दिव्यांग व गोरगरीबांच्या कल्याणासाठी डॉ.संतोष मुंडे यांचे कार्य अद्वितीय- मुख्य अभियंता मोहन आव्हाड

By : Polticalface Team ,Thu Dec 02 2021 20:30:43 GMT+0530 (India Standard Time)

दिव्यांग व गोरगरीबांच्या कल्याणासाठी डॉ.संतोष मुंडे यांचे कार्य अद्वितीय- मुख्य अभियंता मोहन आव्हाड परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- महाराष्ट्रातील दिव्यांगाचे अनेक प्रश्न असुन या प्रश्नांची सोडवणुक करण्यासाठी डॉ.संतोष मुंडे हे सतत कार्यरत असतात दिव्यांग व गोरगरीबांच्या कल्याणासाठी त्यांचे कार्य हे अद्वितीय असल्याचे प्रतिपादन परळी औष्णीक वीज निर्मिती केंद्राचे मुख्य अभियंता मोहन आव्हाड यांनी केले. दिव्यांग बांधवांनी शासनाच्या विविध योजनेचा लाभ घ्यावा असे प्रतिपादन उपजिल्हाधिकारी नम्रता चाटे यांनी बोलताना व्यक्त केले आहे. शहरातील श्रीनाथ हाँस्पीटल येथे जागतिक दिव्यांग दिनानिमित्त मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी औष्णिक विद्युत केंद्राचे मुख्य अभियंता मोहन आव्हाड यांच्या हस्ते व तहसिलदार सुरेश शेजुळ यांच्या उपस्थितीत शिबीराचे उद्घाटन करण्यात आले. या शिबिराचे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष व धनंजय मुंडे आरोग्य मित्र योजनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ. संतोष मुंडे यांनी आयोजन केले होते.या शिबीरात 430 जणांची तपासणी करण्यात आली.यावेळी नायब तहसीलदार बाबुराव रूपनर, सुभाष वाघमारे, राजाभाऊ लव्हारे व तज्ञ डॉक्टर उपस्थित होते. नेत्र तपासणीसाठी डॉ. सुनील वालेवाडेकर लातूर , डॉ. अभिषेक मुळे बीड, डॉ. अभिषेक धायगुडे बीड तज्ञटीमकडून करण्यात आले. प्रास्ताविकात संयोजक डॉ.संतोष मुंडे यांनी या शिबीराच्या आयोजनामागची भुमिका स्पष्ट करताना सांगितले की आम्ही दिव्यांग व अपंगासाठी सामाजीक न्याय मंत्री ना.धनंजय मुंडे साहेब यांच्या माध्यमातुन अनेक उपक्रम राबविले तसेच शासनाच्या अनेक योजनांचा हजारो दिव्यांगांना फायदा मिळवुन दिला.यापुढेही असेच उपक्रम राबवणार असल्याचे सांगितले.या शिबीरास उपजिल्हाधिकारी नम्रता चाटे यांनी भेट देवुन संयोजकांचे कौतुक केले.शिबिरामध्ये नामवंत नेत्रतज्ञ डॉक्टरांकडून डोळ्यांची नवीन तंत्रज्ञान वापरून काँम्प्युटराईज्ड आधुनिक पद्धतीने तपासणी केली.तसेच, डोळ्यांच्या वेगवेगळ्या आजारांबाबत तज्ञांकडून मार्गदर्शन केले.यामध्ये,डोळे येणे म्हणजे अचानक डोळयांची जळजळ, दुखणे, पाणी व घाण येणे, पापण्या चिकटणे व प्रकाश सहन न होणे. मोतीबिंदू तपासणी करण्यात आली. तसेच डोळ्यांची निगा कशी राखावी असे मार्गदर्शन तज्ञ डॉक्टरांनी केले आहे. यावेळी बोलताना तहसिलदार सुरेश शेजुळ म्हणाले की दिव्यांगासाठी शासनाच्या अनेक योजना असुन या योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन केले. दरम्यान परळी उपजिल्हाधिकारी नम्रता चाटे मँडम म्हणाल्या की, दिव्यांग बांधवांनी शासनाच्या योजनेचा लाभ घ्यावा व कुठल्याही अडचण झाल्यास त्या सोडवण्यासाठी कटिबद्ध व डॉ.संतोष मुंडे यांनी घेतलेले शिबीर कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी रंजीत रायभोळे, साजन लोहिया, महेमुद खान, शेख हिरा, विशाल चव्हान, जालिंदर माने, सुरेश माने, संजय नखाते, दत्तात्रय काटे, संतोष आघाव, सुनिता कवले, अनंतराव लोखंडे, केशव फड, बाळु चव्हाण, विश्वजित मुंडे, नंदकुमार जोशी व इतर दिव्यांग बांधव उपस्थित होते.कार्यकर्माचे सुत्रसंचालन काळे सर यांनी केले तर आभार प्रदर्शन सौळंके यांनी केले.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

