जीवनामध्ये कर्म जर चांगले केले तर मरण देखील चांगले येते - ह भ प वाणीभूषण ज्ञानेश्वर महाराज तांबे

By : Polticalface Team ,15-10-2023

जीवनामध्ये कर्म जर चांगले केले तर मरण देखील चांगले येते - ह भ प वाणीभूषण ज्ञानेश्वर महाराज तांबे लिंपणगाव (प्रतिनिधी)- जीवन जगत असताना कर्म जर चांगले करावे, मरण देखील चांगले येते. देह प्रपंचाचा दास आहे. त्यामुळे 80 च्या पुढे वय गेले तर आयुष्याचे सोने होते. असा धार्मिक सल्ला ह भ प ज्ञानेश्वर महाराज तांबे यांनी प्रवचन रुपी सेवेतून उपस्थित त्यांना दिला.

लिंपणगाव येथील ज्ञानदीप शिक्षण संस्थेतील सेवक शंकर पवार यांच्या प्रथम पुण्यस्मरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी आपल्या धार्मिक शैलीतून उपस्थित भाविकां समोर बोलताना तांबे महाराज पुढे म्हणाले की शरीर हे प्रपंचाचा दास आहे त्यासाठी शरीराला साजल युक्त आहारा असायला हवा, निश्चितपणे त्या व्यक्तीला आनंदी निरोगी वातावरण मिळते. असे सांगून तांबे महाराज आणखी पुढे म्हणाले की, प्रपंच करत असताना परमार्थाकडे दुर्लक्ष होता कामा नये. आताच्या युगामध्ये प्रत्येक जण धन मिळविण्यासाठी धडपड करतात. मात्र वाईट मार्गाने कमावलेले धन क्षणिक सुख देईल मात्र समाधान देणार नाही कारण सुख वेगळे व समाधान वेगळ्या असते. जी व्यक्ती गाव व देवाचा कारभार पाहत असताना गावाचे भावाचे आणि देवाच्या मिळकतीत भ्रष्टाचार करेल तेथे मात्र देव माफ करत नाही आयुष्यभर सुख मिळणार नाही. पुढे तांबे महाराज आणखी म्हणाले की, ज्या घरात बाप नाही त्याला काहीजण खडे मारतात. मात्र ज्या घरात बाप आहे, तेथे मात्र खडे निंदा करण्याचे धाडस करत नाही. हीच किमया वडील घरात असते तेंव्हा मात्र प्रत्येक जण आदर युक्त बोलतात. मात्र बाप स्वर्गवासी गेल्यानंतर त्या वडिलांची किंमत कळते.
तांबे महाराज आणखी पुढे म्हणाले की, मुलगी सासरी गेल्यानंतर वडिलांच्या नावासारखे जगावे. कारण सासरी नांगत असताना लक्ष्मीच्या पावलाने नांदावे निश्चितपणे सासरी गोकुळाचे वातावरण तयार होते. तारुण्यांमध्ये विशेषता मुलींना काळ व संस्कार समजला त्यांच्या आयुष्याचे सोने व सार्थक होते. बाभळीच्या झाडाला आंब्याच्या कैऱ्या येऊच शकत नाही. कारण भाबळीच्या झाडाला काटेरी मुकुट असतो. कारण कुटुंबप्रमुख म्हणून त्या घरात वडील असतो. कारण वडीलाचे महत्त्व ज्याला कळेल तोच खरा ज्ञानी असतो. त्याप्रमाणे ज्या घरात विजयाची शुद्धता आहे, तेथे उच्च शिक्षणाची गुणवत्ता निश्चित असते. आपल्या प्रवचन रुपी सेवेतून तांबे महाराज आणखी पुढे म्हणतात की, जमिनीची पातक त्या मातीतून कळते. त्याप्रमाणे आई-वडिलांच्या संस्कारातून मुलांचे संस्कार विचार वाढीस जातात. तेंव्हा संस्कार हे आयुष्यामध्ये महत्त्वाचे असते. त्याचे प्रत्येकाने आचरण करावे, अमलात आणावे, जीवन जगत असताना कर्म चांगले करा, निश्चितपणे परमेश्वर तर पाठीशी राहीलच, परंतु आयुष्याचे सोने निश्चित होईल. यासाठी विशेषता तरुणांनी जीवन जाताना भान ठेवावे. जीवनामध्ये व्यसनमुक्त राहा, स्वस्त रहा, निरोगी जीवन जगा, आई-वडिलांची अखेरच्या श्वासापर्यंत सेवा करा. जोपर्यंत आई-वडील आहेत तोपर्यंत तीर्थयात्रेला जाण्याची गरज नाही, हीच खरी धार्मिक सल्ल्यानुसार ईश्वर सेवा मानली जाते. असा मौलिक सल्ला ह भ प तांबे महाराज यांनी आपल्या प्रवचन रुपी सेवेतून उपस्थित भाविकांना यावेळी दिला.

अनुकंपा तत्वावर दिवंगत कर्मचारी शंकर पवार यांच्या मुलाला ज्ञानदीप ग्रामीण विकास शिक्षण संस्थेमध्ये सेवेत रुजू करून घेतल्याबद्दल सहकार महर्षी नागवडे कारखान्याचे अध्यक्ष व ज्ञानदीप शिक्षण संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र दादा नागवडे यांचे उपस्थित ग्रामस्थ व भाविकांनी कौतुक करत आभार व्यक्त केले.
याप्रसंगी जिल्हा माध्यमिक सोसायटीचे चेअरमन दिलीपराव काटे, शिक्षक भारतीचे संघटनेचे तालुकाध्यक्ष हनुमंत रायकर, पत्रकार नंदकुमार कुरुमकर, चंद्रकांत कुताळ, अशोक पारखे, रवींद्र भोंडवे, ईश्वर रेवगे, मसुदेव कुसाळकर, सदाशिव होले, निळकंठ जंगले, सुदाम पवार, नंदू ठोमसकर, प्रदीप कोकाटे, जयसिंग शेंडे, आदींनी दिवंगत शंकर पवार यांच्या कुटुंबाचे सांत्वन करत श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी ज्ञानदीप व छत्रपती शिवाजी शिक्षण संस्थेचे सेवकवृंद, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सूत्रसंचालन जयसिंग शेंडे यांनी केले.

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.