दौंड तालुक्यातील मौजे भोसले वाडी उंडवडी येथे अखंड हरिनाम सप्ताह सोहळा. श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा.
By : Polticalface Team ,24-11-2023
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड.
दौंड ता २४ नोव्हेंबर २०२३ दौंड तालुक्यातील भोसले वाडी उंडवडी ता दौंड जिल्हा पुणे येथील सालाबादप्रमाणे समस्त भोसले वाडी पंचक्रोशीतील भजनी मंडळाच्या कुशल आयोजनाने अखंड हरिनाम सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. या हरिनाम सप्ताह पाच दिवशीय कालखंडात भोसले वाडी व उंडवडी पंचक्रोशीतील वारकरी संप्रदायाचा जागर मोठ्या उत्साहात दि २२/११/२०२३ पासुन प्रारंभ करण्यात आला असून. दररोज पहाटे ४ ते ६ काकड आरती. सकाळी ७ ते१० व दुपारी २ ते ४ दरम्यान ज्ञानेश्वरी पारायण सायंकाळी ५ ते ६ हरिपाठ रात्री ७ ते ९ किर्तन नंतर महाप्रसाद व जागरण नित्यनेमाने पार पडणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.
अखंड हरिनाम सप्ताह दरम्यान हभप दत्तात्रय महाराज दोन्हे.मोसे खोरे मुळशी. हभप शुभंम महाराज देशमुख वडगाव रासाई हभप ऋषिकेश महाराज नवले राहु यांचे प्रबोधनात्मक हरिनाम किर्तन अतिशय व कौतुकास्पद झाले. तसेच
शनिवार दि.२५ रोजी
हभप वैभव महाराज धुमाळ जेऊर मांडकी. यांचे शनिवार दि २५ रोजी रात्री ७ ते ९ या वेळेत हरिनाम किर्तन होणार असून रविवार दि २६ रोजी राहुल महाराज राजगुरू यांचे किर्तन होणार आहे.
भोसले वाडी येथील अखंड हरिनाम सप्ताह कार्यक्रम आयोजक हभप नामदेव महाराज यादव. व्यासपीठ हभप बापू महाराज मदने विनेकरी खंडेराव (तात्या) चव्हाण. पुजारी हभप
लक्ष्मण बामगुडे. आदी वारकरी सांप्रदायिक क्षेत्रातील जेष्ठ महिला वर्ग युवा तरुण तसेच सामाजिक शैक्षणिक व सांप्रदायिक क्षेत्रातील मान्यवरांनी प्रामुख्याने उपस्थिती दर्शविली होती.
या हरिनाम सप्ताह कार्यक्रमात प्रामुख्याने समाविष्ट असलेल्या तांबेवाडी भजनी मंडळ. विठ्ठल समाज भजनी मंडळ यवत भोसले वाडी. डॉ बंगला सौंदडवाडी भजनी मंडळ भोसले वाडी. बोरीपाधीं भजनी मंडळ. दुधाने चौक भजनी मंडळ.उंडवडी लडकत वाडी भोसले वाडी भजनी मंडळ. ताम्हाण वाडी भजनी मंडळ. कासुर्डी कामट वाडी भजनी मंडळ. दहिटणे भजनी मंडळ.भोसले वाडी या पंचक्रोशीतील वारकरी सांप्रदायिक भजनी मंडळांनी प्रामुख्याने उपस्थिती दर्शवली होती. तसेच हरिनाम किर्तन सप्ताहाला रंगत दर्शविणारे गायकवृंद, हभप विष्णुपंत पांढरे महाराज सौंदडवाडी. मृदुंगमनी हभप अविनाश लेकुळे महाराज यवत. हार्मोनियम हभप बबनराव राजगुरू महाराज यवत आदी कीर्तनाला रंगत निर्माण करणारे टाळकरी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्तिक शु.१५ सोमवार दि २७ रोजी सकाळी ७ ते ९ काकडा विसर्जन व दिंडी मिरवणूक होणार असुन. सकाळी १० ते १२ श्री ह भ प सतिश महाराज टिळेकर राहु यांचे काल्याचे किर्तना नंतर सांगता होणार असून. भोसले वाडी उंडवडी पंचक्रोशीतील भाविक भक्तांना महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
वाचक क्रमांक :