यवत येथील मतदान केंद्रावर दिवसभर मतदारांच्या रांगा. ईव्हीएम मशिन मात्र संत गतीने. उशीरा पर्यंत नागरिकांनी बजावला मतदानाचा हक्क.

शरद पवारांच्या सभेला आणलेल्या खुर्च्या. देवेंद्र फडणवीस यांच्या सभेत वापरल्या. तालुक्यात होतेय चर्चा

श्रीगोंदयाच्या आमदारकीवर नागवडेंचाच सर्वाधिक नैतिक अधिकार.

श्री काळभैरवनाथ जन्मोत्सव सोहळा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह सोहळा उत्साहात सुरू. यवत नगरीत भक्तीमय वातावरण.

श्रीगोंद्यात वंचित च्या सभेला रेकॉर्डब्रेक गर्दी, 3 साखर सम्राट विरोधात सामान्य शेतकऱ्यांचे मोठे आवाहन, सभेचा विरोधकांनी घेतला धसका

श्रीगोंद्यात धनगर समाज नागवडे सोबत- कोल्हटकर

वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार आण्णासाहेब शेलार यांच्या प्रचारार्थ आज 1वा.ॲड प्रकाश आंबेडकर यांची जाहीर सभा.गर्दीचा नवीन विक्रम होणार

विक्रम पाचपुते यांनी लोकांची फसवणूक करत गुन्हेगारीत विक्रम करत विकास कामात मोठ्या प्रमाणात टक्केवारी प्रमाणात वसुली केली तर नागवडे यांच्या 15 खोक्यांनी माझ्या तिकीटाचा सौदा केला - राहुल जगताप

महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ. अनुराधा नागवडे यांना बहुमताने विजय करा निधी कमी पडून देणार नाही उद्धव ठाकरे

सौ अनुराधाताईंना नागवडेंना प्रचंड मताने निवडून द्या विकासाची हमी आम्ही घेतो- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे

मतदान जनजागृती कार्यक्रम २०२४ अंतर्गत दौंड नगर परिषदेतर्फे सायकल रॅलीचे यशस्वी आयोजन: मुख्याधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विजय कावळे.

महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ अनुराधाताई नागवडे यांच्या उद्याच्या गर्दीचा उच्चांक होण्याची शक्यता

श्रीगोंद्यात मतदान अधिकारी मतदान कर्मचाऱ्यांचे द्वितीय प्रशिक्षण संपन्न

अनुराधाताई नागवडे यांच्या प्रचारार्थ 14 नोव्हेंबर रोजी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व काँग्रेसचे नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात श्रीगोंद्यात

दौंड - पुणे दैनंदिन प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांची आमदार राहुल कुल यांनी घेतली भेट, कुल यांना दौंडकर प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.

गौरी शुगर ऊसाला देणार जिल्ह्यात एक नंबरचा बाजार भाव चेअरमन बाबुराव बोत्रे पाटील

महायुतीने केलेल्या कामाचे श्रेय थोरात यांनी घेऊ नये- वैशाली नागवडे.

दौंड तालुक्याच्या विकासासाठी आम्ही राहुल कुल यांच्या बरोबर राहणार- आनंद थोरात.

सैनिक समाज पार्टीचे उमेदवार मा.विनोद साहेबराव साळवे यांनी घेतले शेख मोहम्मद महाराज यांचें दर्शन

अपक्ष उमेदवार माजी आमदार राहुल जगताप यांच्या गावभेट दौऱ्याला मिळतोय चांगला प्रतिसाद