यवत येथील (महा ई सेवा केंद्र) आधार कार्ड केंद्र चालकाकडून नागरिकांची लूटमारी, यवत ग्रामीण रुग्णालय समोरील प्रकार
By : Polticalface Team ,13-01-2024
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड.
दौंड ता ११ जानेवारी २०२४ दौंड तालुक्यातील मौजे यवत ता दौंड जिल्हा पुणे येथील ग्रामीण रुग्णालय समोर असलेल्या महा ई सेवा केंद्र व आधार कार्ड केंद्र चालकाकडून नागरिकांचे आधार कार्ड काढण्यासाठी आर्थिक लूटमारी होत असल्याचा प्रकार समोर आला आहे. या बाबत अधिक माहिती अशी की यवत मंडल विभागातील सर्वसामान्य व्यक्तींना आधार कार्ड काढणेसाठी किंवा त्यामधील दुरुस्ती करण्यासाठी यवत येथे यावे लागते. नागरिकांना ज्या प्रमाणे अन्न वस्त्र निवारा या मूलभूत गरजा आहेत त्याच प्रमाणे आधार कार्ड ही आवश्यक असल्याचे बोलले जात आहे.
दौंड पंचायत समिती मार्फत यवत परिसरात असलेल्या अंगणवाडीतील लहान मुलांचे आधार कार्ड काढण्यासाठी आधार कार्ड केंद्र यवत ग्रामीण रुग्णालयासमोर सुरू करण्यात आले आहे. अंगणवाडी सेविका कर्मचारी यांचे आंदोलन सुरू असल्याने सध्या सर्व ठिकाणी अंगणवाडी शाळा बंद आहेत. मात्र
येथील महा-ई-सेवा केंद्र व आधार कार्ड केंद्र चालक दुकानातच आधार कार्ड काढून देत आहे,
शासन निर्णयाप्रमाणे लहान मुलांचे आधार कार्ड काढण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही. परंतु येथील महा ई सेवा केंद्र व आधार कार्ड केंद्र चालक हे लहान बालकाचे आधार कार्ड काढण्यासाठी १६० रुपये प्रमाणे रक्कम वसुली केली जात आहे. ही रक्कम नेमकी कोणाच्या खात्यावर जमा होते. हा खरा प्रश्न नागरिकांमध्ये उपस्थित केला जात आहे. यवत येथील महा ई सेवा केंद्र चालक व आधार कार्ड केंद्र चालक नागरिकांची आर्थिक लूटमारी करत आहेत. या संदर्भात संबंधित केंद्र चालका विरुद्ध कारवाईची मागणी होत आहे.
सरकारी योजने संदर्भात लाभार्थींना आधार कार्ड दुरुस्ती करणे किंवा योयोजनेचा लाभ घेण्यासाठी, बँका, शाळा, कॉलेज आदी ठिकाणी आधार कार्डची ससक्ती व मागणी केली जात आहे. आधार कार्ड नसेल तर शासकीय योजनांच्या लाभांपासून नागरिकांना वंचित राहावे लागते. लहान विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेशासाठी आधार कार्ड आवश्यक असल्याने विद्यार्थी पालकांकडे मागणी केली जाते. तसेच राज्य शासनाकडून दिल्या जाणाऱ्या विविध योजनाच्या लाभासाठी आधार कार्ड नंबरची मागणी केली जाते तसेच. अनेक नागरीकांचे विविध कारणास्तव मोबाईल नंबर आणि रहिवासी पत्ता बदलले आहेत. तसेच मुलींच्या लग्ना नंतर महिलांचे नावात बदल होतो. आधार कार्ड दुरुस्ती करणे आवश्यक असते अशा विविध कारणांसाठी आधार कार्ड अपडेट नसल्यास शासकीय योजनाचा लाभ मिळत नाही. नागरिकांच्या आधार कार्डाला मोबाईल नंबर जॉईंट किंवा (अपडेट) नसल्यास शासकीय योजनांचा ओटीपी मिळत नाही. त्यामुळे नागरिक आधार कार्डावर मोबाईल नंबर, पत्ता किंवा नाव बदलण्यासाठी (अपडेट) करण्यासाठी महा ई सेवा केंद्रावर जातात.
बालकांचे आधार कार्ड नोंदणी केलेल्या पावतीवर रक्कम दर्शविणारा भाग आधार कार्ड चालक स्वतः काढून घेत असून. आधार कार्ड मोफत असलेल्या आधार कार्डसाठी रक्कम वसूल केली जात आहे. या लुटमारी बाबत यवत येथील निवृत्त पोलीस कर्मचारी चांदभाई मुलाणी यांनी प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. दि. ११ रोजी माझ्या नातीचे आधार कार्ड काढण्यासाठी गेलो असता सदर आधार कार्ड चालकाने १६० रुपयांची आकारणी केली परंतु या बाबतची कोणतीही पावती दिली नाही. या बाबत तहसील कार्यालय दौंड येथील तहसीलदार व जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क केला असता. या बाबत लेखी तक्रार करावी असे सांगण्यात आले. तसेच दौंड पंचायत समितीचे विस्तार अधिकारी के.धुमाळ यांच्याशी संपर्क केला असता. आधार कार्ड केंद्र हे अंगणवाडीतील बालकांसाठी देण्यात आले असून. सध्या अंगणवाडी शाळा बंद असल्याने दुकानात आधार कार्ड नोंदणी चालू असल्याचे सांगितले. परंतु लहान मुलांच्या नोंदणीसाठी कोणत्याही प्रकारची रक्कम आकारली जात नाही. या बाबत संबंधित केंद्रचालकाची चौकशी करून पुढील योग्य ती कारवाई करू असे आश्वासन दिली आहे.
यवत पंचक्रोशीतील नागरिकांच्या प्रतिक्रिया निवृत्त पोलीस कर्मचारी चांदभाई मुलाणी बोलताना म्हणाले, यवत ग्रामीण रुग्णालय समोर असलेल्या आधार केंद्रांवर नागरिकांची होणारी लूटमारी थांबेल का असा प्रश्न उपस्थित केला. ते पुढे बोलताना म्हणाले ४ महिन्याच्या मुला मुलींचे आधार कार्ड साठी १६० रुपये आकारणी केली जात आहे. या पूर्वी देखील माझ्या नातवाचे आधार कार्डसाठी १६० रुपयांची आकारणी केली आहे.
आधार नोंदणीसाठी नमूद केलेल्या रकमेपेक्षा अव्वाच्या-सव्वा रक्कम उकळली जाते, हि बाब लाजिरवाणी असून अन्यायकारक आहे. संबंधित विभागाने महा ई सेवा केंद्र व अशा आधार कार्ड केंद्र चालकाची संपूर्ण चौकशी करण्यात यावी. अशी मागणी त्यांनी केली असून या बाबत संबंधित विभागाकडे तक्रार दाखल करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
वाचक क्रमांक :