मिळणाऱ्या सन्मानाची जाणीव शिक्षकांनी करून दिली पाहिजे,अशी अपेक्षा सौ कांबळे यांनी व्यक्त केली. एस एन डी टी विपीठाचे सिनेट सदस्य व ज्येष्ठ प्रा. सुरेंद्र निरगुडे यांची मुलाखत प्रा. शरदचंद्र बोटेकर यांनी घेतली. यावेळी शिक्षकांचे हक्क, कर्तव्य, संस्थेच्या जबाबदाऱ्या व नवीन शिक्षण धोरणात याबाबत असलेल्या स्पष्ट सूचना यांचे विवेचन झाले. यानिमित्ताने अनेक शंकांचे स्पष्टीकरण प्रा. निरगुडे यांनी केले.
विविध खेळांच्या माध्यमातून व उपलब्ध साहित्यातून विद्यार्थ्यांची सृजनशीलता, औत्सुक्य व नवनिर्माणाची उर्मी जागवता येते. यासाठी काही खेळांच्या आधारे श्री विलास कुलकर्णी यांनी शिक्षकांना प्रशिक्षित केले. या कार्यशाळेच्या समारोपात कार्याध्यक्ष श्रीपाद ढेकणे यांनी, आपल्या स्वतःच्या मुलाला ज्या प्रकारचे शिक्षण व सुविधा त्याच्या शाळेत मिळाव्यात अशी आपली अपेक्षा असते त्याच प्रकारचे शिक्षण व सुविधा आपण आपल्या शाळेत असलेल्या विद्यार्थ्यांना देतो आहोत का? यावर सर्वांना आत्मचिंतन करण्याचे आवाहन केले.
या प्रकारच्या कार्यशाळा या नवीन शिक्षण धोरणाच्या अंमलबजावणी साठी. मार्गदर्शक नक्कीच मैलाचा दगड ठरतील अशी प्रतिक्रिया उपस्थित शिक्षकांनी व्यक्त केली. अशा कार्यशाळा व त्यासाठी आवश्यक असणारा खर्च हा संस्थाचालकांनी करून शिक्षकांची मानसिकता निर्माण केली पाहिजे अशी उपस्थितांमध्ये चर्चा या वेळी झाली.

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


अनिल गायकवाड
दौण्ड प्रतिनिधी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.