विद्यार्थी सनदी अधिकारी व्हावेत- उत्कर्षाताई रूपवते.
By : Polticalface Team ,24-11-2023
"विद्यार्थ्याने सनदी अधिकारी बनण्याचे स्वप्न उराशी बाळगून अभ्यास करावा." असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या सदस्या उत्कर्षाताई रूपवते यांनी केले. त्या राहुल विद्यार्थी वसतिगृह श्रीगोंदा येथे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना बोलत होत्या. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सुरेश चव्हाण हे होते.
त्यापुढे म्हणाल्या की, "बहुजन शिक्षण संघाची स्थापना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रेरणा घेऊन आदरणीय दादासाहेब रुपवते यांनी केली .संस्थेच्या माध्यमातून सर्व बहुजन चळवळीचे विद्यार्थी शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आली आहेत.राहुल विद्यार्थी वसतिगृहाच्या माध्यमातून अनेक सनदी अधिकारी घडलेले आहेत . त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून सर्व विद्यार्थ्यांनी अभ्यास करावा.आपण गुणवंत विद्यार्थी आहात. वस्तीगृह हे समतेची चळवळ चालवीत आहे. ही चळवळ गाव खेड्यापासून ते शहरी भागापर्यंत विद्यार्थीच पोचू शकतात." असे त्यांनी सांगितले.
यावेळी पत्रकार पीटर रणसिंग, अमोल झेंडे ,शिवाजीराव पोटे, विलास घोडके, महेश्वर पतसंस्थेचे चेअरमन अनिल भदागरे इत्यादी मान्यवर उपस्थित होते . कार्यक्रमाचे प्रास्तावित समन्वयक सतीश ओहोळ यांनी केले तर आभार अधीक्षक चैतन्य गायकवाड यांनी मानले.
वाचक क्रमांक :