सावित्रीबाई फुलेच स्त्री व अस्पृश्यांच्या उध्दार करत्या दंडनाईक
By : Polticalface Team ,04-01-2024
स्त्री शिक्षण आणि स्रियांचा सन्मान यांसाठी आयुष्य वेचलेल्या सावित्रीबाई फुलेच अस्पृश्यांच्या उद्धारकरच्या आहेत असे प्रतिपादन इंदिरा गांधी नागरी पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन रवीशेठ दंडनाईक यांनी केले ते राहुल विद्यार्थी वसतिगृह श्रीगोंदा येथे सावित्रीबाई फुले यांच्या १९२ व्या जयंती सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात अध्यक्ष पदावरून बोलत होते. यावेळी सेवानिवृत्त केंद्रप्रमुख शांताराम उबाळे सर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. ते पुढे म्हणाले ३ जानेवारी हा सावित्रीबाईंचा जन्मदिवस संपूर्ण महाराष्ट्रात बालिका दिन व महिला मुक्तीदिन म्हणून साजरा केला जातो.सावित्रीबाई निरक्षर असणे स्वाभाविक होते कारण त्याकाळात शूद्र आणि स्त्री शिक्षणाला मनाई होती. महात्मा फुले यांनी सावित्रीबाई फुले यांना शिकवले. याच सावित्रीबाई फुले यांनी १८४८ साली पुण्यातील भिडे वाड्यात पहिली मुलींची शाळा काढली आणि स्त्री शिक्षणाचा प्रारंभ केला.
त्या वेळी बाल विवाहाची प्रथा , कुमारी - जरठ (वयोवृद्ध पुरुष) विवाह , विधवा पुनर्विवाहास बंदी त्यामुळे तरुण बालविधवांचे प्रमाण लक्षणीय होते. सावित्रीबाई आणि महात्मा फुले यांनी बाल विवाह, कुमारी जरठ विवाहाच्या विरोधात लोकजागृती करण्याचा प्रयत्न केला. विधवा पुनर्विवाह व्हावेत यासाठी प्रयत्न केले.फुले दाम्पत्याने आपल्या घरात बालहत्या प्रतिबंधक गृह काढून अशा शेकडो महिलांना आश्रय दिला व त्यांची गपचूप बाळंतपण करून त्यात जन्मलेल्या बालकांचा सांभाळ केला. असे हि ते म्हणाले.
माजी केंद्रप्रमुख शांताराम उबाळे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर एक गीत सादर केले. व राहुल विद्यार्थी वसतिगृहासाठी सर्वतोपरीसहकार्य करण्याचे आश्वासन दिले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक समन्वयक सतीश ओहोळ सर यांनी केले तर आभार चव्हाण सर यांनी मांनले
वाचक क्रमांक :