हरिदास शिर्के व दादासाहेब शिर्के यांच्या खेळीमुळे पेडगाव ग्रामपंचायत उपसरपंच शिर्के यांच्यावरील अविश्वास ठराव बारगळला...
By : Polticalface Team ,Thu Dec 02 2021 20:24:32 GMT+0530 (India Standard Time)
प्रतिनिधी /श्रीगोंदे : -
श्रीगोंदे तालुक्यातील पेडगाव ग्रामपंचायतचे उपसरपंच देवीदास गणपत शिर्के यांच्यावर आणलेला अविश्वास ठराव माजी उपसभापती हरिदास शिर्के व बाजार समितीचे संचालक दादासाहेब शिर्के यांच्या नाट्यमय घडामोडीच्या खेळीमुळे फेटाळला गेला आहे. श्रीगोंदे तहसीलदार मिलिंद कुलथे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत मतदान होऊन अविश्वास ठराव बारगळला.
उपसरपंच देवीदास गणपत शिर्के यांच्याविरुद्ध काँग्रेसच्या प्रदेश युवकसरचिटणीस प्रशांत ओगले व गणेश झिटे, सरपंच पती भगवान कणसे, यांच्या नेतृत्वाखाली ९ ग्रामपंचायत सदस्यांनी कामात ढवळाढवळ करत महिला सरपंच यांच्यावर वरीष्ठांकडून दबाव आणत काम करण्याच्या कारणावरून श्रीगोंदे तहसीलदार मिलिंद कुलथे यांच्याकडे दि. २५ रोजी अविश्वास ठरावाचा प्रस्ताव दाखल केला होता तहसीलदार मिलिंद कुलथे यांनी मंगळवारी दि.३० रोजी ११ वाजता पेडगाव ग्रामपंचायत येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. अविश्वास ठरावाच्या निवडणुकीत श्रीगोंदे पंचायत समितीचे माजी उपसभापती हरिदास शिर्के , बाजार समितीचे संचालक दादासाहेब शिर्के ,नागवडे कारखान्याचे संचालक राजकुमार पाटील ,हसनभाई शेख यांनी केलेल्या खेळीमुळे नाट्यमय घडामोडी घडल्याने ठराव दाखल करणाऱ्या गटाचे काही सदस्य गैरहजर राहिल्याने १० सदस्य प्रत्यक्ष हजर राहत ८ जणांनी मतदान केल्याने शिर्के यांचे विरुद्धचा अविश्वास ठराव बारगळला गेल्याने उपसरपंच देवीदास गणपत शिर्के यांच्यावर आणलेला अविश्वास ठराव फेटाळला गेल्याने कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आनंद व्यक्त केला
श्रीगोंदा तालुका
प्रतिनिधी शफीक हवालदार
वाचक क्रमांक :