सोलापूर जिल्हा कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदी कुर्डूवाडी येथील कुस्ती सम्राट तसेच नामवंत मल्ल असलम काझी यांची निवड त्यांच्या निवडीबद्दल होत आहे सर्व स्तरातून अभिनंदन
By : Polticalface Team ,17-10-2023
करमाळा प्रतिनिधी अलीम शेख मोबाईल नंबर 98 50 68 63 60
कुर्डूवाडी येथील छत्रपती शिवराय कुस्ती संकुल चे मार्गदर्शक नामवंत पैलवान असलम शफेरदिन काझी यांची सोलापूर जिल्हा कुस्ती महासंघाच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाली आहे सदरची निवड महाराष्ट्र राज्य कुस्ती महासंघाचे अध्यक्ष संदीप आप्पा भोडवे यांनी एका पत्रकार द्वारे केली आहे
पैलवान काझी हे कुस्ती सम्राट असून त्यांनी त्यांच्या कारकीर्द मध्ये महाराष्ट्र राज्यातील नामवंत मल्ल घडविले आहे असून त्यांनी त्यांच्या कुस्ती संकुल मधील अनेक नामवंत मल्ल राज्यात नावलौकिक मिळवीत आहे त्यांच्या कुस्ती क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याची दखल घेत त्यांची महाराष्ट्र राज्य कुस्ती महा संकुलाचे अध्यक्ष भोडवे यांनी त्यांची जिल्हाध्यक्षपदी निवड केली आहे त्यांच्या या निवडीबद्दल त्यांचे राज्याचे माजी मंत्री दिलीप सोपल तसेच आवाटी येथील ग्रामस्थ पैलवान अरबाज सय्यद, विजय शिंदे, अमन पटेल, तसेच खंडू नलवडे पत्रकार अलीम शेख यांनी त्यांचे विशेष अभिनंदन केले आहे
पैलवान असलम काझी यांच्या कुर्डूवाडी येथील छत्रपती शिवराय संकुल कुस्ती मध्ये सध्या 200 मल्ल सराव करीत आहे पैलवान असलम काझी यांनी वयाच्या अवघ्या बाराव्या वर्षापासून कुस्ती खेळण्यास प्रारंभ केला होता त्यांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रात अनेक नामवंत मल्ल घडविले
सोलापूर जिल्हा कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदी पैलवान असलम काझी यांची निवड झाल्याबद्दल त्यांचे विविध क्षेत्रांमधून जोरदार अभिनंदन होत आहे
वाचक क्रमांक :