भिमा पाटस साखर कारखान्याने चालु गळीत हंगामाच्या गाळपासाठी शेतकऱ्यांच्या ऊसाला ३ हजार रुपये दर देण्याचा निर्णय.
By : Polticalface Team ,30-11-2023
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड
दौंड ता,३० नोव्हेंबर २०२३ दौंड तालुक्यातील. भिमा पाटस कारखान्याने चालु गळीत हंगामाच्या गाळपासाठी येणाऱ्या ऊसाला पाहिला हप्ता ३००० रूपये देण्याचा निर्णय. एम आर एन ग्रुप चे अध्यक्ष मुर्गेश निराणी व चेअरमन तथा आमदार राहुल कुल यांनी एकत्रित येऊन निश्चित केला असल्याची माहिती चेअरमन तथा दौंड तालुक्याचे विद्यमान आमदार राहुल कुल यांनी दिली आहे.
या वेळी बोलताना भिमा-पाटसचे चेअरमन तथा आमदार राहुल कुल म्हणाले की, या वर्षी कारखान्यास येणाऱ्या ऊसास पहिला हप्ता ३००० रूपये जाहीर केला आहे. त्यानुसार आजपासून हे बील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यास सुरुवात करण्यात आली आहे.
कारखान्याच्या बॉयलर व मोळीपूजन कार्यक्रमा वेळी आमदार कुल बोलताना म्हणाले. इतरांच्या बरोबरीने भीमा पाटस देखील बाजार भाव देईल.असे आश्वासन दौंड तालुक्यातील शेतकरी व सभासदांना दिले होते.
त्यानुसार ३००० रुपये भाव जाहीर करून हे आश्वासन आमदार कुल यांनी पूर्ण केले आहे. सध्या भिमा - पाटस कारखाना पुर्ण क्षमतेने सुरु असून आज अखेर ६०,००० मेट्रिक टनाचे गाळप पुर्ण केले आहे. शेतकरी सभासदांनी जास्तीत जास्त ऊस भिमा पाटस कारखान्यास देवुन सहकार्य करावे असे आव्हान राहुल कुल यांनी केले आहे.
वाचक क्रमांक :