जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेची बैठक
By : Polticalface Team ,Sat Dec 04 2021 21:04:49 GMT+0530 (India Standard Time)
पाथर्डी प्रतिनिधी:
पंचायत समिती, जिल्हा परिषद व नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पाथर्डी येथील शासकीय विश्रामगृह येथे शिवसेनेची महत्त्वपूर्ण बैठक नुकतीच पार पडली.
शेवगाव- पाथर्डी विधानसभा मतदार संघाचे संपर्कप्रमुख नंदकुमार मोरे ,जिल्हा प्रमुख राजेंद्र दळवी तसेच तालुका प्रमुख अंकुश चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी संपर्क प्रमुख मोरे म्हणाले की, शिवसेना वाढविण्यासाठी जी काही मदत वरच्या स्तरावरून लागेल ती मी पक्षवाढीसाठी निश्चित करेल, असे आश्वासन दिले. तसेच राजेंद्र दळवी यांनी सर्व शिवसैनिक आणि पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन निवडणुकीला सामोरे जायचे आहे, असे संबोधित केले. तसेच शिवसेना तालुका प्रमुख अंकुश चितळे यांनी म्हटले की, आम्ही तीन वर्षाच्या काळामध्ये शिवसेनेच्या चाळीस हजार सभासदांची नोंदणी करून तालुक्यातील शिवसैनिक व शिवसेना फुलवण्याचे काम केले. जनतेसाठी, जनतेच्या अडचणीसाठी मी वाहून घेतले आहे. तालुक्यातील कोणत्याही माणसाला अडचण जर आली किंवा मला नुसता फोन जरी केला तरी मी हजर राहिलो नाही, असे झाले नाही. तसेच तालुक्यांमधील सुख-दुःखाच्या कार्यक्रमात आम्ही सर्व शिवसैनिक दुःखीतांना आधार देण्यासाठी प्रामुख्याने हजर असतो. तालुक्यांमध्ये महाविकासआघाडी नेतृत्वाखाली निवडणूक लढवण्यासाठी शिवसेना तालुका प्रमुख यांनी विरोध दर्शविला. पक्षाचा आदेश पाळण्यास आम्ही तयार आहोत, परंतु शिवसेना पक्ष वाढवायचा असेल, तर शिवसेनेचे नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हापरिषद साठी स्वतंत्र उमेदवार उभे करावेत, अशी शेवटी त्यांनी विनंती केली. संपर्कप्रमुख नंदकुमार मोरे यांनी यावेळी म्हणाले, मी मातोश्रीवर तुमची मागणी पाठवतो आणि वरून जो आदेश येईल, तो सर्व शिवसैनिकांना पाळावा लागेल.
यावेळी नंदकुमार मोरे यांनी कोरोना च्या काळामध्ये लोकांना खूप मदत केली, म्हणून त्यांना जगदंबामाता बहुउद्देशीय प्रतिष्ठान चितळवाडी या संस्थेच्या वतीने कोरोना योद्धा म्हणून सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
या बैठकीला सागर राठोड, तालुकाप्रमुख नवनाथ वाघ, अमोल जायभाये, विशाल कोलते, युवा सेनेचे तालुकाप्रमुख अनिल रांधवणे, शहर प्रमुख शरद शेंदुरकर, दत्ता पवार, माजी शहरप्रमुख भाऊसाहेब धस, बाबासाहेब ढाकणे, अनिल फुंदे, नवनाथ चव्हाण, सुनिल पालवे आणि तालुक्यातील बहुसंख्येने शिवसैनिकांची उपस्थिती होती.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
यवत येथील मतदान केंद्रावर दिवसभर मतदारांच्या रांगा. ईव्हीएम मशिन मात्र संत गतीने. उशीरा पर्यंत नागरिकांनी बजावला मतदानाचा हक्क.
शरद पवारांच्या सभेला आणलेल्या खुर्च्या. देवेंद्र फडणवीस यांच्या सभेत वापरल्या. तालुक्यात होतेय चर्चा
श्रीगोंदयाच्या आमदारकीवर नागवडेंचाच सर्वाधिक नैतिक अधिकार.
श्री काळभैरवनाथ जन्मोत्सव सोहळा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह सोहळा उत्साहात सुरू. यवत नगरीत भक्तीमय वातावरण.
श्रीगोंद्यात वंचित च्या सभेला रेकॉर्डब्रेक गर्दी, 3 साखर सम्राट विरोधात सामान्य शेतकऱ्यांचे मोठे आवाहन, सभेचा विरोधकांनी घेतला धसका
श्रीगोंद्यात धनगर समाज नागवडे सोबत- कोल्हटकर
वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार आण्णासाहेब शेलार यांच्या प्रचारार्थ आज 1वा.ॲड प्रकाश आंबेडकर यांची जाहीर सभा.गर्दीचा नवीन विक्रम होणार
विक्रम पाचपुते यांनी लोकांची फसवणूक करत गुन्हेगारीत विक्रम करत विकास कामात मोठ्या प्रमाणात टक्केवारी प्रमाणात वसुली केली तर नागवडे यांच्या 15 खोक्यांनी माझ्या तिकीटाचा सौदा केला - राहुल जगताप
महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ. अनुराधा नागवडे यांना बहुमताने विजय करा निधी कमी पडून देणार नाही उद्धव ठाकरे
सौ अनुराधाताईंना नागवडेंना प्रचंड मताने निवडून द्या विकासाची हमी आम्ही घेतो- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे
मतदान जनजागृती कार्यक्रम २०२४ अंतर्गत दौंड नगर परिषदेतर्फे सायकल रॅलीचे यशस्वी आयोजन: मुख्याधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विजय कावळे.
महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ अनुराधाताई नागवडे यांच्या उद्याच्या गर्दीचा उच्चांक होण्याची शक्यता
श्रीगोंद्यात मतदान अधिकारी मतदान कर्मचाऱ्यांचे द्वितीय प्रशिक्षण संपन्न
अनुराधाताई नागवडे यांच्या प्रचारार्थ 14 नोव्हेंबर रोजी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व काँग्रेसचे नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात श्रीगोंद्यात
दौंड - पुणे दैनंदिन प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांची आमदार राहुल कुल यांनी घेतली भेट, कुल यांना दौंडकर प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.
गौरी शुगर ऊसाला देणार जिल्ह्यात एक नंबरचा बाजार भाव चेअरमन बाबुराव बोत्रे पाटील
महायुतीने केलेल्या कामाचे श्रेय थोरात यांनी घेऊ नये- वैशाली नागवडे.
दौंड तालुक्याच्या विकासासाठी आम्ही राहुल कुल यांच्या बरोबर राहणार- आनंद थोरात.
सैनिक समाज पार्टीचे उमेदवार मा.विनोद साहेबराव साळवे यांनी घेतले शेख मोहम्मद महाराज यांचें दर्शन
अपक्ष उमेदवार माजी आमदार राहुल जगताप यांच्या गावभेट दौऱ्याला मिळतोय चांगला प्रतिसाद