दौंड येथे स्वतंत्र उपविभागीय प्रांत कार्यालयाल स्थापन करण्याची मान्यता मिळाली. आमदार राहुल कुल.
By : Polticalface Team ,07-10-2023
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड.
दौंड ता ०६ ऑक्टोबर २०२३. पुणे जिल्ह्यातील दौंड तालुका. दौंड येथे स्वतंत्र उपविभागीय प्रांत कार्यालय स्थापन करण्या बाबतचे परिपत्रक काढून राज्य शासनाने निर्णय घेतला असल्याची माहिती. दौंड विधानसभा मतदार संघाचे आमदार राहुल कुल यांनी दिली.
दौंड मतदार संघातील नागरिकांच्या मागणीनुसार आमदार राहुल कुल यांनी दौंड तालुक्यासाठी स्वतंत्र उपविभागीय प्रांत कार्यालय व्हावे या मागणीच्या अनुषंगाने राज्य शासनाकडे प्रस्ताव देण्यात आला होता. महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री मा देवेंद्रजी फडणवीस यांच्या कार्यकाळात दौंड येथे स्वतंत्र उपविभागीय प्रांत कार्यालयाला मंजुरी देण्यात आली होती. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा.एकनाथराव शिंदे. आणि महसूल मंत्री मा.राधाकृष्ण विखे पाटील. यांनी शासकीय प्रक्रिया पूर्ण करून दौंड येथे स्वतंत्र उपविभागीय प्रांत कार्यालय स्थापन करण्याचे परिपत्रक काढून निर्णय घेतला आहे.
या कार्यालयासाठी ५ पदे नियमित वेतन श्रेणीवर मंजूर करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. १)उपविभागीय अधिकारी. २) लघु लेखक निम्नश्रेणी ३) अव्वल कारकून. ४) शिरस्तेदार. ५) महसूल सहाय्यक (लिपिक - टंकलेखक) उच्चस्तरीय सचिव समितीने मान्यता दिल्यानुसार पदांची वेतनश्रेणी सहाव्या व सुधारित सातव्या वेतन आयोगानुसार करण्यात आली आहे.
दौंड येथे उपविभागीय प्रांत कार्यालय व्हावे यासाठी अनेक वर्षे आग्रही असुन पाठपुरावा केला, तालुक्याच्या दृष्टीने शेतकरी व नागरिकांचा अतिशय महत्वाचा महसुली प्रश्न मार्गी लागला असल्याने. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा.ना.एकनाथराव शिंदे. उपमुख्यमंत्री मा.ना.देवेंद्रजी फडणवीस. उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री मा. ना.अजितदादा पवार. महसूल मंत्री मा.ना.राधाकृष्णजी विखे पाटील. मा.ना.चंद्रकांत दादा पाटील यांचे. दौंड तालुक्याच्या वतीने आमदार राहुल कुल यांनी आभार व्यक्त केले.
वाचक क्रमांक :