दौंड तालुक्याचे आरोग्यदुत आमदार अँड राहुल दादा कुल यांच्या वाढदिवसानिमित्त राहु येथे पाच दिवशीय, विविध आरोग्य तपासणी. रत्कदान शिबिर संपन्न. 🩸
By : Polticalface Team ,29-10-2023
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड.
दौंड ता.२९ ऑक्टोबर २०२३.
दौंड तालुक्याचे आमदार राहुल दादा कुल, यांच्या वाढदिवसानिमित्त मौजे राहु ता, दौंड जिल्हा पुणे, येथे दि.२५ ते २९ ऑक्टोबर या पाच दिवशीय कालावधीत मोफत विविध आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या मध्ये जेष्ठ नागरिक. पुरुष- स्त्री. वंदत्व चाकित्सा शिबिर. रत्कदाब व मधुमेह तपासणी शिबिर. गर्भवती स्त्री आरोग्य तपासणी शिबिर.रत्कदान शिबिर. तसेच मोतीबिंदू व नेत्र तपासणी. या विविध आरोग्य शिबिराचे उद्घाटन मा आमदार रंजनाताई कुल. व कांचनताई कुल. यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या प्रसंगी मौजे राहु पंचक्रोशीतील सामाजिक शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी प्रामुख्याने उपस्थित दर्शवली होती.
श्री गणेश हॉस्पिटल राहू व रोटरी ब्लड बँक दौंड यांच्या संयुक्त विद्यमाने, दि.२८ ऑक्टोबर,२०२३.रोजी सकाळी १० पासून मौजे राहू ता दौंड जिल्हा पुणे. येथे रत्कदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, राहु पंचक्रोशीतील युवा तरुण रक्तदात्यांनी उस्फूर्त पणे रत्कदान करुन प्रतिसाद दिला. या वेळी एकूण शंभर प्लस बॅगांचे कलेक्शन झाले असल्याचे त्यांनी सांगितले.
दौंड तालुका बहुजन मुक्ती पार्टीचे अध्यक्ष मा.लक्ष्मण जाधव यांनी
स्वतः रक्तदान करून. दौंड तालुक्याचे आरोग्यदुत आमदार अँड राहुल कुल यांचा वाढदिवस साजरा केला. तसेच राहु येथे विविध आरोग्य तपासणी
शिबिरासाठी महत्वपूर्ण योगदान दिल्याबद्दल श्री गणेश हॉस्पिटलच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
*भविष्यामध्ये रक्तदात्याचा अथवा त्यांच्या कुटुंबास रक्ताची गरज भासल्यास हॉस्पिटल कडून मोफत रक्त उपलब्ध करून दिले जाईल.* अशी प्रतिक्रिया डॉ.गौरी जगदाळे कुल प्रसिद्ध स्त्री रोग तज्ञ. यांनी व्यक्त केली.
या प्रसंगी राहु पंचक्रोशीतील युवा तरुण सामाजिक शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातील पदाधिकारी अधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वाचक क्रमांक :