दौंड तालुक्यात मराठा कुणबी आरक्षण जनजागृतीचे वादळ. मनोज जरांगे पाटील यांच्या वर जेसीबी वरुन पुष्प फुलांचा वर्षाव यवत ग्रामस्थांनी केले धुमधडाक्यात जंगी स्वागत

By : Polticalface Team ,21-10-2023

दौंड तालुक्यात मराठा कुणबी आरक्षण जनजागृतीचे वादळ. मनोज जरांगे पाटील यांच्या वर जेसीबी वरुन पुष्प फुलांचा वर्षाव यवत ग्रामस्थांनी केले धुमधडाक्यात जंगी स्वागत दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड. दौंड ता २२ ऑक्टोबर २०२३. राज्यभरात मराठा आरक्षणाचा लढा दिवसानदिवस लक्षवेधी ठरत आहे. मराठ कुणबी आरक्षणाचे राजकारण करु नका. ज्यांना कुणबी आरक्षण नको असे वाटत असेल त्यांनी आरक्षण घेऊ नये. मात्र इतरांना अडचण निर्माण करु नये. कोणावर जबरदस्ती नाही. असा थेट सवाल मनोज जरांगे पाटील यांनी बोलताना व्यक्त केला आहे. पुणे येथील सभेचा कार्यक्रम करुन मनोज जरांगे पाटील यांचा ताफा बारामती दहिवडी अकलूज बाजुकडे जात असताना शुक्रवार दि २०/१०/२०२३ रोजी दौंड तालुक्यातील मौजे यवत ता दौंड जिल्हा पुणे सोलापूर महामार्गावरील भुलेश्वर फाटा येथे अखिल मराठा समाज एकवटला होता. मनोज जरांगे पाटील यांचे जेसीबी वरुन पुष्प फुलांचा वर्षाव करत जंगी स्वागत करण्यात आले तसेच फटाक्यांच्या धुम धडाक्यात हलगी वाजवत भुलेश्वर फाटा ते यवत भव्य मिरवणूक काढण्यात आली. या प्रसंगी यवत पंचक्रोशीतील मराठा समाजातील युवा तरुण व जागरुक नागरिकांनी मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा दर्शविला. या वेळी जमलेल्या युवा तरुण मराठा समाजाला आरक्षण संदर्भात मनोज जरांगे पाटील यांनी मार्गदर्शन केले. बोलताना ते म्हणाले. मराठा समाजातील युवा तरुणांनी आत्महत्या करु नये. पुन्हा ताकतीने एकत्र या हा प्रश्न माझ्या स्वार्थाचा आहे ना तुमच्या प्रतेक घरा घरातल्या पोरांचा प्रश्न आहे. आता पोरांचे मुडदे पडु देऊ नका. आरक्षण नसल्याने शिक्षण व नोकरी वाचुन सर्व तरुण पोरं बेरोजगार होऊ लागली आहेत. सर्व स्वप्नांची राखरांगोळी झाली आहे. ती पुढच्या पिढीत होऊ देऊ नका. आज पर्यंत झाले ते बस झाले. आता सहन करण्याची क्षमता राहिली नाही. आता हा मराठा कुणबी असल्याचा लढा सर्व सामान्य मराठ्यांनी हाती घेतला असल्याने. यामध्ये फुट पाडण्याची ताकद राहिली नाही. मी ही सामान्य माणूस आहे. तुम्हाला दिसत नाही काय ? असा थेट सवाल उपस्थित नागरिकांना करुन युवकांची मने जिंकली. पुढे बोलताना ते म्हणाले शेतकरी खानदानी मराठ्याची औलाद आहे. तुमच्याशी गंदारी करणार नाही. मराठ्यांना आरक्षण दिल्या शिवाय आता माघार नाही. जिल्हा तालुक्यातील सर्कल गाव हद्दीतील सर्वांना एकत्रित करुन आरक्षणाची माहिती द्या शेतकरी कुणबी म्हणजे काय हेच लोकांना कळेना. पुर्वी आपले वडील आजोबा शेतीला काय म्हणायचे कुणबी. आम्ही त्यांचेच वारस आहोत ना हॉटेल आणि रेस्टॉरंट मधला फरक काय आहे. ते सरकारला सांगण्याची वेळ आली आहे. मराठा कुणबी आरक्षण जनजागृतीचे वादळ मोठ्या झपाट्याने वाहू लागले आहे. मराठा आरक्षणावर युवा तरुणांनी प्रामुख्याने जबाबदारी स्वीकारली आहे मराठा कुणबी आरक्षण मिळाल्या शिवाय आता माघार नाही. असा थेट इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दौंड तालुक्यातील मौजे यवत पंचक्रोशीतील हजारो नागरिकांना दिला आहे.या वेळी अखिल मराठा समाज मोठ्या संख्येने सहभागी झाला होता. यवत वरवंड पाटस या ठिकाणी देखिल मनोज जरांगे पाटील यांचे जंगी स्वागत करण्यात आले.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


अनिल गायकवाड
दौण्ड प्रतिनिधी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.