रयत शेतकरी संघटना पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस पदी मा.अंकुशराव हंबीर यांची नियुक्ती, बापूसाहेब देशमुख यांनी दिले नियुक्तीचे पत्र.
By : Polticalface Team ,23-10-2023
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड.
दौंड ता २२ ऑक्टोबर २०२३ दौंड तालुक्यातील मौजे पाटेठाण ता दौंड जिल्हा पुणे. येथिल शेतकरी मा. अंकुशराव विष्णू हंबीर. यांनी त्यांच्या कार्यकाळात रयत शेतकरी संघटनेतील महत्वपूर्ण भूमिका घेऊन कार्याची जबाबदारी चोखपणे बजावली आहे.
त्यांच्या कार्याची दखल घेऊन. रयत शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा बापुसाहेब देशमुख यांनी रयत शेतकरी संघटनेच्या पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस पदी. मा.अंकुशराव विष्णू हंबीर यांची नियुक्ती करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.
रयत शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बापूसाहेब देशमुख यांच्या हस्ते अंकुशराव विष्णू हंबीर यांना नियुक्तीचे पत्र देण्यात आले. या प्रसंगी रयत शेतकरी संघटनेचे पुणे जिल्हा अध्यक्ष रामदास कोतवाल. पुणे जिल्हा महिला अध्यक्षा कल्पनाताई गव्हाणे दौंड तालुका अध्यक्ष आबासाहेब देवकर. रयत शेतकरी संघटनेचे महिला कार्याध्यक्षा आतकिरे मॅडम. अदी रयत शेतकरी संघटनेचे पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.
रयत शेतकरी संघटनेच्या पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस पदी अंकुशराव विष्णू हंबीर यांची नियुक्ती झाल्याने उपस्थित मान्यवरांनी अंकुशराव हंबीर यांना पुष्पगुच्छ देऊन पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी. सुभाष टिकोळे.गणेश गावडे सुरेश मेमाणे तात्यासाहेब टेळे. गणेश भालेराव.अदी दौंड तालुक्यातील व मौजे पाटेठाण पंचक्रोशीतील शेतकरी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वाचक क्रमांक :