विनोद गरड यांनी क्रीडा क्षेत्रात करमाळा तालुक्याची मान उंचावली यामुळे अनेक युवक हँडबॉल या खेळाकडे आकर्षित होतील-पंचायत समिती सभापती पैलवान अतुल पाटील

By : Polticalface Team ,04-10-2023

विनोद गरड यांनी क्रीडा क्षेत्रात करमाळा तालुक्याची मान उंचावली यामुळे अनेक युवक हँडबॉल या खेळाकडे आकर्षित होतील-पंचायत समिती सभापती पैलवान अतुल पाटील करमाळा प्रतिनिधी अलीम शेख मोबाईल नंबर 98 50 68 63 60 विनोद गरड यांनी क्रिडा क्षेत्रात करमाळा तालुक्याची मान उंचावली असून यामुळे अनेक युवक हँडबॉल या खेळाकडे आकर्षित होतील असे प्रतिपादन शिवछत्रपती पुरस्कार विजेते कुस्तीगीर व पंचायत समिती सभापती अतुल (भाऊ) पाटील यांनी केले. जेऊर या करमाळा येथे आयोजित सत्कार समारंभ प्रसंगी त्यांनी आपली भावना बोलून दाखवली. जेऊर ग्रामपंचायत सदस्य तथा हँडबॉल मधील राज्यस्तरीय नामांकित माजी खेळाडू विनोद गरड यांनी नुकतेच राज्यस्तरीय हँडबॉल पंच परीक्षेत उत्तीर्ण होऊन यश संपादन केले व इथून पुढील राज्य व देशपातळी वरील हँडबॉल स्पर्धा मध्ये आता त्यांना पंच म्हणून नेमण्यात येणार असल्याने माजी आमदार नारायण पाटील कार्यालयाच्या वतीने व जेऊर ग्रामस्थांच्या वतीने विनोद गरड यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सभापती तथा डबल उप महाराष्ट्र केसरी अतुल पाटील, तालुक्याचे युवानेते पृथ्वीराज पाटील, भारत शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव प्रा अर्जुनराव सरक सर, माजी सरपंच भास्करभाऊ कांडेकर, माजी उपसरपंच राजाभाऊ जगताप, माजी उपसरपंच धनंजय शिरस्कर, सोसायटी अध्यक्ष महेश कांडेकर, संतोष पिसे, उमाजी नाईक संघटनेचे तालुकाध्यक्ष पोपटराव वाघमोडे, स्विय सहाय्यक सूर्यकांत पाटील,सुनील तळेकर, माजी उपसरपंच दत्तू नाना शिंदे (कुंभेज), माजी सदस्य रामेश्वर तळेकर (वंगी), आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी सभापती अतुल पाटील व पृथ्वीराज पाटील यांनी विनोद गरड यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी सभापती पाटील म्हणाले की कोणत्याही खेळात पंच हे न्यायदानाचे काम करत असतात. आज राज्यस्तरीय पंच म्हणून हे पवित्र काम करण्याची संधी विनोद गरड यांना मिळाली याचा करमाळा तालुक्यास अभिमान आहे. विनोद गरड यांनी या क्षेत्रात आपल्या अचूक व नियमाला धरून दिलेल्या निर्णयावर असेच नाव उज्वल करावे. विनोद गरड यांची प्रेरणा घेऊन अनेक युवक आता या खेळाकडे वळतील असा आशावाद अतूल पाटील यांनी व्यक्त केला.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी