मराठा संघर्ष योद्धा मा मनोज जरांगे पाटिल यांच्या आव्हानानुसार अंतरवली सराटी ते मुंबई मराठा कुणबी आरक्षण पदयात्रा संदर्भात पाटस येथे बैठक संपन्न.
By : Polticalface Team ,13-01-2024
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड.
दौंड ता.१२ जानेवारी २०२४
मराठा संघर्ष योद्धा मा.मनोज जरांगे पाटील यांच्या आवाहनानुसार
मराठा कुणबी आरक्षण संदर्भात अंतरवली सराटी ते मुंबई पदयात्रेमध्ये सहभागी होण्याचे बाबत दौंड तालुक्यातील सकल मराठा समाज बांधवांची नियोजन बैठक आयोजित करण्यात आला होता. शुक्रवार दि. १२ जानेवारी २०२४ रोजी दुपारी १२:३० वाजता मौजे पाटस ता दौंड जिल्हा पुणे येथील आदित्य हॉटेल, पाटस.बारामती रोड येथे समन्वयक समिती सकल मराठा समाज दौंड तालुका यांच्या वतीने आयोजित करण्यात आली होती.
या प्रसंगी दौंड तालुक्यातील मराठा कुणबी शेतकरी सामाजिक शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी प्रामुख्याने उपस्थित दर्शवली होती. अंतरवाली सराटी ते मुंबई पदयात्रेमध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले मराठा कुणबी आरक्षण संदर्भात राज्य शासन दरबारी मराठा कुणबी आरक्षण अंतरवाली सराटी ते मुंबई पदयात्रा ही दींडी पंढरीच्या वारी प्रमाणे व संप्रदया प्रमाणे तयारी करण्यात आली असल्याचे उपस्थित मान्यवरांनी सांगितले. तसेच मराठा कुणबी आरक्षण पदयात्रेत सहभागी झालेल्या प्रत्येक व्यक्तीचे ओळखपत्र तयार करून देण्यात येणार असल्याचे मान्यवरांनी सांगितले.
अंतरवली सराटी ते मुंबई पदयात्रेमध्ये सहभागी होणाऱ्या सर्व मराठा कुणबी समाज बांधवांनी समाजाला गालबोट लागेल असे कृत्य न करता शिस्त राखुन वाटचाल करावी अशी सूचना करण्यात आली आहे.
पोटा पाण्याचा प्रश्ना बाबत अन्न धान्याची शिदोरी सामग्री ट्रक ट्रॅक्टर फोर व्हीलर गाड्यांमध्ये. बिछाना सह भरून घेण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. तसेच ज्यांना शक्य होईल त्यांनी स्वतःच्या फोर व्हीलर गाड्या घेऊन या पदयात्रेमध्ये सहभागी व्हावे. तसेच मराठा कुणबी आरक्षण पदयात्रा दिंडीमध्ये पिण्याचे पाणी टँकर ॲम्बुलन्स तसेच मुक्काम असेल त्या ठिकाणी भोजनाची व्यवस्था करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.
मराठा कुणबी आरक्षण पदयात्रा दिंडीमध्ये सहभागी होणारे ज्येष्ठ नागरिक वयोवृद्ध व्यक्तींसाठी वाहनांमध्ये बसण्याची व्यवस्था करण्यात यावी.
अंतरवली सराटी ते मुंबई पदयात्रेमध्ये दौंड तालुका समन्वय समिती सकल मराठा समाज यांच्या वतीने दौंड तालुक्यातील युवा तरुणांनी बहुसंख्येने सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे. या प्रसंगी राजाभाऊ कदम वसंतराव साळुंखे अनिल शितोळे तुषार शेळके वरवंड मधुबन दिवेकर कंपनी तसेच यवत येथील दादासाहेब माने अण्णासाहेब दोरगे. प्रामुख्याने उपस्थिती दर्शवली होती. तसेच समन्वय समिती,सकल मराठा समाज दौंड तालुक्यातील मान्यवर उपस्थित होते
वाचक क्रमांक :