पिढीजात हातभट्टी दारू विक्रीत्यांची पळापळ. यवत खामगाव येथे पोलिसांची छापेमारी. ? दोन लोकांवर गुन्हा दाखल.
By : Polticalface Team ,04-10-2023
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड.
दौंड ता ०४ ऑक्टोबर २०२३ दौंड तालुक्यातील यवत पोलीस स्टेशन हद्दीतील यवत शेळके वस्ती व खामगाव शेलारवाडी ता दौंड जिल्हा पुणे येथील पिढीजात हातभट्टी दारू तयार व विक्री करणाऱे आरोपी १) अरुण विठ्ठल नानावत रा.यवत शेळके वस्ती ता दौंड जिल्हा पुणे. २)अमित धुल्ला उर्फ राकेश गुडदावत रा खामगाव शेलारवाडी.ता दौंड जिल्हा पुणे. या इसमांनी बेकायदा बिगर परवाना १० अधिक १८ लिटरचे गावठी हातभट्टी तयार दारुचा साठा त्यांच्या जवळ मिळुन आल्याने यवत पोलीस स्टेशन येथे सदर आरोपी विरुद्ध महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम ६५(ख)(ड) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यवत पोलीस स्टेशन येथे सरकार तर्फे फिर्यादी रामदास ज्ञानदेव जगताप पो हवा नेमणुक यवत पोलीस स्टेशन यांनी आरोपी अरुण विठ्ठल नानावत ३८ वर्ष रा यवत ता दौंड जिल्हा पुणे. यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ?
तसेच फिर्यादी महेंद्र संभाजी चांदणे पो हवा नेमणुक यवत पोलीस स्टेशन पुणे ग्रामीण. यांनी सरकार तर्फे आरोपी अमित धुल्ला उर्फ राकेश गुडदावत ३४ वर्ष रा खामगाव शेलार वाडी ता दौंड जिल्हा पुणे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.?
यवत पोलीस स्टेशन हद्दीतील पिढीजात गावठी हातभट्टीची दारु विक्री करणाऱ्या ठिकाणी यवत पोलीसांनी दिनांक ०३ ऑक्टोबर २०२३ रोजी यवत शेळके वस्ती.येथे एका पांढऱ्या प्लास्टिकच्या २० लिटर मापाचे कॅन्ड मध्ये १८ लिटर गावठी हातभट्टी तयार दारु आरोपी जवळ मिळुन आली. तसेच खामगाव शेलार वाडी येथे १० लिटर गावठी हातभट्टीची तयार दारु. आरोपी जवळ मिळुन आली.
या दोन्ही ठिकाणी छापेमारीत मिळालेला मुद्देमाल यवत पोलीसांनी जप्त केला आहे.
वाचक क्रमांक :