कलियुगात देव प्राप्तीसाठी सोपा मार्ग म्हणजे आई-वडिलांची उत्तम सेवा होय -ह भ प विकास महाराज देवडे
By : Polticalface Team ,22-12-2023
लिंपणगाव( प्रतिनिधी)- आत्ताच्या कलियुगात खऱ्या अर्थाने देव प्राप्तीसाठी सोपा मार्ग म्हणजे आई-वडिलांची प्रामाणिक सेवा होय आई वडील आहेत तोपर्यंत त्यांचा व्यवस्थित सांभाळ करा, एकदा का ?आई-वडील निघून गेले तर कितीही आवाज द्या, पुन्हा मात्र आई-वडील भेटणार नाहीत,. आई-वडिलांची सेवा ही संतश्रेष्ठ मानली जाते तेव्हा आई-वडिलांची प्रामाणिक सेवा करा निश्चितच भगवंत प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही असा धार्मिक दृष्ट्या मौलिक सल्ला ह. भ. प. विकास महाराज देवढे यांनी घुगलवडगाव येथे आयोजित पुण्यस्मरण कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले.
घुगलवडगाव तालुका श्रीगोंदा येथील शेतकरी कुटुंबातील माता कै. नानीताई झुंबर पवार यांचे पुण्यस्मरणानिमित्त उपस्थित भाविकांना मार्गदर्शन करताना विकास महाराज पुढे म्हणाले की, चांगले जीवन जगत असताना चांगल्या माणसांना निश्चित त्रास होतो. याचे उत्तम उदाहरण म्हणजे संतश्रेष्ठ असणारे ज्ञानोबा माऊली, जगतगुरु तुकाराम महाराज, छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या कार्यकाळात मोठा त्रास सगळी करावा लागला असे सांगून विकास महाराजांचे आणखी पुढे म्हणाले की, आई- वडिलांचे श्राद्ध घातल्यानंतर पुण्य मिळत असेल? तर जिवंतपणे आई-वडिलांची सेवा केल्यानंतर किती? पुण्य मिळत असेल? असे देखील महाराजांनी उपस्थितां समोर प्रश्न उपस्थित केला.
विकास महाराज आणखी पुढे म्हणाले की, बाप म्हणजे जगण्याचे माप आहे, बाप म्हणजे पाठीवरची थाप आहे, त्यामुळे जगणे देखील आपोआप आहे, कितीही रागावला तर ज्याची माया अमाप आहे. तो म्हणजे सर्वश्रेष्ठ बापच आहे. देशाच्या उत्तुंग शिखरावरती घेऊन जाणारी शिडी म्हणजे बाप आहे. समुद्राच्या आईल- पैल तीरावरती घेऊन जाणारी नवका म्हणजेच बाप आहे. अशाप्रकारे आई वडिलांचे जिवंतपणे असतानाचे महत्त्व आणि मृत्यूनंतर त्यांच्या कार्यकाळाची समुनिस्तुते याबाबत विकास महाराजांनी सविस्तर असे विवेचन करत उपस्थित भाविक भक्तांना मंत्रमुग्ध केले.
यावेळी श्रीगोंद्याच्या नगराध्यक्ष शुभांगी ताई पोटे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अनिल ठवाळ, नागवडे कारखान्याचे माजी उपाध्यक्ष बाबासाहेब इथापे, पुणे येथील दूरसंचार निगमचे सहाय्यक संचालक तुकाराम शेळके, प्राचार्य दत्तात्रेय सस्ते, शहाजी हिरवे, प्रवीण शेलार, राजेंद्र जराड आदींनी यावेळी श्रद्धांजली अर्पण केली. या सोहळ्यास मोठा जनसमुदाय उपस्थित होता आभार मोहन पवार यांनी मानले.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई
श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष
गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.
अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.
‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये
"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं
मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.
यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न
यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त
वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड
चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.