लिंपणगाव -श्रीगोंदा राष्ट्रीय महामार्गावर रस्ते अपघातात लिंपणगावच्या युवकाचा जागीच मृत्यू

By : Polticalface Team ,01-01-2024

लिंपणगाव -श्रीगोंदा राष्ट्रीय महामार्गावर रस्ते अपघातात लिंपणगावच्या  युवकाचा जागीच मृत्यू लिंपणगाव (प्रतिनिधी)- श्रीगोंदा तालुक्यातील दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्वाचा समजला जाणाऱ्या लिंपणगाव- काष्टी रेल्वे गेटवरील उड्डाणपुलाच्या प्रश्नाकडे तातडीने लक्ष द्या, अशी मागणी प्रवासी व वाहन चालकांमधून मोठ्या प्रमाणात वारंवार होत आहे. दरम्यान लिंपणगाव काष्टी हा रस्ता गेल्या दोन तीन वर्षापासून राष्ट्रीय महामार्गाकडे समाविष्ट असल्याची माहिती समोर येत आहे. सदर रस्ता मुंबई उस्मानाबाद कडे मार्गस्थ होत आहे. त्यामध्ये दोन वर्षांपूर्वी या रस्त्याची काँक्रीटीकरण करून दूपदरीकरण करण्यात आले. त्यामुळे या रस्त्यातून आता वाहतूकही दिवसेंदिवस वेगाने वाहत आहे. दरम्यान लिंपणगाव व काष्टी कडून येणारी वाहने १२० च्या पुढे वेगाने चालवली जात आहे. या रस्त्यातून वाहन चालवताना रेल्वे गेट किती? मिनिटांमध्ये आले याचे भान वाहन चालकांना राहत नाही. या रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर काष्टी- लिंपणगाव रेल्वे गेट च्या दोन्हीही बाजूने मोठे मोठे काँक्रिटीकरणाचे ब्रेकर बसवल्यामुळे वाहन चालकांना रात्री अपरात्री अंदाजे येत नाही. त्याचा विदारक परिणाम म्हणून थेट वेगाने येत असलेले वाहन रेल्वे गेटवर आढळून गंभीर अपघाताची मालिका सुरू आहे. रविवारी 31 डिसेंबर रोजी रात्री अशाच प्रकारे कारचालकाच्या बाबतीत भीषण अपघात घडला. परंतु नशीब बलवतर म्हणून सर्वजण गंभीर जखमी झाले परंतु जीवित हानी झाली नाही अशी माहिती देखील समोर येत आहे.
31 डिसेंबर रोजी याच महामार्गावर लिंपणगाव येथील युवक अनिकेत राघोजी जगताप वय 21 या युवकाला देखील शेंडगेवाडी येथील रस्ता अपघातात अनन्य हॉटेलच्या समोर आपला जीव जमावा लागला. सदरचा अपघात रविवारी रात्री अकराच्या दरम्यान घडल्याची माहिती मिळाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार सदर युवक अनिकेत जगताप हा रात्री अकरा वाजता एका खाजगी पेट्रोल पंपावर कामाला जात असताना एका कार चालकाने बेभानपणे गाडी चालवत उडवल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. हा अपघातीचा अत्यंत भीषण व गंभीर स्वरूपाचा होता की, अनिकेत जगतापला त्या अपघातग्रस्त गाडीने काही अंतरावर फरपटत नेले सदर युवक पूर्णतः रक्ताच्या कार्यात पडून जागीच अंत झाला. अशी माहिती देखील समोर येत आहे. सदर अपघाताची माहिती मिळताच श्रीगोंद्याचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले, पोलीस उप निरीक्षक श्री अभंग यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन अपघाताची माहिती घेतली. सदर युवक लिंपण गावातील एका गरीब कुटुंबातील मुलगा असल्याची माहिती देखील मिळाली आहे. सोमवारी सकाळी श्रीगोंदा येथील शासकीय रुग्णालयात अनिकेित जगताप या मृत युवकावर शेवविच्छेदन केल्यानंतर लिंपणगाव येथे मोठ्या शोकाकुल वातावरणात अनिकेत जगतापवर अंत्यसंस्कार करण्यात आले. या युवकासह अनेक युवक या रस्ता अपघातात या राष्ट्रीृय महामार्गावर मृत्युमुखी पडले असल्याची माहिती प्राप्त झाले आहे. या गंभीर अपघात प्रकरणी लिंपणगाव मध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

नगर दक्षिणचे खासदार डॉ विखे पाटील यांनी उडान पुलाकडे लक्ष द्यावे

दरम्यान प्रवासी व वाहन चालकांच्या म्हणण्यानुसार अपघाताचे केंद्र समजले जाणारे काष्टी लिंपणगाव रेल्वेगेटवर उड्डाणपूल मंजूर होऊन सर्वे झाल्याची माहिती नगर दक्षिणचे खासदार डॉ सुजय विखे पाटील यांनी यापूर्वी सांगितले. परंतु अद्याप पर्यंत या उडान पुलाच्या कामाला गती दिसून येत नाही. निश्चितच केंद्रामध्ये भाजपाचे सरकार आहे. आणि नगर दक्षिणचे खासदार डॉ सुजय विखे पाटील हे देखील भाजपाचेच खासदार आहेत. एक तरुण तडफदार खासदार नगर दक्षिण लोकसभेसाठी लाभल्याने तालुक्यातील जनतेच्या देखील अपेक्षा तितक्याच वाढले आहेत. त्यामध्ये श्रीगोंदा तालुक्यातील खासदार डॉ विखे पाटील यांना जनतेने मोठे मताधिक्य मिळवून दिले. त्यामुळे त्यांनी श्रीगोंदा तालुक्यात अनेक विकास कामांसाठी देखील मोठा निधी प्राप्त करून दिला आहे. असे देखील बोलले जाते.
परंतु काष्टी लिंपणगाव मध्यावरील रेल्वे गेट वर उड्डाणपुलाची घोषणा देखील त्यांनी यापूर्वीच केली होती. कारण दौंड व नगर कडून रेल्वे सुटल्यानंतर रेल्वे गेट तात्काळ बंद केले जाते. तासनतास वाहनचालक व प्रवाशांना गेट बंद मुळे ताटकळत उभे राहावे लागते त्याचा फटका वाहन चालक अत्यावश्य रुग्ण इत्यादींना मोठ्या प्रमाणात बसतो. दौंड अगर पुण्याकडे अत्यावश्य हार्ट अटॅक व अपघातग्रस्त रुग्णांना पुढीेल उपचारासाठी घेऊन जाताना वेळेत उपचार न झाल्याने त्या रुग्णांना आपला प्राण रेल्वे गेटवरच गमावा लागतो ही मोठी शोकांतिका आहे. त्यामुळे या काष्टी लिंपणगाव यामध्ये वरील महत्त्वाच्या राष्ट्रीय महामार्गावर असणाऱ्या रेल्वे गेटवर मंजुरी असेल तर तात्काळ उड्डाणपूल बांधण्याची अपेक्षा वाहनचालक प्रवासी व रुग्णांच्या नातेवाईकांनी केली आहे. निश्चितपणे प्रवासी अत्यावश्य रुग्ण वाहन चालकांचा जीवघेणा प्रवास थांबण्यासाठी नगर दक्षिणचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील लिंपणगाव काष्टी या राष्ट्रीय महामार्गावरील उड्डाणपुलाच्या प्रश्नाकडे लक्ष देतील अशी अपेक्षा प्रवासी व वाहन चालकांमधून व्यक्त केली जात आहे.

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.