विक्रोळी पोलिस ठाण्याच्या महिला वरिष्ठ पोलीस निरीक्षक शुभदा चव्हाण नवभारत व नवराष्ट्र वर्तमानपत्राद्वारे सन्मानित
By : Polticalface Team ,Mon Dec 06 2021 11:35:09 GMT+0530 (India Standard Time)
दैनंदिन सेवा-कोरोना काळात उल्लेखनीय कामगिरी राज्यपालांच्या हस्ते गौरवण्यात आले
आष्टी/बीड (प्रतिनिधी ) :
नवभारत व नवराष्ट्र या वर्तमानपत्राद्वारे संपूर्ण महाराष्ट्रातून वेगवेगळ्या क्षेत्रातील उल्लेखनीय, भरीव व चांगली कामगिरी करणाऱ्या महिलांना पुरस्कार महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री व मुंबईचे पालक मंत्री मा. अस्लम शेख, आ. भाई जगताप, चित्रपट क्षेत्रातील सर्व मान्यवर यांच्या उपस्थितीत पुरस्कार वितरित करण्यात आले .
या पुरस्कारांमध्ये विक्रोळी पोलिस ठाण्याच्या महिला वरिष्ठ पोलीस निरीक्षक शुभदा प्रदीप चव्हाण मॅडम यांना त्यांच्या पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात, गुन्हेगारीला आळा घालण्या मध्ये मोठे यश आले असून, आदर्श पोलीस अधिकारी म्हणून पुरस्कार मिळाला .
महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल महामहीम श्री. भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते सुद्धा दैनंदिन सेवा असताना, कोरोना कालावधीमध्ये उत्कृष्ट उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल गौरवण्यात आली असून अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या .
वाचक क्रमांक :