श्रीगोंद्यात पत्रकार हिताय संघटना निर्माण करण्यासाठी सकारात्मक प्रतिसादाने बैठक संपन्न.. एकाधिकारशाही विरोधात चर्चा
By : Polticalface Team ,09-01-2024
श्रीगोंदा तालुक्यातील सामाजिक भान असणाऱ्या सक्रिय पत्रकारांची आज संत शेख महमंद बाबा दर्गाह मध्ये संघटना स्थापनेबाबत सकारात्मक चर्चा झाली. यात उपस्थित पत्रकारांनी त्यांच्या संदर्भातील विविध समस्यांसह उपाय योजनांवर साधक बाधक चर्चा केली.. यात संघटनात्मक पातळीवर निरनिराळ्या त्रुटी आणि संघटना बांधणी करावी अशा सूचना करण्यात आल्या आहेत.. काही संघटनेतील एकाधिकार शाहीमुळे सर्व सामान्य पत्रकार, वार्ताहार, माध्यम प्रतिनिधी, इलेक्ट्रिक पत्रकार यांची उपेक्षा होत आहे. आणि काही ठराविक लोकं यात आपले हित साध्य करु पाहत आहे. अश्या लोकांपासून सर्वांचे नुकसान होत असुन, बहुतांश पत्रकारांचे सर्व प्रकारे हाल होत आले आहेत. अशी भावना व्यक्त झाली.
त्यामूळे सर्वांच्या हिताचे मुद्दे विचारात घेऊन सर्वजण हिताय अशी संघटना निर्माण करण्यासाठी सकारात्मक प्रतिसाद देत आज संत शेख महमंद बाबा यांच्या दर्गाहात सर्वानुमते एकी करण्याचा निर्धार करुन, सर्वांसाठी समान असणारे व्यासपीठ निर्माण करण्याची तयारी सर्वांनी दाखवली.
यावेळी पत्रकार शिवाजी साळुंखे (सार्वमत), पत्रकार समिरन नागवडे (प्रभात), पत्रकार योगेश चंदन (पुण्य नगरी), पत्रकार चंदन घोडके (बहूजन महाराष्ट्र), पत्रकार राजु शेख (सिटिझन), पत्रकार माधव बनसुडे (लोकमंथन), पत्रकार शफीक हवालदार (पॉलिटिकल फेस),पत्रकार अमर घोडके (साधना न्युज), पत्रकार किशोर मचे (लोकक्रांती) पत्रकार रमेश गांधी (ज्येष्ठ पत्रकार) इत्यादी पत्रकार यावेळी बैठकीस उपस्थित होते. यात अनेकांनी आपापल्या पद्धतीने नमूद विषयी सूचना केल्या. लवकरच नूतन संघटना स्थापन करण्यात येईल किंवा राज्य/राष्ट्रीय संघटनेला जोडण्यात येईल असे आश्वासन देऊन बैठक संपन्न झाली. या बैठकीचे आयोजन राज्य मराठी पत्रकार संघातुन बाहेर पडलेल्या पत्रकार अनिल तुपे (अहिल्याराज) यांनी केले व उपस्थितांचे आभार मानले..
वाचक क्रमांक :
शफिक हावलदार
कार्यकारी संपाद्क
जेऊर येथील विद्युत मंडळाच्या सहाय्यक अभियंताला लाच घेताना अँटीकरप्शनच्या पथकाने पकडले करमाळा पोलीस स्टेशनला झाला गुन्हा दाखल
जेऊर येथील विद्युत मंडळाच्या सहाय्यक अभियंताला लाच घेताना अँटीकरप्शनच्या पथकाने पकडले करमाळा पोलीस स्टेशनला झाला गुन्हा दाखल
उमरड ते केडगाव रेल्वे लाईन खालून भुयारी मार्गाचे काम सुरू बहुजन संघर्ष सेनेचे अध्यक्ष राजाभाऊ कदम यांच्या प्रयत्नाला यश
यवत पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे सहजपुर सोलापूर पुणे महामार्गावर भीषण अपघातात एक ठार. मृत झालेल्या व्यक्तीची ओळख पटलेली नाही. पोलीसांकडून बेवारस मयताचा शोध सुरू
यवत पोलीस स्टेशन हद्दीतील भुलेश्वर पायथ्याला सापडला पुरुषाचा जळालेला मृतदेह. अज्ञात इसमा विरुद्ध गुन्हा दाखल
कु-हाडीने डोक्यात व गळ्यावर गंभीर दुखापत करुन खुन. गिरीम गाव हद्दीतील धक्कादायक घटना दौंड पोलीस ठाण्यात अज्ञात इसमा विरुद्ध गुन्हा दाखल.
वंचित बहुजन युवा आघाडीच्या मागणीला यश : अंत्यविधी वाहनाची सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल बारामती नगर परिषदेचे आभार
नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडेंचा ब्राझील अभ्यास दौरा यशस्वी सभासद; कामगार व संचालक मंडळाकडून भव्य सन्मान
बहुजन मराठी पत्रकार संघाच्या वतीने गुणवंत विद्यार्थी व उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अंगणवाडी मदतनिसांचा येत्या शुक्रवारी दिनांक 27 जून रोजी होणार सन्मान,,,,,, श्रीमती प्रमिला जाधव यांची माहिती
दहिगाव उपसा व सीना माढा जोडकालव्यातुन उजनीतील ओव्हर फ्लोचे पाणी आवर्तनाद्वारे दिले जाणार :,,,,,, आमदार नारायण आबा पाटील यांची माहती
श्रीगोंदा-नगर मतदारसंघातील उत्कृष्ट काम करणाऱ्या पहिल्या सोळा ग्रामपंचायतींना दिला जाणार “धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज उत्कृष्ट ग्रामपंचायत पुरस्कार” :- आमदार विक्रम पाचपुते
संत बाळूमामा व संत ज्ञानोबाराय बहुउद्देशीय वारकरी शिक्षण संस्थेत अध्यात्मिक वर्गांना उत्स्फूर्त प्रतिसाद
पंढरीची वारी हे जीवन शुद्धीचे मोठे साधन ------------- ह.भ. प. दंडवते महाराज
राज्यस्तरीय मंथन परीक्षेत करमाळा येथील नगरपालिका शाळा क्रमांक दोनचा विद्यार्थी राजवीर हांगे यांचा राज्यात पाचवा क्रमांक
आई ही जीवनाची गरज तशी ए आय हि काळाची गरज- मा. राजेंद्र दादा नागवडे
छत्रपती कॉलेजमधील ३० विद्यार्थ्यांची रोजगार मेळाव्यातून नोकरीसाठी निवड!
वडगाव चे नूतन सरपंच चंद्रकांत काळे यांचा आमदार नारायण आबा पाटील यांच्या हस्ते सत्कार संपन्न
करमाळा तालुक्यातील अधिकारी यांचा मुंबई मध्ये स्नेहभेट कार्यक्रम होणे कौतुकास्पद उपक्रम- अजय साखरे
करमाळा पोलीस ठाणे हद्दीत कुंटणखाना / वेशा व्यवसाय चालविणारे इसमावर कारवाई करुन तीन पिडीत महीलांची सुटका
संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासाठी पुणे ग्रामीण पोलीसांचा चोख बंदोबस्त. पुणे सोलापूर प्रवासी वाहतूक व्यवस्था तात्पुरती वळवली.